वेजिटेबल बर्गर




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Vegetable Burger :

Learn how to make burger buns stuffed with mix vegetable patties, spiced mayonnaise dressing and cucumber, tomato, onion slices. The patty for this Vegetable Burger is very different, and you will realize that as soon as you take the first bite!

Vegetable Burger

बनवा वेजिटेबल बर्गर, खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेली लिस्ट च वापर वेजिटेबल बर्गर बनवण्या करीता करा अणि सम्पूर्ण परीवाराला खायला दया पौष्टिक अणि चविस्ट वेजिटेबल बर्गर.

साहित्य

    • २ मध्यम आकाराचे बटाटे,
    • १/४ कप कुस्करलेले पनीर किंवा मऊसर टोफु,
    • १/४ कप बारीक चिरलेला किंवा किसलेला कोबी,
    • १/४ कप बारीक चिरलेली फरसबी,
    • २ गाजरं,
    • १ कप पालकची पानं,
    • १/४ कप मटार दाणे,
    • १/४ कप मक्याचे दाणे,
    • २ चमचे प्रत्येकी आलं आणि लसूण वाटून,
    • ४ हिरव्या मिरच्या वाटून,
    • १ चमचा गरम मसाला,
    • १ चमचा किचन किंग मसाला,
    • १/२ चमचा चाट मसाला,
    • थोडी कोथिंबिर चिरून,
    • मीठ चवीप्रमाणे,
    • पावाचा चुरा एकसंध मिश्रणासाठी,
    • तव्यावर परतायला किंवा तळायला तेल,
  • बर्गर चे बन्स,
  • लेट्युसची पानं किंवा पालकची पानं,
  • टॊमेटो आणि कांद्याच्या चकत्या,
  • बटर किंवा तेल बन्सना भाजण्य़ा आधी लावायला,
  • चीजचे स्लाईसेस,
  • स्प्रेड बनवण्यासाठी: मेयोनेज आणि केजन सिझनिंग किंवा लाल तिखट

Method

  • बटाटे उकडून मळून घ्यावेत.
  • गाजर किसून घ्यावे. चिरलेला कोबी आणि फरसबी वेगवेगळे मायक्रोवेव किंवा कुकर मध्ये लगदा होऊ न देता वाफवून घ्यावेत.
  • मटार आणि मक्याचे दाणे ताजे असतील तर वाफवून घ्यावेत.
  • पालकची पानं गरम पाण्यातून काढून पिळून घ्यावीत, मग बारीक चिरून घ्यावीत.
  • बटाटे, पनीर किंवा टोफु, कच्चे गाजर आणि वाफवलेल्या भाज्या हे सर्व एकत्र करावे.
  • एकीकडे खोलगट तवा तापवत ठेवावा.
  • आता मिश्रणात वरील सर्व मसाले घालावेत. तांदळाचे पीठ किंवा पावाचा चुरा मिश्रण एकसंध होईल इतपतच घालावे.
  • तेलाच्या हाताने मिश्रणाचे गोळे करावेत व तळहातांमध्ये दाबून चपटे करावेत.
  • तव्यावर जरा जास्त तेल सोडावे. पावाच्या चुर्यात प्रत्येक पॅटी घोळवावे व असे सर्व पॅटीस तयार करून तव्यावर रचावेत.
  • सर्व पॅटीस दोन्ही बाजूंनी कुरकुरीत व सोनेरी रंग येईपर्यंत तव्यावर परतावेत. एका टिश्युपेपरवर काढावेत म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल.
  • स्प्रेड बनवण्यासाठी मेयोनेज मध्ये एक चमचा केजन सिझनिंग घालून नीट ढवळावे.
  • बन्स च्या दोन्ही अर्धगोलाना आतून बटर किंवा तेल लावून ते ओवन, ग्रिल किंवा तव्यावर थोडे लालसर रंगावर भाजून घ्यावेत.
  • तळच्या अर्धगोलावर एक किंवा दोन लेट्युसची पानं, टॊमेटो आणि कांद्याच्या चकत्या रचाव्यात. त्यावर एक पॅटी ठेवावे. वर चीजचा स्लाईस ठेवावा. आणि दुसरा अर्धगोल त्यावर ठेवून टॊमेटो केचप बरोबर आस्वाद घ्यावा.
    बरोबर ज्यूस किंवा कुठलेही शीतपेय बहार आणते.
Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा