Corn rolls :
Corn roll is prepared from corn, boiled potatoes, chees, coconut, green chillies, ginger, onion, sugar and salt as per the taste. Boil the corn with little salt in sufficient water for few minutes. Coarsely crush the corn. for more follow our procedure.
बनवा कोर्न रोल्स , खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेल्या लिस्ट चा वापर कोर्न रोल्स बनवण्या करीता करा अणि सम्पूर्ण परिवाराला खायला द्या पौष्टिक अणि चविस्ट कोर्न रोल्स ….
साहित्य :
सहा मोठी मक्याचे कणसे, एक किलो उकडलेले बटाटे, तीन टेबल स्पून किसलेले चीज, अर्धी वाटी ओले खोबरे, चार हिरव्या मिरच्या, दोन लिंबाचा रस, एक इंच आले, तीन कांदे, साखर, चवीनुसार मीठ.
कृती :
कणसे काढून उकडून घ्यावीत आणी नंतर त्याचे दाणे काढून घ्यावे. उकडलेले बटाटे बारीक करून त्यात मीठ, एका लिंबाचा रस घालून एकत्र करावे, किसलेले चीज, खोवलेले खोबरे, बारीक चिरलेला कांदा, मिरच्या – आल्याची पेस्ट, साखर, कणसाचे दाने आणि एका लिंबाचा रस पिळून हे सारण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. बटाट्याचे दोन गोळे घेवून त्यामध्ये तयार केलेले सारण भरून त्याला कटलेट आकार द्यावा. कढइत तेल घालून तांबूस रंगावर तळावे. टोमाटो सोसबरोबर गरम असतांनाच खायला घ्यावे.
लिखाण :
मृणालिनी पाटील
mrunalini_patilkittu @gmail .com
Akola