5
फुलासारखे तळवे तुझे
फुलावरच पडू दे.
तुझ्या हातून जगाची
अमाप सेवा घडू दे.
धावताना कधी कधी
ठेच हि लागणारच.
रस्ताही कधी कधी
शत्रू होऊन वागणारच.
तू मात्र स्वतः कधी
अपमानित होऊ नकोस.
स्वाभिमान कुणालाही
कधीच विकू नकोस.
बगळ्याची नजर तुझी
वादळापासून सावध रहा.
मंजिल दूर असली तरी
तू सद्देव धावत रहा.
विचारांचा धागा मात्र
आयुष्यभर जपत रहा.
जन्मावर प्रेम करत
आनंदाने जगत रहा.
सुखाच्या त्या वसंतात
मला मात्र विसरू नको.
माझ्या आयुष्यात नुसतच
आठवणीपुरता उरू नको.
मी कुठे म्हणतोय मला
कुर्निसात करत जा?
दिसलोच कुठे चुकून तर
ओळख मात्र दाखवत जा.
प्रो . कविकुमार
5