उगवला नारायण
झाला प्रकाश प्रकाश
काळयाचे पांढरे तांबुस
झाले आकाश आकाश
दिनकर वर येता
तेजोमय झाल्या दिशा
लाल सोनेरी जरीच्या
भासती या तशा
रांग पाखरांची थेट
कशी निघाली चराया
ऐकू येऊ लागे ओवी
धान घेता ते दलाया
रान पाखर ही सारी
आपापल्या कामा जाती
उन्ह शेकत राहिली
कशी गवताची पाती
कशी गवताची पाती