एका आंधळ्या प्रेमाची गोष्ट




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1
pream and love एका आंधळ्या प्रेमाची गोष्ट

 

माझी एक मैत्रिन होती
खुप शांत आणि अल्लड स्वभावाची
कधीकधी यायची लहर तेंव्हाच ती,
लाजुन गालातल्या गालात हसायची….

मधाच्या पोकळीतून बोल एकु यावे
अशी ती सुमधुर आवाजात बोलायची,
बोलता बोलता मग कुणास ठाउक,
ती आचानक गप्प होउन जायची…

बागेतली फुले तिला आवडायची आधी
ती त्या फुलाना आवडायची,
फुलेही तिची सवड बघून तिच्यासोबत,
आनदाने तिच्यासोबत बागडायची…

तिच्यासोबत चालताना, वाटही कमी पडायची
तिच्या सहप्रवासात नेहमी,
वाट पावलांना संपताना दिसे…

अशी काहीसी ती मला खुप आवडायची,
रोज मला दिवसाच्या स्वप्नात ही दिसायची,
तिला विचारण्याची हिंमत माझ्यात नव्हती,
पण तरीही माझ्या मनास तिचीच आस असायची…

एकदा असेच तळ्याकाठी बसून
तिचे प्रतिबिंब पाण्यात पाहत होतो
विस्कटू नये म्हणून तरंगांना
शांत रहा म्हणून सांगत होतो…

तेवढ्यात तिने मला विचारल,
आज काय झाले आहे तुला?
मी उत्तरलो माहित नहीं पण
मला काहीतरी सांगायचे आहे तुला…

तुझी दृष्टी होउन मला,
तुझे व्हायचे आहे.
तेवढ्यात ती उत्तरली,
मला दृष्टी नसेल तरीही चालेल
पण तुला एकदा माझ्या मिठीत,
माझ्या या आंधल्या डोळ्यानी पहायचे आहे …

प्रणव वानखेड़े

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu