who-is-the-kunbi-samaj It is believed that kunbi people entered the provinces of Khandesh from Gujrat in eleventh century, as they were forced by the Rajput tribes to leave the region.
कुणबिक करतो तो कुणबी
मराठी भाषेचे दोन प्रकारांत विभाजन करता येते. मूळ मराठी हिलाच देशीभाषा असे म्हटले जाते. दुसरी संस्कृतप्रचूर मराठी. देशीभाषा हीच खरी मराठी आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीचे वर्णन करताना ‘देशीकार लेणेङ्क असा शब्दप्रयोग केलेला आहे. दुर्दैवाने आज लिखाणातून मराठीचे हे देशीकार लेणे बाद झाले असून संस्कृतप्रचूर निर्जीव मराठी वापरली जात आहे. असो. देशी बोलीत शेतीला कुणबिक असे म्हटले जाते. जो कुणबिक करतो तो कुणबी. महाराष्ट्रातील कोणत्याही खेड्यात जाऊन कोणत्याही शेतकèयाला विचारा कुणबिक म्हणजे काय? तो शेती असाच अर्थ सांगेल. माझे वडील म्हणत – ”कुणबिकीला कमीत कमी दोन बैल लागतात.” सर्वच शेतकरयांच्या तोंडी हे वाक्य असते.
कुळवाडी ते कुणबी
हा कुणबी समाज आहे तरी कोण? त्याचाच धांडोळा आपण आता घेणार आहोत. मागील सुमारे हजार-दीडहजार भर वर्षांच्या काळात महाराष्ट्रात शेतकरी वर्ग स्थिरावला असे दिसून येते. पूर्वी संपूर्ण शेतकरी वर्ग एकाच जातीत मोडत होता. त्याला त्यालाच कुळवाडी म्हणत. मूळ शब्द कुळ आहे. हे दोन्ही शब्द ‘कृषिवल’ या शब्दाच्या अपभ्रंशातून आले आहेत. कृषिवल-कृषिवळ-कुवळ-कुळ अशी त्याची उपपत्ती आहे. कुळ म्हणजे शेती कसणारा. हा फार प्रचलित शब्द आहे. शेती कसणारया कुळांना शेतीचे मालक बनविणारा कुळकायदा सर्वपरिचित आहे. ‘वाडी’ हा प्राकृत भाषेतील प्रत्यय आहे. मारवाडी, काठेवाडी, भिलवाडी, असे शब्द भारतीय भाषांत दिसतात. तसाच कुळवाडी हा शब्द आहे. कृषिवल आणि कुळवाडी यात किती साम्य आहे, हे वेगळे सांगायला नको. सोप्या भाषेत कुळवाडी म्हणजे शेतीवाला. शेतीची शासकीय पातळीवर नोंद ठेवणारया ग्राम अधिकारयास कुळकर्णी म्हणत. ‘कुळ’वरूनच कुळकर्णी हा शब्द निर्माण झाला. ही व्यवस्था किमान हजार-बाराशे वर्षे जुनी आहे. संत ज्ञानेश्वरांच्या घराण्यात कुळकर्णपद होते. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत. विठ्ठलपंतांच्या पंजोबांचे पंजोबा हरीपंत कुळकर्णी होत. शके १०६० च्या सुमारास हरीपंत आपेगावचे कुळकर्णी होते. कुळवाडी हा प्राकृत शब्द असून त्याचा अपभ्रंश होऊन-होऊन कुणबी हा शब्द तयार झाला आहे.
कुणबी, माळी, धनगरांचे मूळ एकच
महात्मा फुले यांनी या विषयावर केलेल्या संशोधनाला तोड नाही. त्यांचा ‘शेतकरयाचा असूड’ हा अजोड ग्रंथ त्यासाठी उपयुक्त ठरतो. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच फुले यांनी एक छोटेसे उपशीर्षक टाकले आहे. त्यात ते म्हणतात – हे लहानसे पुस्तक जोतीराव गोविंददराव फुले यांनी शूद्र शेतकरयांचे बचावाकरिता केले आहे.
‘शेतकरयाच्या असूड’च्या उपोद्घातात फुले यांनी कुणबी, माळी आणि धनगर या जातींविषयी लिहिले आहे.
फुले म्हणतात – ‘‘वाचकहो, सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यामध्ये तीन भेद आहेत. शुद्ध शेतकरी म्हणजे कुणबी, माळी व धनगर. आता तीन भेद होण्याची कारणे पाहिली असता, मुळचे जे लोक शुद्ध शेतकीवर आपला निर्वाह करू लागले, ते कुळवाडी अथवा कुणबी. जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागाइती करू लागले , ते माळी व जे ही दोन्ही कामे करून मेंढरे , बकरी वगैरेंचे कळप बाळगू लागले ते धनगर, असे निरनिराळ्या कामांवरून प्रथम हे भेद उपस्थित झाले असावेत. परंतु आता या प्रथक जातीच मानतात. त्यांचा सांप्रत आपसांत फक्त बेटी व्यवहार मात्र होत नाही. बाकी अन्नव्यवहारादि सर्व काही होते. यावरून हे (कुणबी, माळी व धनगर) पूर्वी एकाच जातीचे असावेत.”
खंडोबा-भानू : पहिले आंतरजातीय प्रेमीयुगुल
विद्यमान मराठे-कुणबी, धनगर आणि इतर बहुजन
जातींचे कुलदैवत खंडोबा, श्रीक्षेत्र जेजुरी.
महात्मा फुले यांचा हा युक्तिवाद अगदी पटण्यासारखा आहे. कुणबी, माळी आणि धनगर या तिन्ही जातींच्या रितीभाती सारख्याच आहेत. यांची दैवते समान आहेत. धनगर आणि कुणब्यांत पूर्वी बेटी व्यवहार होता, असेही दिसून येते. या तिन्ही जातींचे कुलदैवत असलेल्या खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसाई ही कुणबीण होती. तर दुसरी पत्नी बाणाई उर्फ भानू ही धनगरीण होती. वाघ्या-मुरळींच्या फडात गायिल्या जाणारया आख्यानानुसार मल्हारी मार्तंड खंडेराय भानूच्या प्रेमात पडला. तिला वश करण्यासाठी राज्य सोडून तिच्या बापासोबत मेंढराच्या कळपात राहिला. कळपाची नीट राखण करून तिच्या बापाचे मन जिंकून घेतले आणि तिच्याशी प्रेमविवाह केला. मराठी संस्कृतीतला हा पहिला आंतरजातीय प्रेमविवाह म्हटला पाहिजे.
वखराच्या पाशींच्या तलवारी
कुणबी समाज हा मुळातच लढवय्या आणि काटक आहे. प्रसंगी वखराच्या पाशींच्या तलवारी करण्याचीही त्याची तयारी होती. सातवाहन घराण्यातील प्रसिद्ध सम्राट गौतमीपूत्र सातकर्णी याने मातीच्या पुतळ्यांत प्राण फुंकून लढाई जिंकल्याची आख्यायिका सांगितली जाते. ही कथा प्रतिमात्मक आहे. हे मातीचे पुतळे म्हणजे खरोखरचे पुतळे नव्हेत. हे शेतीत राबणारे शेतकरी होते. त्यांची स्थिती मातीमोल होती. म्हणून त्यांना ‘मातीचे पुतळे’ म्हटले गेले. या शेतकऱ्यांना लष्करी प्रशिक्षण देऊन गौतमीपूत्र सातकर्णीने लढाई मारली. महाराष्ट्रातील शेती पूर्णत: पावसावरच अवलंबून होती. त्यामुळे कुळवाडी उर्फ कुणबी अर्धवेळच शेती करायचा. शेतीभातीची कामे आटोपायची, दसरयाला शिलंगणाचे सोने लुटायचे आणि युद्ध मोहिमेवर रवाना व्हायचे, हा कुणबी वीरांचा वर्षक्रम होता. कुळवाडी भूषण शिवाजी राजांच्या काळातही मराठा सैन्य असेच अर्धवेळ लढाया मारीत असे. हाती सत्ता आल्यानंतर हेच कुळवाडी उर्फ कुणबी पुढे मराठे म्हणून नावारूपास आले. हा बदल शिवरायांच्या आधी शंभरेक वर्षे सुरू झाला असावा. पण आपले मूळ कुणबी हे नाव या समाजाने शेवटपर्यंत टाकले नाही.
– अनिता पाटील, औरंगाबाद.
COURTSEY : ABHI- SHARING WITH ALL “KUNBIs” TO UPDATE OWN HISTORY… TKS…
32 Comments. Leave new
Mala aankhi mahiti having kunabi vishae
सुशिक्षित बेकार मराठा मुलांसाठी महत्वपूर्ण लेख.
३४% लोकसंख्या असलेल्या गरीब शेतकरी,मजुराची कर्जे काडून,जमिनी गहाण ठेऊन, हलाखीत शिक्षण घेतलेल्या गरीब मराठा मुलाना नोकऱ्या का नाहीत?
मराठा समाजास आरक्षण का हवे?
खाजगी क्षेत्रात स्थानिकांना प्राधान्य का हवे?
उद्योग व्यवसायात मदत का हवी?
शेती व जोडधंद्यांसाठी मदत का हवी?
नोकरी.
खाजगी नोकरी..
१००% खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या पैकी राज्यातील ५०% चांगल्या खाजगी नोकऱ्या परराज्यातील परप्रांतीय मुले राज्याला प्राधान्य न दिल्याने व त्यांच्यावर कसलेही नियंत्रण नसल्याने मागील दराने येऊन बळकावत आहेत.राज्यातील शेतकऱ्यांची गरीब सुशिक्षित होतकरु मुले इथे पण प्रयत्न करतात पण फक्त इंरव्यूव्ह घेऊन जाणीवपूर्वक चुकीची करणे देऊन घरी पाटवली जातात या मुलाखती पण फक्त मुलाखती घेतो हे दाखवण्यासाठीच असतात.स्थानिक मुले उपासी आणि परप्रांतीय तुपाशी अशी अवस्था आहे येथे.
राज्य शासनाने खाजगी क्षेत्रातील जॉब देताना फक्त प्रायवेट जॉब पोर्टल बनवून राज्यातल्या मुलांची रहिवासी आधिपत्र तपासून जॉब पोर्टल वर नोंदणी करूनच राज्याला प्राधान्य देऊन ,९०% खाजगी जॉब विशिष्ट्य कायदा करून स्थानिकांना दिले तरी लाखो मुलांना लगेच नोकरी मिळेल)
गरीब शेतकऱ्यांच्या शिकले्या ुलांना नोकऱ्या नाहीत म्हणणारे वरील गोष्टीकडे पण लक्ष्य देतील का?
(बाकीच्या ५०% खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या राज्यातील सशक्त घरातील ओपन/एस्सी/एसटी/ओबीसी मुले घेतात)
सरकारी नोकरी
५०%बंधिस्त आरक्षित वर्गात खुल्या वर्गातील गरिबातील गरिबांना पण स्थान नसते.
५०% खुला वर्ग. (सशक्त ओपन/एस्सी/एसटी/ओबीसी विरुद्ध अशक्त शेतकरी,शेतमजूराचा , कामगाराचा मुलगा अशी स्पर्धा असते)
यातील ९९% जागा सशक्त ,श्रीमंत, मध्यम वर्गीय घरातील रोज शिक्षणा बरोबरच मागदर्शन आणि माहितीचा खुराक असलेल्या सर्वसुविधा युक्त घरातले आणि शिक्षण घेताना कसलीही अडचण न आलेली पूर्ण तयारी केलेली मुले बळकावतात.
ते ५०% खुल्यावर्गातल्या कोट्यामधील ४९% कोटा हडप करतात कारण त्यांचे शिक्षण प्रिशिक्षण विना अडथळा पोषषक वातावरणात पूर्ण झालेले असते.ते स्पर्धेला तोंडव द्याला सक्षम असतात.
अशा सर्व सूविधा मिळालेल्या आणि कसलीही कमतरता न भासलेा प्रस्थापित श्रीमंत आणि मध्यम वर्गीय घरातील नोकरी,व्यवसाय,चांगली शेती असलेली ब्रामण/मुस्लिम व इतर समाजातील १०% लोकसंख्या असलेली मुले २०,% नोकऱ्या मिळवतात.
श्रीमंत मध्यमवर्ग मराठा घरातील १०% लोकसंख्या असलेली नोकरी, व्यवसाय,चांगली शेती असलेली मुलं १५%,नोकऱ्या मिळवतात.
शिवाय आरक्षणाची मलाई खालेल्या घरातील नोकरी,व्यवसाय,चांगली शेती असलेली SC/ST/ OBC घरातील, ,४५% लोकसंख्या असलेली व ५०% आरक्षण असूनही ओपन मध्ये कोणालाही खुली सूट असल्याने खुल्या वर्गात घुसखोरी करून १४% नोकऱ्या ढापतात.
सध्या वरील ३ वर्गाचीच शेती बागायत आणि परवडणारी आहे.
बाकीचे सगळे कोरडवाहू,अल्प भूधारक, भूमिहीन आहेत.
सरकारी नोकरीत असलेेले वर्गच सर्व सरकरी यॊजना लाटतात.आणि सरकार यांचीच शेती कर्जे माफ करते.यांना नुकसान झाले कि भरपाई देते.गरीब शेतकऱ्याची न कर्जे माफ करते ना साहाय्य करते.
गरीब,शेतकरी फक्त अन्याय सहन करत आहे.या बिघडलेल्या स्वार्थी व्यवस्थेने याला मागे ठेवले आहे. अशक्त केले आहे. सुधारलेले प्रस्थापित लोक त्याला रोज त्याच्याकडे गुणवत्ता नाहीं म्हणुन हिणवतात.अशक्त झालेला गरीब समाज अर्धवेळ कसेबसे शिक्षण घेऊन जीवघेण्या स्पर्धेत उतरतोय.पण समोर आव्हान देणारे सशक्त आहेत याची त्याला कल्पनाच नसते.आणि जे मागासवर्गात आहेत ते त्यांच्या सारखे आहेत पण त्यांच्या जागा आरक्षित असतात .त्याचे पालक,मित्र त्यांच्यातलाच कमीपण काढतात पण तो कमीपणा अर्ध वेळ हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्याने आला त्यामुळे गुणवत्ता देऊ शकला नाही याचा विचार कोणी करत नाही. म्हणूण सामान्य मराठा वर्गास आरक्षण आणि सवलतीची खरी गरज आहे. पारतंत्र्यात /स्वातंत्र्यात गरीब शेतकरी,मजूर नेहमी अशक्त झाला आहे.कारण व्यवस्थेने त्याचे सगळे रक्त कायम शोषले आहे.
अशा परिस्थिती त्याच्या वाट्यााला १००% पैकी फक्त १% नोकऱ्या कशाबशा हाती लागतात लोकंख्या मात्र ३५%
हि मुले चटणी भाकरी खाऊन,प्रसंगी उपासी राहून,घरातील,शेतातील कामे करून,गुरे संभाळून ,मजुरीची कामे करून कसलीही सुविधा,सहाय्य न घेता असंख्य संकटाना तोंड देत,नैसर्गिक आपत्तींना सामोरे जातात. एक अर्थाने तेअर्धवेळ शिक्षण घेत आहेत. बहुसंख्य ३५% गरीब शेतकरी, मजूर मराठ्यांना फक्त ,१%नोकऱ्या मिळतात आणि ३४% बेकार राहतात. त्याला याच व्यवस्थेततील धूर्त, राजकारणी शिकून नोकऱ्या नाहीत असे म्हणतात. तरी हि मुले जीद्दीने शिक्षण बिकट अवस्थेत पूर्ण करतात .यातीलच काही हातश हळवे असलेले टोकाचे पाऊल उचलतात तर काही उग्र पावले उचलतात.
आर्थिक,शैक्षणिक,राजकीय,सामाजिक बाबतीत बिकट परिस्थिती मुळे मागे पडलेला ३४% मराठा समाज वेळीच मुख्य प्रवाहात आण्यासाठी त्याला आरक्षण हवे आहे
सामाजिक न्याय विभागाकडून, कृषिविभागाडून सर्व मदत मिळने आवश्यक आहे,
उद्योग/व्यवसाय विभागात तर आमूलाग्र बदल करून त्याला उद्योग उभारणीसाठी सुरवातीला प्रशिक्षण देऊन जागा/इमारतीसाठी/यंत्रसामुग्रीसाठी/कच्चामाल यासाठी कर्ज पुरवठा करणे गरजेचे आहे. शेवटी या स्थिर भांडवलासाठीच सुरवातीचा जवळपास ७०% ८०% खर्च होतो.
तात्काळ निर्णय घेउन आराजकतेकडे चालेल्या या समाजास प्रवाहात नाही आणले तर देशाचे आणि राज्याचे खूप मोठे नुकसान होईल. आणि त्याला जबादार इथली शासन,प्रशासन व न्याय व्यस्था हेच असू शकतात कारण निर्णय घेण्याचे अधिकर त्यांच्याकडेच आहेत.
जय शिवराय .
please वाचा आणि सर्व मराठयांना share करा.
मराठा समाजाला आरक्षण कसे पाहिजे ?
इतर एस्सी.एसटी ओबीसी ना मिळते तसेच.
एस्सी.लोकसंख्या…१५% आरक्षण १५%
एसटी.लोकसंख्या..७.५०% आरक्षण ७.५०%
ओबीसी.लोकसंख्या २७% आरक्षण २७%
मराठा.लोकसंख्या,३२% आरक्षण ३२%
१६% आरक्षण असेल आणि २५% मराठा समाज मागास असेल तर १६+९=२५% उरलेला ९% समाज त्यांच्या साठी काही धोरण नसल्याने जाचक आटी लादल्या जातील व बर्बाद होईल व पुन्हा सर्वच जातीत वंचित आणि लाभार्थी असा वाद निर्माण होईल.जातीयता खूप घातक गोष्ट आहे प्रत्येक समाजातील राजकीय स्वार्थी नेत्यांना त्याचा लाभ होतो.
३२% मधील श्रीमंत,प्रस्थापित राजकीय घराणी,बागायतार,व्यावसाईक,उद्योजक,व्यापारी क्रिमिलेअर मधून नंतर आपोआप वगळले जातील. म्हणजे असा घटक १६% असेल तर आपोआप ओपन कॅटेगरि १६% वाढेल सामान्य गरीब मराठा समाजाचे आरक्षण १६% च राहील जेवढे क्रिमीलियल मध्ये असतील तेवढे आरक्षणाच्या बाहेर जातील.आणि ओपन कॅटेगोरीच्या जागाआपोआप वाढतील.
१६% आर्थिक दृष्ट्या आरक्षण खोटे आहे. ते घटनेला मान्य नाही .कारण घटनेच्या चौकटीत बसत नाी. घटनेचा चौकटीत लोकसंख्ये प्रमाणे सामाजिक मागास वर्गात आरक्षण आहे. हे माहित असून जाणून बुजून दुर्लक्ष्य चालले आहे.त्यामुळे आरक्षण घेताना सारवासारव नको जे अपात्र असतील ते क्रिरिमीलियर मधुन आपोअप वगळले जातील.
कृपया लक्षात घ्या या देशात आरक्षण हे आर्थिक मागास वर्गात भेटत नाही ते सामाजिक मागास वर्गात आणि जातीच्या लोकसंख्ये नुसार मिळते.म्हणून आरक्षण सामाजिक वर्गात मिळाले आणि १६% असेल तर घटना बहाय्य असेल कारण ते लोकसंख्याच्या प्रमाणात नसेल आणि लोक परत उगाच अशा जिवघेण्या अवस्थेत होरपळत बसतील.
१६% आरक्षण लोकसंख्येयनुसार नसलेने परत घटना बाहाय्य होऊ शकेल.त्यामुळे लाखो गरीब घरातील मुले देशोधडीला जातील एवढे मोठे आंदोलन करून पण गरीब मराठा मागे राहू नयेत हीच इचछा.
कोर्ट,आयोग ,राजकीय व्यवस्थेला यांचे सुखसुविधा पुरवणारे आरामी जीवन आपल्या व्यवस्थेने दिले आे. गरिबी ंनी पहिली असते अनुभवली नसते. हे ज्याेळी एखादा समाज रस्त्यावर येतो त्याच वेळी काहीतरी करतात.इतरवेळी त्यांना इतर लंबित कामातच आणि ज्वलंत मुद्यावरच काम करावे लागते.
कृपया लोकंख्येप्रमाणे आरक्षन घेऊन लाखो गरीब गरजू मुलांची भविष्यातील बर्बादी, नुकसानथांबवा.
सामाजिक मागास वर्गात मराठा आगोदरच होता.शाहू महाराज, ब्रिटिश काळात तो ओ बी सी मध्येच होता आरक्षण पात्र होता.आहे.स्वपराक्राने स्वजातीला प्रतिष्ठा मिळवून देणारी सामान्य अज्ञान घरातील मराठा जातीची सामान्य निरिक्षर शेतकऱ्याची ब्रिटिश काळात परकिय गुलामी आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे काय अवस्था झाली होती हे महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात मांडले आहे.आज काय दुरावस्था आहे हे आपण पाहताच आहोत.
मंडल,खत्री,बापट आयोगांनी मराठा समाजाचा राजकीय घराणी आणि श्रीमंत घराणी सोडून कसलाही अभ्यास केला नाही व पक्षपाती अहवाल दिला. त्यातच सुप्रिम कोर्टाने इतर आरक्षण पात्र असलेल्या समाजानी आरक्षण मागू नये म्हणून ५०% मर्यादा घातली. कोर्टाने एकच केस पाहिली आणि चटके लाखो गरिांना बसले.
राजकीय सत्तानी मागील काही वर्षातील सरकारे कुबड्यांची व असुरक्षित असलेने जातीयवाद पोसण्यासाठी व पुरेसे संख्याबळ नसलेने आज जो जनमताचा आंदोलनाचा थरकाप उडवणारा आरक्षन मागनीचा जनतेचा लढा सुरु आहे तसा अगोदरच्या सरळ मार्गी निरक्षर पिढ्यानी उभा न केल्याने राजकीय लोकानी त्याकडे दुर्लक्ष्य केले व सुप्रीम कोर्टाचे कारण देऊन घटना दुरुस्ती टाळली.ती घटना दुरुस्ती आता आंदोलनाची तीव्रता पाहून होऊ शकते आणि त्यासाठी आंदोलन लोकशाही मार्गाने सुरु राहणे खुप गरजेचे आहे. आणि गरीब,गरजु समाज मागे राहू नये हि सर्वांची जबाबदारी आहे.
इतर सामाजिक मागासना भविष्यात जे नियम लागू होतील तेच मराठा समाजाला पण होतील आणि वाद,राजकारण,आंदोलने होणार नाहीत.
अगोदरच्या आयोगांनी काहीतरी थातुरमातुर कारने दाखउन १०% श्रीमंत मराठा समाज बघून सर्व समाज श्रीमंत आहे जमीनदार आहे असे सांगून गरीबशेतकरी, मजूर ,कामगार २५% मराठा समाज त्यातून वगळला.सत्ते लालसेपोटी मतपेटी अबाधित राहावी म्हणून २७% ओबीसी आरक्षण दिले गेले होते.
म्हणून कृपा करून लोसंख्येच्या प्रमाणात सामाजिक मागास वर्गात आरक्षण असावे आणि मराठा त्यास पात्र होता आहे.९% गरीब मराठा समाजावर किंवा कमी जास्त जो काही असेल त्या समाजावर अन्याय होऊ देऊ नका अशी विनंती.
इतर मागास समाजात गरीब श्रीमंत ठरतील तसेच मराठा समाजाचे पण गरीब श्रीमंत ठरतील आणि तेच योग्य, समानतेला न्याय देणारे असेल.
खुल्या वर्गातील नोकऱ्यांचा सातत्याने लाभ घेत असलेले घटक आणि अध्याप एक हि लाभ न झालेले घटक आणि आरक्षित वर्गातले सातत्याने लाभ घेत असलेले घटक आणि अद्याप एक हि लाभ न झालेला घटक याची वर्गवारी होणे खूप गरजेचे आहे.
एक लाखातील एक सामान्य मराठा आंदोलना बरोबरच अभिव्यक्ती स्वातंत्र्यात त्याचे मत काय आहे हे सांगतोय.
जय शिवराय
नमस्कार अनिता पाटील, म्याडम मला कुणबी समाजाच्या पाउलखुणा अधिक जाणून घ्यायच्या आहेत कृपया मला आपला संपर्क क्रमांक किवा पत्ता मिळाला तर बरे होईल. राजाराम कोळेकर बदलापूर (पु) ८६००८८५३६२
चांगला प्रयत्न…!! पण जातीचे राजकारण नको..बिहार, यूपी या मागासलेल्या राज्यांत हे चालते..महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे…आपला कूणबी समाजही पुरोगामी आहे..
समाजाच्या उत्थानासाठी काम व्हावे..!!
शुभेच्छा…!!!
Sir mala pn add Kara tyat maza what’s app no 9923821306
प्रथम मराठा-कुणबी, मराठा -क्षत्रिय, हा कोकणातला मराठा, तो वर्र्हाडातला मराठा, विदर्भातला मराठा कुणबी
हा ९६ कुळी तो ९२ कुळी, भारी हलका
हे आधि बंद झाले पाहिजे तर समाज सुधरेल
कुणबी मुलगा आणि मातंग मुलगी यांचा विवाह होऊ शकतो।का ?? कृपया प्रतिसाद द्या.
कुणबी मुलगा आणि मातंग मुलगी यांचा विवाह होऊ शकतो।का ?? कृपया प्रतिसाद द्या.
मी मुळचा मुंबईकर कुणबी आहे.आणि आपल्याला आभिमान आहे की संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज कुळवाडी(कुणबी) भुषण आहेत.महाराष्ट्रातील तमाम कुणबी बांधव एकत्र आले तर समाज आणखीन मजबूत होईल. माझ्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यात (जि.ठाणे) प्रत्येकी 85% हा संपूर्ण कुणबी समाज आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचे राजकारण न ठेवता फक्त “कुणबी समाज” या नावाने Whatsapp गृप तयार केले आहेत.सर्वांनी जर आपल्या भागात असे केले तर समाज एकत्र येण्यासाठी खूप मदत होईल.
Pls add me whatsapp …jay shivray
समाजासाठी जागरुकता दाखवल्याबद्दल धन्यवाद….💐🙏
Khup chhan sir
Madam kunbi samaja baddal mahiti havi hoti.aaplya off cha no hawa aahe
dhanyvad anita patil
कुनबी आणि धनगर यांचा विवाह होऊ शकत नाही.
समाजाच्या दृष्टीने यात काही वाईट नाही. आता कोणीही कोणत्या हि जाती शी विवाह करतात.
कुणबी समाजातल्या मुला मुलींनी इतर जातीतील लोकांशी विवाह करू नये.आमच्या यवतमाळ जिल्ह्यात आम्ही पोट जातीत सुद्धा विवाह करण्याचे टाळतो.
The birth/death or any property certificate of my grand fathers + father +father is not available with the register office, where can I get it?
Dhanywad Anita Patil for your Information.
I am trying to get a Kunbi certificate for me, on basis of my grand fathers brother (चुलत भाऊ & चुलत बहिण) is kunbi.
I have all the relevant documents Can they issue me the caste certificate.
Pls suggets.
Regards
Tushar
Namaskar Tushar Mahadeo Dhanak.
Yes you will get Cast Varification certificate easily.
Please Provide you Recident proof and Origin Place. If you have 7/12 then your work will be very easy.
Dear Mr. Pranav,
Thanks for your kind reply.
The 7/12 is in name of my Father & he is leaving in Pune from the age of his 14 yrs.
But we are stilling visiting our village regularly.
I have submitted all the documents of my Father with 7/12, family tree etc. But still they are not ready to sign the document & sent it further for issuing certificate.
Please guide me how to go further.
Dhanywad Anita Patil Aapale khup khup Aabhari Aahe………
garv aahe mala kunbi aslyacha
hoy karan jatichi bandhane galun hadali pahijet
Namaskar Mandali, Mi Sagar Pawar;Nagpur cha. Mention keleli information correct ahe, pn mala ek sanga aamche Grandpa sangtat ki apan “Dhar wale Pawar ” ahot.and Raja bhoj che Wanshaj aho. For this ,I have rechecked it on Wikipedia and found correct ,coz Raja Bhoj was pawar.Kindly let me know that how we be linked to Maratha / Kunbi? and what was d political issue between kunbi and maratha.I worked in Aurangabad, people I had meet with ,told me that I am Maratha though I am kunbi,While we are treated as a lower caste after Maratha. Waitin for response………………………
कुणबी मुलगी आणि धनगर मुलगा यांचा विवाह होऊ शकतो का? कृपया प्रतिसाद द्या
हो ते शक्य आहे … कुणबी मुलगी आणि धनगर मुलगा यांचा विवाह होऊ शकतो.
समाजाच्या दृष्टीने यात काही वाईट नाही …।
Yes
To : Anita Patil Thanks 4 info (From : Jeeten)….
great post …super like…
maharastracha garv mhanje kunbi samaj…………………