MARATHI JOKES FOR KIDS
आई – बाळा एक ग्लास पाणी घेऊन ये रे
रवी – देशाला स्वतंत्र मिळाले आहे, मी काही गुलाम नाही
आई – गाढवा, तू दूध माघ मग मी सांगते
मम्मी तू पप्पांना ऑक्शन कधी करणार?
ऑक्शन नाही रे गाढवा, औक्षण
पोलिस : सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड.
चालक : तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड.
पोलिस : ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.
शिक्षक : चिंटू तूला १० वी त ९४ % मार्क्स मिळाले त्याचे रहस्य काय ?
चिंटू : त्याचे श्रेय मि माझ्या आई बाबांना देतो, कारण आई बाबा सतत व्हाट्सएप आणि फेसबूक वर असल्यामूळे घरात भांडणे होत नव्हती आणि त्यामूळे मी शांतपणे अभ्यास करु शकलो.
बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार आहे..
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो.
लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा.
बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता.
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..
कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा ABP माझा.
बाबा – येवढे कमी मार्क्स ?? दोन कानाखाली लावल्या पाहिजे
गण्या– हो बाबा, चला लवकर, मी तर मास्तरचं घर पण बघुन ठेवलय
शिक्षक : उशीर का झाला शाळेत यायला?
चिंटू : आई बाबा भांडत होते
शिक्षक : त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?
चिंटू : माझा एक बूट आईच्या आणि दुसरी बाबांच्या हातात होता
तो तिला म्हणाला,
जीना सिर्फ मेरे लिए!
ती म्हणाली,
“ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते,
तू ये जिन्याने !”
योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
योगेश : ते नंतर, आधी पोहे, चहा
आणि मुलगी बघणे तर होऊ द्या.
मग बसू !
एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात
रिक्षावाला म्हणतो, “इतके लोक रिक्षेत नाही मावणार”
तर त्या मांजरी काय म्हणाल्या? विचार करा… अरे विचार काय करताय?
सोप्पय उत्तर. त्या म्हणाल्या, “माऊ माऊ”
५ मुलांना एका बाईक वर पाहून ट्राफिक पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला.
एक मुलगा म्हणाला, “आधीच पाच जण बसलेत… तुम्ही कुठे बसणार?”
चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?
झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.
चिंगी: कितीजण होते धावायला?
झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी !
नवरा : अगं, ऐकलस का,
छातीवरचे पांढरे केस दाखविल्यामुळे आज
मला सिनिअर सिटीझन्स पेन्शन मंजूर झालीय.
बायको : चड्डी काढून दाखवली असती तर,
अपंग सर्टिफिकेट पण मिळालं असतं..
मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.
मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण
आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत.
आई: हरामखोर,
त्या तुझ्या मावश्या आहेत.
गुरुजी : औषधांच्या गोळ्यांचे पाकीट १० गोळ्यांचेच का असते? आणि ही पध्दत कधी पासून सुरु झाली?
मनोज : रावनाला डोकेदुखी सुरू झाली तेव्हा पासुन
मुलगा : आई मी मित्राकडे खेळायला जाऊ?
आई : बाबांना विचार.
मुलगा : बाबा मी मित्राकडे खेळायला जाऊ?.
बाबा : आईला विचार
मुलगा : च्यायला, हे घर आहे की तलाठ्याचं ऑफिस
गुरुजी : काय समजले नसेल तर विचारा.
बंड्या : गुरुजी फळा पुसल्यावर
फळ्यावरील अक्शरे कोठे जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?
बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.?
मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली.
मनोज : आरे रवी तू सामोसा मधील आतील भाजीच का खात आहेस?
रवी : कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये
बंड्या : मी दहा दिवस झोपलो नाही
गण्या : का बरं ?
बंड्या : अभ्यास करण्यासाठी
गण्या : असं कसं जमलं तुला ?
बंड्या : अरे, मी रात्री झोपायचो ना
सुरेश : काल रात्री मी इतिहासाच्या पुस्तकावर दहा तास घालवले
रमेश : काय, दहा तास ?
सुरेश : हो, रात्री पुस्तक उशाला घेऊनच झोपलो होतो
एक गोंडस मागणी….
एक छोटासा मुलगा आईवर चिडून घराबाहेर बसला होता
बाबा म्हणाले, “काय झालं बाळा?”
मुलगा : तुमच्या बायकोशी माझे पटत नाही. मला माझी बायको पाहिजे… विषय संपला