जिव तुझ्यावर जडला
हा जिव तुझ्यावर जडला ,
मी मिटूनी घेतले डोले ,
पाउस फुलांचा पडला .
पारिजात बहरत होता ,
आणि सुगंध लहरत होता ,
पण श्वास तुझास्तव जडला .
उमलली रात्र अनुरागे
अन हलव्या झाडामागे
तीज चन्द्र सुखाचा भिडला ,
हा जिव तुझ्यावर जडला .
ही अबोल माझी प्रीति
का तुला कलेल कधी ती ?
छलितेस प्रश्न हा मजला ,
हा जिव तुझ्यावर जडला …..
मंगेश पाडगावकर