खेड्यामधले घर कौलारु




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Khedyatle Ghar marathi song

खेड्यामधले घर कौलारु

आज अचानक एकाएकीं । मानस लागे तेथे विहरुं
खेड्यामधले गह्र कौलारु ॥धृ॥

 

पूर्व दिशेला नदी वाहते । त्यात बालपण वहात येते
उंबरठ्याशी येऊन मिळते । यौवन लागे उगा बावरु ॥१॥

 

माहेरची प्रेमळ माती । त्या मातीतून पिकते प्रीती
कणसावरची माणिक मोती । तिथे भिरभिरे स्मृती-पांखरु ॥२॥

 

आयुष्याची पाऊलवाटा । किती तुडविल्या येता जाता
परि आईची आठवण येता । मनी वादळे होति सुरु ॥

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu