Flower Manchurian :
Flower manchurian is made from Cauliflower florets also known as Gobi or Gobhi. you can serve this dry gobi manchurian as a snack or as a side dish with veg fried rice. This dish is fairly easy to prepare.
बनवा फ्लॉवर मंचूरियन, खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेल्या लिस्ट चा वापर फ्लॉवर मंचूरियन बनवण्या करीता करा अणि सम्पूर्ण परिवाराला खायला दया पौष्टिक अणि चविस्ट फ्लॉवर मंचूरियन…
साहित्य:
पाव किलो फ्लॉवर, दोन कांदे, तीन टोमाटो, लसणाच्या चार – पाच पाकळ्या, थोड आल, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, तेल, चवीनुसार मीठ.
कृती : फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावे. कॉर्नफ्लॉवर थोड्याश्या पाण्यामध्ये भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवावे. त्यात किंचित मीठ टाकावे. फ्लॉवरचे तुकडे त्या पिठात भिजवून तेलामध्ये तळून घ्यावे. टोमाटो उकडून लसूण-अल्यासोबत त्याची पेस्ट करून घ्यावी. कढईमध्ये तेल घेवून जीऱ्याची फोडणी करावी. कांदा बारीक चिरून लालसर परतावा. त्यामध्ये तयार केलेली टोमाटोची पेस्ट टाकावी. ती थोडी परतल्यानंतर गरजेनुसार लाल तिखट आणि थोडे हिंग टाकावे. तळलेले फ्लॉवरचे तुकडे, मीठ आणि साखर टाकावी. भाजी शिजवून घ्यावी.
लिखाण :
मृणालिनी पाटील
mrunalini _patilkittu@gmail .com
Akola