Garlic Chutney :
Garlic chutney made with the garlic cloves and red chilli powder, coconut, chopped onion, peanuts is taste enhancing. This garlic chutney is used in the chat recipes. This chutney stays good for 2-3 days.
बनवा लसणीची चटणी, खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेली लिस्ट च वापर लसणीची चटणी बनवण्या करीता करा अणि सम्पूर्ण परीवाराला खायला दया पौष्टिक अणि चविस्ट लसणीची चटणी.
साहित्य
- १/४ कप सुकं खोबरं ,
- १ टेबलस्पून तीळ,
- १/४ कप लसणीच्या पाकळ्या,
- १/४ कप चिरलेला कांदा,
- ४ चमचे किंवा अधिक लाल तिखट
- १ टेबलस्पून भाजून सोललेले शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचं कूट,
- १/२ चमचा चिंचेचा कोळ,
- मीठ,
- चमचाभर तेल
Method
- प्रथम एका कढईत सुकं खोबरं तांबुस रंगावर कोरडंच भाजून घ्यावं.
- खोबरं वेगळं काढून त्याच कढईत तीळ सोनेरी रंग येईपर्यंत भाजावेत.
- कढईत एक चमचा तेलावर लसूण पाकळ्या किंचित म्हणजे सोनेरी होईपर्यंत भाजाव्यात.
- मग चिरलेला कांदा भाजावा. छान लाल होऊ द्यावा.
- आता सगळे भाजलेले जिन्नस, शेंगदाणे किंवा दाण्याचं कूट, चिंच, लाल तिखट, मीठ हे एकत्र खलबत्त्यात कुटावं.
- खलबत्ता नसेल तर चॊपर किंवा मिक्सर वर चटणी भरड वाटून घ्यावी.
कुठल्याही जेवणाची लज्जत वाढवणारी आपली मराठमोळी लसूण चटणी… मग बरोबर पोळी असो नाहीतर भाकरी, घावन, डोसे किंवा साधा आमटी भात. हमखास भाव खाऊन जाते!
1 Comment. Leave new
Khup Chhan ……….