लाल भोपळ्याची बाकर भाजी




Pumpkin Bakar Bhaji :

Learn how to make pumpkin bakar bhaji in easy and quick way. In this post the list of ingredients and method to prepare this recipe is available. You can check the procedure for preparing it.

bakar bhaji bhoplyachi

बनवा लाल भोपळ्याची बाकर भाजी, खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेली लिस्ट च वापर लाल भोपळ्याची बाकर भाजी बनवण्या करीता करा अणि सम्पूर्ण परीवाराला खायला दया पौष्टिक अणि चविस्ट लाल भोपळ्याची बाकर भाजी.

साहित्य

  • १ १/२ पाऊंड लाल भोपळा (साधारण पाऊण किलो)
  • १/४ कप सुकं खोबरं ,
  • १ टेबलस्पून तीळ,
  • २ टेबलस्पून खसखस,
  • २ टेबलस्पून चारोळी,(ऐच्छीक)
  • २ लसणीच्या पाकळ्या,(ऐच्छीक)
  • १ चमचा काळा मसाला,
  • २ चमचे लाल तिखट,
  • १ चमचा हळद,
  • १ चमचा मोहरी,
  • १/२ चमचा मेथीचे दाणे,
  • १ चमचा गूळ,
  • १/२ चमचा चिंचेचा कोळ,
  • १/४ चमचा हिंग,
  • मीठ चविनुसार,
  • ३ टेबलस्पून तेल,
  • ओलं खोबरं-कोथिंबीर सजावटीसाठी.

Method

  • प्रथम एका कढईत तीळ सोनेरी रंग येईपर्यंत भाजावेत.
  • तीळ वेगळे काढून त्याच कढईत सुकं खोबरं, चारोळी आणि खसखस एकत्र तांबुस रंगावर कोरडंच भाजून घ्यावं.
  • वरील सर्व जिन्नस आणि लसूण बारीक वाटून घ्यावं.
  • भोपळ्याची साल काढून भोपळा धुऊन घ्यावा व त्याचे चौकोनी तुकडे करावेत.
  • कढईत तेल तापवून त्यात मोहरी, मग मेथीचे दाणे घालावेत. हिंग, हळद घालावी. भोपळ्याच्या फोडी घालून नीट ढवळून घ्यावे. १ कप पाणी घालावे व झाकण ठेवून शिजत ठेवावे.
  • भोपळ्याच्या फोडी शिजत आल्या की त्यात वाटलेला मसाला, काळा मसाला, चिंच, गूळ, तिखट, मीठ घालावे आणि ढवळून भाजी दोन मिनिटे शिजू द्यावी.
  • वरून खोबरं कोथिंबीर पेरून पोळी किंवा भाताबरोबर वाढावी.
Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड