\\ आरती शनैश्वर महाग्रह देवाची \\
जय जय श्री शनिदेवा \ पद्मकर शिरी ठेवा आरती ओवाळीतो \ मनोभावे करुनी सेवा –\\धृ \\
सूर्य सुता शनिमुर्ती \ तुझी अगाध कीर्ती \ एक मुखे काय वर्णू \ शेषा न चले स्फूर्ती –\\जय\\
नवग्रहांमाजी श्रेष्ठ \ पराक्रम थोर तुझा \ ज्यावर कृपा करीशी \होय रंकाचा राजा –\\जय\\
विक्रमा सारिखा हो \ शककर्ता पुण्यराशी \ गर्व धरिता शिक्षा केली \ बहुत छळियेले त्यासी –\\जय\\
शंकराच्या वरदाने \ गर्व रावने केला \ साडेसाती येता त्यासी \ समूळ नाशासी नेला –\\जय\\
प्रत्यक्ष गुरुनाथा \ चमत्कार दावियेला \ नेऊनि शुळापाशी \ पुन्हा सन्मान केला –\\जय\\
ऐसे गुण किती गाऊ \ धनी न पुरे गाता \ कृपाकरी दीनावरी \ माहा राजा समर्था –\\जय\\
दोन्हीकर जोडोनिया \ रखमा लीन सदापायी \ प्रसाद हाची मागे \ उदयाकाळ सौख्य डावी –\\जय\\
\\ २ — आरती श्री शनिदेवजीकी \\
जय जय श्री शनिदेव भक्तन हितकारी \ सुरजके पुत्र प्रभू छाया महतारी — \\धृ\\
श्याम अंक वक्र दृष्ठ चतुर्भुजा धारी \ निलांबर धार नाथ गजकी असवारी–\\जय\\
क्रिट मुकुट शिश सहज दिपत हैं लीलारी \ मुक्तनकी माल गले शोभित बलिहारी –\\जय\\
मोदक मिष्ठान पान चढत हैं सुपारी \ लोहा तील तेल उडद महिषी अति प्यारी –\\जय\\
देव दनुज ऋषीमुनी सुरत नरनारी \ विश्वनाथ धरत ध्यान शरण हैं तुम्हारी –\\जय\\
\ शनि देवांचा मंत्र — ” नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम`\
छाया मार्तंडसंभूतम तं नमामि शनैश्चरनंम:”
\ शनिदेव का मंत्र — शन्नो देवीरभीष्ठय sआपोभवन्तु पीतये \
शं य्यो रभीस्त्रवन्तुन; शनैश्चराय नम: \