टोमॅटो खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम




Like
Like Love Haha Wow Sad Angry

टोमॅटो खाण्याचे फायदे
टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक असिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटॅमीन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन ई आणि व्हिटॅमीन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटॅमीन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. व्हिटॅमीन ए ची मात्रा असल्याने टोमॅटो डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. तसंच टोमॅटो कॅल्शिअम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि झिंक यासारख्या तत्त्वांनी युक्त असतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात, जे कॅन्सर आणि हृदयरोगासारख्या गंभीर रोगांपासून बचाव करण्यासाठी सहायक असतात. टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यानंतर अजून प्रभावकारक ठरतो.
हाडांच्या बळकटीसाठी (For Strengthen Bones)
टोमॅटोही अक्षरक्षः गुणांची खाण आहे. यामध्ये व्हिटॅमीन के आणि कॅल्शिअम आढळतं, ही दोन्ही तत्त्वं हाडांना मजबूत करण्यात आणि हाडांची दुरूस्ती करण्यात उपयोगी पडतात. तसंच टोमॅटोमधील व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सीडंट हाडातील दोष दूर करण्यास मदत करतं.

कॅन्सरपासून बचाव करतो टोमॅटो (Tomato Protects Against Cancer)
टोमॅटोच्या औषधीय गुणांमुळे कॅन्सरसारख्या घातक आजारांपासूनही बचाव होतो. टोमॅटोमध्ये लायकोपीन नामक घटक भरपूर प्रमाणात आढळतो, जो कोणत्याही प्रकारचा कॅन्सर रोखण्यास फायदेशीर आहे. कॅन्सर कमी करण्याऱ्या लायकोपीन या तत्त्वाशिवाय टोमॅटोमध्ये नियासीन, व्हिटॅमीन बी6, पोटॅशिअम यांसारखी तत्त्वही असतात. ही सर्व तत्त्व हृदयासाठी फायदेशीर मानली जातात. अनेक सर्वेक्षणानुसार, जर तुम्ही नियमितपणे एका आठवडाभर कमीतकमी 10 टोमॅटोचं सेवन केल्यास कॅन्सर होण्याची शक्यता जवळपास 45 टक्क्यांनी कमी होते. पुरूषांनी जर रोज टोमॅटो खाल्ला तर प्रोस्टेटच्या कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. एवढंच नाहीतर ज्या लोकांना ट्यूमर आहे, त्यांचा ट्यूमर कमी होण्यास आणि ट्यूमरची वाढ थांबण्यासही टोमॅटोची मदत होते. तर महिलांना याचा फायदा सर्वात जास्त होतो. जर तुम्हाला पोटाचा कॅन्सर टाळायचा असेल तर रोज सॅलडच्या रूपात टोमॅटो खायला हवा.

वजन कमी करतो टोमॅटो (Tomato Also Reduce Weight)
तुम्हाला माहीत आहे का, टोमॅटोचं सेवन वाढत्या वजनाला आटोक्यात आणू शकतं. खरंतर यामध्ये खूप कमी प्रमाणात चरबीसोबतच जीरो कॉलेस्टॉल असतं, जे वजन वाढू देत नाही. टोमॅटोमधील भरपूर पाणी आणि फायबरमुळे विना कॅलरीज तुमचं पोट भरण्यास मदत होते. त्यामुळे भूक कमी लागते. जर तुम्ही वाढत्या वजनामुळे चिंतीत असाल आणि वजन कमी करण्याबाबत विचार करत असाल तर आजच टोमॅटोचं नियमित सेवन सुरू करा.

टोमॅटो खाण्याचे दुष्परिणाम

1- टोमॅटोच्या बियांमुले किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर टोमॅटोच्या बिया काढून मग त्याचं सेवन करा.
2- टोमॅटोमध्ये अधिक प्रमाणात आम्ल असतं त्यामुळे ज्यादा सेवन केल्यास अॅसिडीटी होऊ शकते आणि छातीत जळजळही होऊ शकते.
3- टोमॅटोच्या जास्त सेवनाने पोटात दुखणे आणि गॅसचा त्रासही होऊ शकतो.
4- जास्त टोमॅटो केचप खाण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या . टोमॅटो केचप हा असा खाद्यपदार्थ आहे जो आपल्या सर्वांच्या घरी सहज उपलब्ध होतो. मुले ते मोठ्या आवडीने खातात. पण, आपल्याला माहिती आहे का की टोमॅटो केचप खाणे शरीरासाठी खूप हानिकारक आहे. जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा तसेच इतर अनेक आजार होऊ शकतात. अनेक तज्ज्ञांच्या मते, बाजारात मिळणाऱ्या केचअपमध्ये ना प्रोटीन आहे ना फायबर. हे फक्त चव वाढवण्यासाठी काम करते. यामध्ये भरपूर साखर, मीठ, फ्रुक्टोज कॉर्न सिरप आणि प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो ज्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. अधिक वापरामुळे होणाऱ्या तोट्याची माहिती जाणून घेऊ या.

1 लठ्ठपणाची समस्या-टोमॅटो केचपचा अतिवापर केल्याने शरीरात लठ्ठपणाची समस्या वाढू शकते. त्यात मोठ्या प्रमाणात साखर आणि अन्न परिरक्षक आढळतात, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. यासह, ते शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण कमी करते.

2 असिडिटीची समस्या-टोमॅटो केचपच्या अति वापरामुळे असिडिटीची समस्या उद्भवू शकते. हे बनवण्यासाठी फ्रुक्टोज कॉर्न सिरपचा वापर केला जातो, ज्यामुळे पोटात जळजळ आणि गॅसची समस्या वाढू शकते.

3 ऍलर्जीची समस्या-टोमॅटो केचप जास्त खाल्ल्याने शरीरात अलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते. याचे कारण असे की केचपमध्ये हिस्टॅमिन केमिकल जास्त असते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu