बनवा ओल्या काजूची उसळ
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Kajuchi Usal :

Kajuchi Usal originates from Konkan and Goa (which is famous for its cashews). This recipe tasted yummy with chapati or even bhakri. this rich dish is full of calories. Substitute black Maharashtrian masala for garam masala.

olya kajuchi usal

बनवा ओल्या काजूची उसळ, खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेली लिस्ट च वापर ओल्या काजूची उसळबनवण्या करीता करा अणि सम्पूर्ण परीवाराला खायला दया पौष्टिक अणि चविस्ट ओल्या काजूची उसळ.

साहित्य

 • १ १/२ कप ओले काजू (उजवीकडच्या छायाचित्रात सालं काढलेले काजू दाखवले आहेत) (उपलब्ध नसतील तर न खारवलेले, सुके काजू दोन तास पाण्यात भिजत घालून वापरावेत.)
 • २ मध्यम कांदे,
 • ४ लसणीच्या पाकळ्या,
 • ३ हिरव्या मिरच्या,
 • १ चमचा गरम मसाला
 • १/२ चमचा चिंचेचा कोळ/२ कोकमं,
 • १/४ कप ओलं खोबरं,
 • कोथिंबीर सजावटीसाठी,
 • मीठ,
 • आवडत असल्यास गूळ किंवा साखर,
 • फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल,
 • १ चमचा हळ्द, १/४ चमचा हिंग
 • २ चमचे मोहरी

Method

 1. ओले काजू वापरणार असाल तर थोडा वेळ गरम पाण्यात भिजत घालावेत, म्हणजे सालं सहज निघून येतील.
  (सालं काढणं जरा किचकट काम आहे. पण जीभेचे चोचले पुरवण्यासाठी थोडे कष्ट घ्यायला काय हरकत आहे, नाही का? 🙂 )
 2. सालं काढून काजू पाण्यात स्वच्छ चोळून धुऊन घ्यावेत.
 3. कांदा बारीक चिरावा. लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात. मिरच्या चिरून घ्याव्यात.
 4. कढईत किंवा पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी तडतडू द्यावी. मग हळ्द व हिंग घालावे.
 5. लसूण आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. लसूण लाल होऊ देउ नये. लगेचच कांदा घालून लाल होईपर्यंत परतावा.
 6. मग काजू घालून जेवढी पातळ हवी तेवढे पाणी घालावे. काजू व्यवस्थित शिजेपर्यंत झाकण ठेवावे.
 7. आता त्यात गरम मसाला, चिंच/कोकमं, मीठ, गूळ घालावा.
 8. खोबरं घालून ढवळावे.
 9. वर कोथिंबीर पेरून पोळी/भाकरी किंवा भाताबरोबर ओल्या काजूची उसळ वाढावी.
Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , • Polls

  महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

  View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu