आठवते का सांज तुला ती

Like
Like Love Haha Wow Sad Angry

आठवते का सांज तुला ती पाउसओली ?
भिजलेल्या रंगात आपुली ओळख झाली .

शहारल्या गवतावर लाटा,
पावलात अडखर्ळल्या वाटा,
लाजत लाजत भिजली होती एक अबोली .
आठवते का सांज तुला ती पाउसओली ?

बघता बघता भिजली पाने ,
सुगंधमंथर झाली राणे ,
सरित रिमझिम वर बगर्ळयांची मार्ळ बुडाली.
आठवते का सांज तुला ती पाउसओली ?

मधेच बिजली वर जगमगली ,
भिउनी एक सर मला बिलगली ,
आणि उमगली थेंबांची थरथरती बोली .
आठवते का सांज तुला ती पाउसओली ?

मंगेश पाडगावकर

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories