आता खरा गाढव कोण?




Like
Like Love Haha Wow Sad Angry

how-is-real-donkey, I had two Hsiu burst gadhva next step Look jokes , jokes , Lo, I had another crazy. I said , What dad … Past Laughter Challenger seen the show And now you know the joke yesterday

khara gadhaw kon?

आता खरा गाढव कोण?

मला बघताच दोन गाढ्व जोरजोरात हसु लागले |
जोक्स बघ, जोक्स बघ , असं आपसात बोलु लागले ||
मी म्हणालो, काय रे बाबांनो… कालचा लाफ्टर चॅलेंजर शो बघितला का? |
आणि कालचा जोक तुम्हाला आता समजला का? ||

… ( गाढव मला म्हणाले…)
अगाच वेळ घालवण्याची आम्हांला सवय नाय |
माणुसच एक जोक आहे, मग शो बघण्याची गरजच काय? ||
कारण हल्लीची माणसं फक्त दिसायलाच माणुस दिसतात |
वरुन किर्तन, आतुन तमाशा, अशा प्रकारे वागतात ||

सुखाच्या मागे धावता धावता विवेक पडतो यांचा गहाण |
पाण्यात राहुनही माशाची भागत नाही जशी तहान ||
पैशाच्या मागे धावता धावता दमछाक होते यांची खुप |
वाटी वाटीने ओतले तरीही कमीच पडते यांना तुप ||

बायका आणि पोरांसाठी, चाले म्हणे हा खेळ |
ज्या देवाने घडवले यांना, त्या देवासाठी नसतो यांना वेळ ||
माण्सांच वागणं सरड्यासारखं, नेहमीच बदलत राहतं |
माणसांपेक्षा आज इमानदार गाढव, असं उदाहरण द्यावं लागतं ||

आम्ही गाढव, आम्ही गाढव आता अभिमानाने हे सांगतो |
म्हणुन तर माणुस दिसताच, खुप जोरजोरात हसतो ||
त्यांनी म्हटलं, मला पटलं, मी तिथुन निघुन जाणच बरं समजलं!

हा हा हा हा हा हा …………………………!

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu