सरे रात्र अंधाराची

Like
Like Love Haha Wow Sad Angry

सरे रात्र अंधाराची , उजरला किनारा ,
आज नव्या घेउन आशा ये पहाटवारा .

प्राण ग्रासनरी आता संपली निराशा ,
उघडले फुलांनी डोले , पलावली आशा ,
जागवित ये पंखाना नभाचा इशारा ,
सरे रात्र अंधाराची ,उजलला किनारा .

नवी दिशा शोधित आता गल्बते निघाली ,
शुभ्र या शिदाना सराय शितिज हाक घाली ,
निथलला नव्या तेजाने आसमंत सारा ,
सरे रात्र अंधाराची , उजलला किनारा .

नवी चेतना प्रानांना , नवा श्वास आहे ,
पुढे पड़े पाउल आता , नवा ध्यास आहे ,
तमावारी या तेजाच्या कोसलल्या धारा ,
सरे रात्र अंधाराची , उजलला किनारा .

मंगेश पाडगावकर

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories