सुके मटण-Dried meat
साहित्य: –
500 ग्रॅम मटण
1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
1 चमचे आले लसूण पेस्ट
कांदा खोबऱ्याचे वाटण (link)
1 चमचा हळद
१ चमचा धणे जिरे पूड
१ चमचा गरम मसाला
१ चमचा मटण मसाला
2 चमचे एव्हरेस्ट लाल तिखट
२ चमचा तिखट मसाला (दररोजच्या जेवणात जो वापरतो तो)
१ चमचा कांदा लसूण मसाला
कोथिंबीर
2 तेजपत्ता
तेल
मीठ
कृती: –
१) मटण घ्या आणि ते स्वच्छ पाण्याने ४ वेळा धुवा.
२) मटण मॅरीनेट करण्यासाठी त्यात हळद, मीठ, आले-लसूण पेस्ट घाला आणि कमीतकमी १ तासासाठी बाजूला ठेवा.
३) गॅस चालू करा आणि कढई गरम करा. कढई गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि तेजपत्ता घाला.
४) कांदा तळून झाल्यावर त्यात कांदा खोबऱ्याचे वाटण घाला आणि २-३ मिनिटे फ्राय करून घ्या.
५) नंतर त्यात हळद, धना जिरे पूड, गरम मसाला, एव्हरेस्ट तिखा लाल, मटण मसाला, घरगुती तिखट मसाला (जो आपण रोज जेवण करताना वापरतो) , कांदा लसूण मसाला घाला आणि फ्राय करून घ्या.
६) त्यानंतर मॅरीनेट केलेले मटण घाला आणि मंद आचेवर १५-२० मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या. (या टप्प्यावर पाणी घालू नका)
७) १५-२० मिनिटांनंतर झाकण काढून घ्या आणि नीट ढवळून घ्यावे आणि थोडेसे पाणी आणि कोथिंबीर घालावी आणि परत नीट ढवळून घ्यावे, परत मंद आचेवर १५ मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या.
८) १५ मिनिटानंतर गॅस बंद करा. आता आपलं सुक मटण तयार आहे.
९) सुक मटण ज्वारीची भाकरी, तांदूळची भाकरी, बाजरीची भाकरी बरोबर खावू शकता.