6
श्री विष्णूची आरती
ओवाळू आरती मदन गोपाळा | श्यामसुंदर गला वैजंतीमाळा ||धृ|
चरणकमळ ज्याचे अति सुकुमार | ध्वजवज्रकुश बिद्राचा तोडर ||१||
नाभिकमल ज्याचे ब्रम्हयाचे स्थान | हृदयी पदक शोभे श्रीवत्सल लंचन ||२||
मुखकमल पाहंता सुखाचिया कोटी | वेधीयेले मानस हरपली दृष्टी ||३||
जडित मुकट ज्याचा देदीप्यमान | तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन ||४||
एका जनार्दनी देखियले रूप | रूपपाहता जाहले अवघे तद्रूप ||५|| ओवाळू आरती ||
Source :
Marathi Unlimited
6