मंगला गौरी आरती




Like
Like Love Haha Wow Sad Angry
26

Mangla-Gauri-Aarti

II Mangla Gauri Aarti II
II मंगला गौरी आरती II
Mangla Gauri mata
आरती मंगळागौरीची
जय माये मंगळागौरी l तुजला पूंजू अंतरी l
नाना विधीउपचारी l दीप ओवाळू सुंदरी ll जय.ll धृ.ll
मंगळागौरी नाम तुझे l तुला नमन असो माझें l
भव:दुखाचे हे ओझे l देवी उतरावे सहजे ll जय.ll १ ll
गजाननाची तू माता l शंकराची प्रियकांता l
हिमाचलाची तूं दुहिता l मज तारिं वो आता ll जय.ll २ ll
आले वो तुझ्या चरणापाशी l जाळी पापांचियां राशी l
भक्ति ठसावी मानसी l अंबे न्यावे पायांपाशी ll जय.ll ३ ll
गौरी ओवाळीते दीप l नेणे तुझे नाम रूप l
वाढवावे सौभाग्य अमूप l विश्वाची तूं मायबाप  ll जय.ll ४ ll
रिकामी ही खटपट l शुद्ध मार्गी लावी नीट l
परब्रह्म धनदाट l धावी नारायणी भेट l
जय माये मंगळागौरी l तुजला पूंजू अंतरी ll ५ ll

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
26




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu