सूर आनदघन ;
सूर ओंकारधन .
सूर संवेदना , सूर ही चेतना ,
सूर ही साधना ,सूर आराधना ;
सूर आनंदवन ;
सूर ओंकारधन ,सूर आनदघन.
धर्म हे ,वंश हे ,देश ,भाषा किती ,
सर्व सीमा सहज सूर ओलंदिती;
सूर करी मुक्त मन ;
सूर ओंकारधन ,सूर आनदघन.
मुक्तीच्या मंदिरी सूर ही देवता ,
सूर तिमिरात या दीप हो देवता ;
सूर तेजोभवन;
सूर ओंकारधन ,सूर आनदघन…..
मंगेश पाडगावकर