ने सजनाच्या गावा रे ,
पेलथडीच्या कलोखातुंन ऐकू येतो पावा रे .
मेघ अनावर, वाट निसरड़ी ,
पाय कसा उचलावा रे ?
ने सजनाच्या गावा रे !
नदीस नहीं दया जराही ,
कसा भरवसा द्यावा रे ?
ने सजनाच्या गावा रे !
कले आतुनी भेटेलच मज
माझा प्राणविसावा रे ,
ने सजनाच्या गावा रे !
विश्वास तुझ्या होड़ीवरती ,
तुझाच करिते धावा रे ,
ने सजनाच्या गावा रे ……
मंगेश पाडगावकर