निरोगी आरोग्य राहण्यासाठी टिप्स – Marathi Tips For Health

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

जर आपण कायम निरोगी राहू इच्छिता तर पुढे आपणास निरोगी राहण्यासाठी काय करावे देत आहोत. या टिप्स आपण आपल्या दैनदीन जीवनात सामील करून निरोगी शरीर प्राप्त करू शकतात.
1)पुरेशी झोप घ्या

एका सामान्य शरीराला 7 ते 8 तासांची गाढ झोप आवश्यक असते. 7 ते 8 तासांची झोप घेतल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. म्हणून रात्री 10 वाजेच्या आत झोपण्याचा प्रयत्न करावा व सकाळी 6 च्या आत अंथरुणातून उठून जावे. लवकर झोप येण्यासाठी घरगुती उपाय आपण येथे क्लिक करून वाचू शकता.

 

2)सकाळी उठताच पाणी प्यावे
सकाळी उठल्याबरोबर तोंड आणि दात स्वच्छ न करता एक लिटर पाणी प्यावे. सकाळी उठल्यावर आपल्या लाळेत लायसोझाइम हा पदार्थ तयार झालेला असतो व उठल्याबरोबर वरून एक ग्लास पाणी पिल्याने लायसोझाइम एंजाइम पोटात जाऊन पचन संस्थेची स्वच्छता करतात. म्हणून दररोज सकाळी उठताच तोंड न धुता एक लिटर पाणी हळुवार प्यावे.

3)ऊन अंगावर घ्या


सकाळचे कोवळे ऊन शरीरावर घेतल्याने शरीराला विटामिन-D मिळते. विटामिन डी शरीराची त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाची हेल्थ टीप आहे.

 

4)सकाळी उठल्यावर योग व एक्सरसाइज करा


नियमितपणे सकाळी उठून ध्यान, योगासने आणि प्राणायाम केल्याने शरीरात उत्साह वाढतो, निरोगी शरीरासोबत, चेहरा देखील उजळून निघतो. म्हणून सकाळी उठल्यावर 1 तास व्यायाम आणि योगासने करावीत.

5)सकाळचा नाश्ता जरूर करा


चांगले आरोग्य मिळविण्यासाठी सकाळी सकाळी शरीराला प्रोटीन आणि कार्बोहाइड्रेट मिळणे आवश्यक आहे. जर आपण सकाळी नाश्ता करीत असाल तर शरीरात संपूर्ण दिवस ऊर्जा कायम राहील. म्हणून प्रोटीन युक्त आहार ग्रहण करणे आवश्यक आहे. प्रोटीन युक्त डायट प्लान <<येथे याची माहिती वाचा.

 

6) जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये

अनेक लोकांना जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी पिण्याची सवय असते. परंतु आपणास सांगू इच्छितो की असे करणे फार चुकीचे आहे. जेवण केल्यावर आपले पचन तंत्र आणि जठराग्नी क्रियाशील असतात. शरीरात अन्न पचवण्याकरिता पुरेशी हिट निर्माण झालेली असते. परंतु जर तुम्ही जेवण झाल्यावर लगेजच पाणी पीत असाल तर जठराग्नी मंद होते परिणामी खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही आणि शरीरात ऊर्जा निर्माण होत नाही.

म्हणून जेवण झाल्यावर लगेच पाणी न पिता फक्त गुळण्या कराव्यात आणि एक ते दीड तासानंतर पाणी प्यावे. ही marathi tips for health निरोगी शरीर ठेवण्याकरीता खूप महत्वाची आहे.

7) जेवण बारीक चावून चावून खावे

तोंडात असलेली लाळ (Saliva) अन्नाचे पचन करण्यासाठी फार उपयुक्त आहे. आपण तोंडातील घास जेवढा चावून खावू तेवढीच लाळ त्यात मिसळली जाईल. व जास्तीत जास्त लाळ मिसळल्याने लाळेमधील enzymes अन्नासोबत मिक्स होतील व पचन सुधारेल. म्हणून अन्नाचा कोणताही घास 30 ते 35 वेळा चावावा आणि मगच त्याला गिळावे.

 

8) नेहमी खाली बसून भोजन करावे

भारतीय बैठक म्हणजेच खाली बसून, मांडी वाळून जेवण केल्याने शरीराची पोझिशन नेचुरल होते. या स्थितीत पाठीचा कणा आणि शरीरातील सर्व स्नायू रिलॅक्स झालेले असतात. या पद्धतीत बसून जेवल्याने पचन तंत्र मजबूत होते.

10) शरीराची मालिश


आठवड्यातून एकदा संपूर्ण शरीराची मालिश केल्याने शरीरात नव उर्जेचा संचार होतो. प्रत्येक आठवड्याला संपूर्ण शरीराची मालिश तीळ, सरसो आणि इतर आयुर्वेदिक तेलाने करावी. तेल मालिश केल्याने शरीरातील नसांमध्ये रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो व हाडे मजबूत होतात.

11) धूम्रपान, चहा, कॉफी आणि फास्ट फूड चे सेवन टाळावे
धूम्रपान केल्याने शरीराचे स्वास्थ्य बिघडणे निश्चित आहे. याशिवाय चहा, कॉफी मध्ये देखील caffeine असते जे शरीरासाठी हानिकारक असते. फास्ट फूड खाल्ल्याने शरीराचे वजन वाढायला लागते. म्हणून धूम्रपान, चहा, कॉफी आणि फास्टफूड इत्यादी हानीकारक पदार्थांचे सेवन शक्य तेवढे टाळावे.

12) सकाळ संध्याकाळ फिरावे
दररोज सकाळी व संध्याकाळी फिरण्याची सवय लावून घ्या. चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम आहे. म्हणून दररोज शक्य होईल तेवढे वेगाने चालत जावे. तर मित्रहो ह्या लेखात आपण म्हणजेच निरोगी राहण्यासाठी काय करावे याबद्दलची माहिती प्राप्त केली. आशा आहे की ही मराठी माहिती आपणास उपयुक्त ठरली असेल. या माहितीला आपले कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करून त्यांचेही ज्ञान वाढवा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Related Stories