अण्णांना सरकारचा इशारा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

७२ तासांपेक्षा जास्त उपोषण केले तर कारवाई
anna-hazare vs corruption
anna-hazare image
नवी दिल्ली, दि. १२ – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना उपोषणासाठी फक्त ७२ तासांची परवानगी दिल्ली सरकारने दिल्याचे सरकारी सूत्रांनी आज सांगितले. सशक्त लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे १६ ऑगस्टपासून दिल्लीत बेमुदत उपोषण करणार आहेत. दिलेल्या मुदतीनंतरही अण्णांचे उपोषण सुरूच राहिल्यास सरकार कारवाई करील, असेही सांगण्यात आले. दिल्लीत जयप्रकाश नारायण पार्कमध्ये उपोषण करण्यास टीम अण्णाला परवानगी देण्यात आली आहे.  उपोषणासाठीची पुढील परवानगी मागणारा प्रस्ताव दिल्ली सरकारने सीपीडब्ल्यूडीकडे पाठविला आहे. 

भ्रष्टाचाराविरुद्ध दुस-या स्वातंत्र्यलढ्याचा जागर मांडणा-या अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आहे. १६ ऑगस्टपासून जतंरमंतर येथे होणा-या अण्णांच्या उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली. जयप्रकाश नारायण पार्क येथे परवानगी देण्यात आली तिही फक्त ३ दिवस. जनतेचा आंदोलनाचा अधिकार नाकारणे ही लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दात अण्णांनी सरकारच्या या कृतीचा निषेध केला आहे. असे पत्रच त्यांनी पंतप्रधानांना दिले आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu