![]() |
देवानंद यांचा परिचय | |
सदाबहार , चिरतरुण , चॉकलेट हिरो असे ज्यांचे वर्णन केले जायचे ते ज्येष्ठ सिनेअभिनेते देवानंद ( ८८ ) यांचे लंडन येथे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अखेरच्या क्षणी देवानंद यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुनील आनंद होता.
पंजाबमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यात २६ सप्टेंबर १९२३ रोजी जन्मलेल्या देवानंद यांचे मूळ नाव देवदत्त पिशोरीमल आनंद असे होते. बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. लाहोरच्या प्रसिद्ध सरकारी कॉलेजमध्ये १९४२ मध्ये इंग्रजी साहित्यात ग्रॅज्युएशन केले. याच कॉलेजमध्ये त्यांची ओळख बलराज साहनी , बी. आर. चोपडा , आणि खुशवंत सिंह या भविष्यात खूप मोठ्या झालेल्या व्यक्तींशी झाली. |
||
Legend of Bolliwood…. One Great Indian……………….Jai Hind Jai Bharat….