जीवनात सतत यशस्वी होण्याची कारणे




Like
Like Love Haha Wow Sad Angry
3

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करायला हवे याचा विचार करा
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्याची आस असते. पण, यशस्वी होणे म्हणजे नेमके काय? तर, आपल्या मनातून आपण ठरवलेले ध्येय आपण साध्य करणे म्हणजे यशस्वी होणे. पण, असे अनेक लोकांच्या बाबतीत घडत नाही. ध्येय तर हे लोक ठरवतात. पण, ते पूर्ण मात्र करू शकत नाहीत. यामागे बरे कारण काय असेल…? खरेतर येथेच मेख आहे. आपण यशस्वी का होत नाही यावर विचार करण्यापेक्षा आपण यशस्वी होण्यासाठी काय करायला हवे यावर विचार करायला हवा.आपल्या जीवनात आलेले अपयश हेच सिद्ध करते की, यशस्वी होण्यासाठी योग्य प्रयत्न आपण केले नाहीत. म्हणूनच यशस्वीतेकडे जीवनाला न्यायचे असेल, तर जगभरातील यशस्वी लोकांचा अभ्यास करा. त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. यशस्वी होण्यासाठी त्यांनी काय काम केले किंवा काय मार्ग वापरला याचा बारकाईने अभ्यास करा. जीवनात त्यांना काम करा किंवा न करा पण त्यांचा अभ्यास नक्की करा त्यांचे मार्ग अवलंबण्याचे प्रयत्न करा.

आपल्या शरीराकडून जो व्यक्ती आयुष्यात नेहमीच योग्य कष्टाची अपेक्ष करतो, योग्य कारणासाठी आपली शक्ती खर्च करतो त्या माणसाला यशापासून कोणतीच शक्ती रोखू शकत नाही. पण जो व्यक्ती तशी अपेक्षा आपल्या शरीराकडून न ठेवता कामचुकारपणा, आळस, कंटाळा, पाट्या टाकण्याचे काम करतो, तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही.

एका रात्रीत कोणताही व्यक्ती यशस्वी होत नाही. कष्ट आणि निष्टेचे खत त्यासाठी घालावे लागते. हे सर्व करत असताना माणसाचा आत्मविश्वास कामी येतो. आत्मविश्वास ज्याच्या मनात ठासून भरला आहे. कोणतेही काम त्याला अशक्य नसते. या लोकांची कार्यपद्धती लाथ मारीन तेथे पाणी काढील अशी असते. यश अशा लोकांना लवकर भेटते.
आपल्या ध्येयाकडे न थांबता न थकता जो व्यक्ती चालत राहतो त्याला आपले ध्येय कधीच दूर नसते. काहीही झाले तर हे लोक आपले ध्येय मिळवतातच मिळवातात. जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी ठेवा. कारणे सांगत बसू नका. तुम्हाला कारणे मागे खेचतील. पण विचार तुम्हाला ध्येयाप्रती पोहोचण्यास मदत करते. अल्पसंतृष्ट राहू नका- अनेक लोकांना अल्पसंतृष्ट राहण्याची भारी हौस असते. जे लोक मिळाले आहे त्यात धन्यता मानतात. पण, एवढ्याने तुमची स्वप्ने साकार होत नाहीत. त्यासाठी सतत आपली महत्वाकांक्षा वाढती ठेवायला हवी.

जीवनात सतत यशस्वी होण्याची कारणे
आम्ही आयुष्यामध्ये अनेकदा सतत यशच मिळवत राहतो आणि या गोष्टीचा आपल्याला पत्ताही लागत नाही की, आम्ही सतत यशस्वीच होत आहोत. आयुष्यात सतत यशस्वी होण्याची काही कारणे असतात. त्याचा आढावा.

यशस्वी होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण हे की तुम्ही तुमच्या जीवनाचा जो मार्ग बनवला आहे, त्याच मार्गावरून चालत आहात. तुम्ही तुमचा जीवन मार्ग बनविण्याचे धारिष्ट्य दाखवले आहे आणि हेच तुमच्या यशस्वितेचे कारण आहे. अनेक गोष्टी आणि परिस्थितीमुळे तुम्ही घाबरता, परंतु मनातील या भीतीवर मात करण्याचे तुम्ही शिकला आहात. हळूहळू अनुभवाने तुम्ही तुमच्या मनातील विविध प्रकारच्या भीतींवर मात केलेली आहे.मोठे यश मिळविताना आपण अनेक वेळा अयशस्वी होतो, परंतु या अपयशामुळे खचून न जाता तुम्ही त्यातून मार्ग काढता आणि पुढे जाता.तुम्ही प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी शिकता आणि प्रत्येक दिवशी स्वत:ला बळकट समजता तुमच्यावर कोणी प्रेम करो किंवा ना करो सर्वात प्रथम तुम्ही स्वत:वर प्रेम करत असतात. तुम्ही सर्वांशी खुलेपणाने भेटता आणि कोणाबद्दलही पूर्वग्रहदूषित विचार करत नाही. तसेच कोणतीही धारणा मनात बनवत नाहीत. तुमच्यामुळे अनेक लोकांच्या चेह-यावर हास्य येते ही गोष्ट तुम्हाला चांगली माहीत झालेली आहे. अनेक लोकांच्या हास्याचे कारण तुम्ही आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सगळेच नाही पण जितके लोक बघितले, तेवढे सगळे लोक अफलातून आहेत. प्रत्येक माणसाकडून तुम्ही काही ना काही शिकलेले आहात. जे लोक तुमचे घनिष्ठ मित्र आहेत, त्यांच्यावर प्रेम करताना तुम्ही स्वत:ला विसरून जाता. पश्चात्तापाच्या ओझ्याखाली काम करणे तुम्ही सोडून दिलेले आहे. जे तुम्हाला पसंत आहे, तेच काम तुम्ही करता. दुस-याच्या पसंतीनुसार तुम्ही काम करीत नाही. दुस-यावर प्रभाव टाकण्यासाठी तुम्ही जास्त पैसे खर्च करीत नाही. तसेच दुस-याला समाधानी बनवण्याचा प्रयत्न करीत नाहीत.तुम्ही दुस-याचा मान तर जरूर राखता, त्याच्याअगोदर स्वत:चा मान जास्त राखता. स्वत:चे महत्त्व, तुम्हाला चांगले कळते. तुम्हाला ही गोष्ट चांगल्या पद्धतीने माहीत आहे की दुस-याला खुश करण्याची गरज नाही, तसेच तसे काही करण्याचा तुम्ही प्रयत्नही करीत नाही.जीवनात यश आणि आनंद मिळविण्यासाठी यश काही प्राप्त करणे महत्त्वाचे नाही तर जे काही मिळाले आहे, त्याचाच चांगल्या पद्धतीने उपयोग करणे महत्त्वाचे आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा