माह्या डोकस्यावरती छत राहु दे…

Like
Like Love Haha Wow Sad Angry

मांगल्या वर्षी लइ
सोय तुही केली
राबलो ऊन्हीतान्ही
चिखलामंधी नाचलो मी
माह्या बापही तवा
लइ बेरहम झाला
त्यानबी इतकुसाच घास दिला
काही दिवस बरसला
अन् तसाच निघुन गेला
पन …माई तवाबी
तुइच माया लागली
थोडिकसी का व्हयेना
माई जवारी तेवढी पिकली
पन यंदा काय व्हते
कोनाले माहित…
यंदा बी माह्या बाप
रागवुन हाय माह्यावर…
भागवुन देतो थोडिसी तहान
अन् मंग मध्येच
मले इसरुन जातो
मांगल्या वर्षी माही पोरं
अर्ध्यापोटीच राह्यची
यंदातरी त्याइले
पोटभरुन जेवु दे…
जसी मले माह्या
लेकरायची चिंता
तसी तुलेबी आहे माई…
आनखी काय बी नाइ
मांगत तुले..
माह्या डोकस्यावरती छत राहु दे..
तुह्या मायेचं…
अन् माई यंदातरी पोट भरु दे
तुह्या लेकरांचं…

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories