‘आकाश’ आता फुकटात!




Like
Like Love Haha Wow Sad Angry

akash android tab now avaialble freeविद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. आवडते ‘आकाश’टेब्लेट लवकरच अगदी फुटकात मिळणार आहे. ही माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

पहिला भारतीय आयपॅड म्हणून ‘आकाश’कडे बघितले जाते. ‘आकाश’ला संपूर्ण स्वदेशी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या आणखी विकासासाठी आता आयआयटी राजस्थानसोबतच आयआयटी मुंबई, आयआयटी मद्रास व आयआयटी कानपूरलाही सहभागी करून घेण्यात येईल, असेही या सूत्रांनी सांगितले.

आयआयटी संस्थांच्या मदतीने ‘आकाश’ची क्षमता वाढवून ८00 मेगाहर्टझ करण्यात येईल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशात २२ कोटी ‘आकाश’ टॅब्लेटची गरज असल्याचे म्हटले आहे. एवढय़ा मोठय़ाप्रमाणात ऑर्डर मिळाल्यास अऩेक कंपन्यांसाठी ही नवी संधी राहील, असे या सूत्रांनी सांगितले.

‘आकाश’ संपूर्णपणे देशातच विकसित केल्यानंतर या टॅब्लेटची किंमत २२७६ रुपयांवरून कमी होऊन १५00 पर्यंत खाली येईल. त्यावर शैक्षणिक संस्थांना ५0 टक्के सुट मिळेल. उर्वरित ७५0 रुपये शाळांनी भरायचे आहेत. त्यामुळे विद्याथ्यार्र्ंना ‘आकाश’ अगदी फुकटात मिळेल, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




6 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: