माझे मन वेड़े आहे ,
क्षणा क्षणाला ते रडत असते ,
बोलायला ते घाबरते ,
कारण माझे मन वेड़े आहे .
माझ्या मनिचा अबोला समजाया इथे कोणी नाही .
असे का होते तेच मला कळत नाही ,
कारण माझे मन वेड़े आहे .
रस्त्ता ओळखीचाच आहे ,
पण कुठे जायच तेच मला कळत नाही ,
कारण माझे मन वेड़े आहे .
नदीला सुद्धा माहित आहे की ,
सागराला तिची ओढ़ आहे ,
कीनारयावर तो तिची वाट पाहत आहे ,
म्हणुनच नदी पण खल खल करत सागराला जून भेटते .
मला माहिती आहे की माझ्या आयुष्यात खुप अंधार आहे ,
म्हनुनच चांदनिचा प्रकाश बनुन तू माझ्या आयुष्यात येशील का .
स्वप्न सुद्धा खरे होतात ,असे आहे मी एकले .
मग माझे स्वप्न खरे होइल का ,
तेच मला कळत नाही .
कारण माझे मन वेड़े आहे .