यशाची गुरूकिल्ली मिळवण्यासाठी करा या 10 गोष्टी
Like
Like Love Haha Wow Sad Angry
4

यशाची गुरूकिल्ली मिळवण्यासाठी करा या 10 गोष्टी

जेव्हा यशाचा विषय असतो तेव्हा प्रत्येकाला वाटतं की, मला भरपूर यश मिळावं. माझ्याकडे भरपूर पैसे असावेत, मला प्रसिद्धी मिळावी इ. पण ते स्वतःच्या वागण्यात आणि सवयींमध्ये योग्य ते बदल करण्यास तयार नसतात. याच कारणामुळे ते यशापासून नेहमी दूर राहतात. या लेखात आम्ही तुमच्यासाठी आयुष्याशी निगडीत 10 गोष्टी सांगणार आहोत. जे तुम्ही फॉलो केल्यास तुम्हाला यशाची गुरूकिल्ली नक्कीच गवसेल. कारण यश हे तुम्ही काय करता त्यावर अवलंबून असतं. जे तुम्ही करता त्याप्रमाणेच तुम्ही घडत असता. त्यामुळे तुमच्या सवयी बदलणं गरजेच आहे. फक्त गौतम बुद्ध यांची माहिती असून उपयोग नाही. त्यांच्यासारख्या अनेक महान व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टी दैनंदिन जीवनात आचरणात आणल्या पाहिजेत.

1) यश आणि शिस्त (Success and Discipline)
मित्रांनो कोणत्याही कामात शिस्त एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत यशस्वी बनवू शकते. मग तुमच्यामध्ये टॅलेंट असो वा नसो. यशासाठी शिस्त असणं गरजेच आहे. जेव्हा तुम्ही एखादं काम शिस्तपूर्णरितीने करता तेव्हा तुम्हाला मिळणारं यश हे अवर्णनीय असतं.शिस्त आपल्याला जीवनात पुढे जाण्याचा योग्य मार्ग दाखवते. जर एखादी व्यक्ती आपल्या कार्यात शिस्तप्रिय नसेल तर ती व्यक्ती कितीही प्रतिभाशाली किंवा मेहनती असली तरी तिला यश मिळू शकत नाही. शिस्तही तुम्हाला नेहमी जगापासून वेगळं बनवत असते. त्यामुळे प्रत्येक काम हे शिस्तपूर्ण पद्धतीने करावं. जोपर्यंत तुमच्यामध्ये शिस्त आहे तोपर्यंत तुमच्याजवळ यश असेल. जर तुम्ही शिस्तपूर्ण मार्ग सोडलात तर तुम्हाला यश गवसणार नाही.

2) यश आणि आत्मशिक्षण (Success and Self Education)
आपल्या पृथ्वीतलावर अनेक महान लोकं होऊन गेले आणि जितके महान पुरूष होऊन गेले तितक्यांनी आत्मशिक्षणाच्या साहाय्याने आपल्या जीवनात यश प्राप्त केलं. जसं गौतम बुद्ध यांची शिकवण. Self Education किंवा आत्मशिक्षणाने फक्त तुम्हाला शिकायला मिळतं असं नाही. तर तुमचा आत्मविश्वासही वाढतो आणि विचार करण्याची क्षमताही वाढते. ज्यामुळे तुम्हाला यश मिळण्याची शक्यता वाढते. आत्मशिक्षणाने तुम्ही तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तर स्वतःच मिळवू शकता. कारण या परिस्थितीत तुमचा मेंदू वेगाने काम करतो. त्यामुळे यशासाठी नेहमी आत्मशिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. जे तुम्हाला यश देईल आणि तुमच्या क्षेत्रात महान बनवेल.

3) यश आणि ध्येय (Success and Goal)
एखाद्यापुढे जर ध्येय नसेल तर जगात त्याची काहीच भूमिका नाही. तुम्ही ध्येयाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. यशासाठी ध्येय किंवा लक्ष्य असणं फार महत्त्वाचं आहे. कारण तुमचं ध्येय ठरवतं असतं की, तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य दिशा मिळेल. ज्यामुळे तुमची प्रगती वेगाने होते. जर एखाद्या कडे ध्येयच नसेल तर तो पुढे जाऊ शकत नाही. कारण त्याला कुठे जायचंय हे माहीतच नाही. आयुष्यात ध्येय असल्यास तुम्हाला आनंद मिळतो आणि तुम्ही ते साध्य करण्यासाठी उत्सुक असता. कारण तुमच्यापुढील मार्ग तुमच्यासमोर असतो. त्यामुळे तो तुम्ही भरकटू शकत नाही.जेव्हा तुम्ही ध्येय ठरवता तेव्हा तुम्ही तुमच्या वेळेचा योग्य उपयोग करता. ज्यामुळे तुम्हाला जास्त यश मिळतं. त्यामुळे जीवनात ध्येय असणं खूप आवश्यक आहे.

4) यश आणि धाडस (Success and Risk)
यशासाठी धाडसी निर्णय घेण्याची तयारी असणंही आवश्यक आहे. जर तुम्ही धाडसी निर्णय घेऊ शकला नाहीत तर तुम्ही आयुष्यात काहीच नवीन करू शकणार नाही. ज्यामुळे तुम्हाला एक साधारण व्यक्ती म्हणून आयुष्य कंठावं लागेल. कारण इतिहास त्याच व्यक्ती घडवतात ज्या काहीतरी नवीन करतात आणि नवीन गोष्ट तेव्हाच घडते जेव्हा धाडसी निर्णय घेतले जातात. नाहीतर एकमेंकाची नक्कल तर जगभरात केलीच जाते. त्यामुळे रिस्क म्हणजे धाडस करायला घाबरू नका. कारण रिस्क सगळीकडेच आहे. जर तुम्ही रिस्क घ्यायला घाबराल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही.

धाडसी निर्णयांनी तुम्ही एक हटके व्यक्तीमत्त्व बनता. ज्यामुळे तुम्हाला खूप यश मिळतं. जे साधारण व्यक्तीपेक्षा जास्त असतं. तुम्ही स्वतः तुमची सीमा तोडू शकता. धाडस करणं हे योग्य आहेच. पण एका गोष्टीची काळजी घ्या की, चुकीच्या गोष्टीसाठी कधीही धाडस करू नका. कारण चुकीचं काम कधीच करू नये.

5) यश आणि आयुष्य नियोजन (Success and Time Management)
तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वतः डिजाईन करा आणि प्लॅन करा. नाहीतर कोणीतरी दुसरा ते तुमच्यासाठी करेल. आपलं आयुष्य हे आपल्या मनाप्रमाणे जगावं. जे तुम्हाला आवडतं, जे तुम्हाला व्हायचं आहे तेच करा. कारण मदारीच्या सांगण्यावर तर माकडही नाचतं. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याचं नियोजच स्वतः करा. ज्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही.

6) यश आणि वेळ (Success and Time)
पैशापेक्षा जास्त मूल्य आहे ते वेळेचं. ज्या दिवशी तुम्हाला वेळेची किंमत कळेल. तेव्हा समजून जा तुम्ही यशाच्या मार्गावर आहेत. आपण एकवेळ हरवलेलं धन पुन्हा मिळवू शकतो पण गेलेली वेळ पुन्हा कोणत्याही परिस्थितीत पुन्हा येत नाही. त्यामुळे वेळेचा योग्य वापर करता आला पाहिजे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वेळेचं नियोजन फार आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कार्य वेळेवर करू शकाल. यशासाठी तुम्हाला वेळेचं मूल्य समजलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही ते समजाल तेव्हा तुम्ही वेळ वाया घालवणं बंद कराल. वेळेची किंमत कळल्यावर तुम्ही कमी वेळात जास्त काम करू शकाल आणि स्वतःचा वेळ चांगल्या कामात घालवाल. परिणामी यश हे मिळेलच.

7) यश आणि शरीराची काळजी (Success and Self Care)
जोपर्यंत तुम्ही निरोगी आणि फिट आहात तोपर्यंत कोणत्याही क्षेत्रात तुम्ही यश मिळवू शकता. त्यामुळे आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. आपल्या आरोग्य आणि शरीरासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता. जसं रोज कमीतकमी अर्धा तास व्यायाम करणे, चांगला आणि पौष्टिक आहार घेणे, वेळेवर नाश्ता आणि जेवण करणे, वाईट सवयी जसं धूम्रपान, तंबाखू सेवन आणि दारूपासून दूर राहावे आणि आपल्या डोक्यातील नकारात्मक विचारांना दूर करावे.मोठ्या यशासाठी आणि यशाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही निरोगी राहणं आवश्यक आहे. नाहीतर तुमचं यश काहीच कामाचं नाही.

8) यश आणि नशीब (Success and Destiny)
कधी कधी तुमचं नशीब तुम्हाला साथ देऊ शकतं पण फक्त नशीबामुळे तुमचं आयुष्य चांगल होईल असं नाही. कारण यशासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनतीशिवाय आयुष्यात काहीच मिळू शकत नाही आणि कठोर मेहनत करण्याऱ्या व्यक्तीला यश मिळवण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. कठोर मेहनतीला कोणताही पर्याय नाही. त्यामुळे यश मिळणं निश्चित आहे. नशीबाच्या भरोश्यावर बसू राहिलात तर तुम्ही प्रयत्न करणं सोडून द्याल. त्यामुळे नशीबाच्या भरोश्यावर बसू नका. हे मूर्खपणाचं ठरेल.

9) यश आणि वाचन (Success and Reading)
यशासाठी तुमच्या ज्ञानात भर पडणे आणि माहितीचीही गरज असते. जे तुम्हाला चांगल्या पुस्तकांच्या वाचनातून मिळेल. पुस्तकं वाचल्याने फक्त ज्ञानातच भर पडते असं नाहीतर विचार करण्याची क्षमताही वाढते आणि तुमच्यातील क्रिएव्हीटीही वाढते. पुस्तक वाचल्याने स्मरणशक्ती वाढते आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रात चांगल करू शकता. त्यामुळे चांगली आणि प्रेरणादायी पुस्तक वाचा.

10) यश आणि जीवनाचे धडे (Success and Life Lessons)
जीवनाचे धडे म्हणजेच वरील लेखात मांडलेले यशाला गवसणी घालण्यासाठी उपयुक्त 9 गोष्टी होय. ज्या तुमच्या आयुष्यात नक्की अंगीकारा. कारण फक्त या गोष्टी वाचल्याने काही होणार नाही. त्यांना रोजच्या जीवनात आचरणात आणण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही बाब नक्कीच जाणून घेतली पाहिजे की, जे तुम्ही शिकता आणि वाचता ते आयुष्यात आचरणातही आणा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
4
, , , , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu