घोडबंदर किल्ला
घोडबंदर किल्ला हा ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ उल्हास नदीच्या दक्षिणेस स्थित आहे. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला, त्यानंतर तो मराठ्यांचा ताब्यात गेला आणि ईस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा मुख्यालय बनले. या ठिकाणी पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करीत असे, त्यामुळे या जागेला घोडबंदर हे नाव पडले.इसवी सन १५३० मध्ये पोर्तुगीज ठाणे येथे आले व त्यांनी इ.स. १५५० च्या आसपास जवळील डोंगराळ भागावर किल्ला बांधायला घेतला, पण सध्या अस्तित्वात असलेल्या किल्ला पूर्णपणे इ.स. १७३० मध्ये बांधून झाला. या किल्ल्याचे पोर्तुगीज नाव – ककाबे दी तन्ना असे होते. इ.स. १७३७ पर्यंत ह्या किल्ल्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते. तेव्हा त्यांना इथे एक चर्च बांधले आहे, जे अजून अस्तित्वात आहे व त्याचा वापर आज हॉटेल म्हणून करतात. चर्चच्या आतील भिंतींवर दोन पऱ्यांची आकृती कोरली आहे, जी अजून पहावयास मिळते.मराठ्यांच्या हल्ल्याच्या प्रयत्नांबद्दल अनेक नकाशे व लेख उपलब्ध आहेत. इ.स. १६७२मध्ये शिवाजी महाराज्यांच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यासह, पोर्तुगीज अनेक वर्षांपासून या हल्ल्यांपासून घोडबंदर किल्ल्याचे यशस्वीरित्या रक्षण करू शकले. तथापि, चिमाजी आप्पाच्या अधीन असलेल्या मराठ्यांनी किल्ल्याला यशस्वीरित्या वेढा घातला आणि ११७३७ मध्ये पोर्तुगीजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला.इ.स. १८१८ मध्ये ब्रिटीशांना या किल्ल्यावर ताबा मिळवला व ईस्ट इंडिया कंपनीच्या जिल्हा प्रशासनाचे मुख्यालय बनवले. ज्याचा जिल्हाधिकारी ठाणे येथे असे.सध्या या किल्ल्याची अवस्था वाईट आहे, पण शासनाचे या किल्ल्याच्या नुतनीकरणाचे काही प्रयत्न चालू आहेत. हा किल्ला भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारित येतो.प्राचीनकाळी कल्याण हे महत्वचे बंदर म्हणून प्रसिध्द होते. अरबी समुद्रातून उल्हास खाडी मार्गे कल्याण बंदरात जहाजांची येजा चालत असे. या जलमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला, धारावी किल्ला, घोडबंदर किल्ला, गायमुख किल्ला, नागलाबंदर किल्ला, दुर्गाडी किल्ला अशी किल्ल्यांची माळच वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी बांधली होती.सह्याद्रीची एक सोंड उल्हास खाडीजवळ उतरते, तिचे टोक घोड्यासारखे दिसते. त्यामुळे ह्या बंदराला घोडबंदर असे नाव पडले सह्याद्रीच्या ह्या सोंडेवरच घोडबंदर किल्ला बांधण्यात आला
इतिहास
इ.स १६७२ मध्ये घोडबंदर किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी स्वत: ह्या किल्ल्यावर हल्ला केला,पण त्यांना किल्ला जिंकता आला नाही, इ,स १७३७ मध्ये घोडबंदर किल्ला मराठ्यांनी पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला,त्यावेळी पोर्तुगिजांची २५० माणसे मारल्याची व ७ गलबते ताब्यात घेतल्याची नोंद आहे.वसईच्या मोहीमेचा एक भाग म्हणून नागलाबंदर, घोडबंदर, धारावी किल्ला हे किल्ले जिंकून वसईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. १८१८ मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकून घेतला.
ठिकाणे
गडाच्या पायर्या चढून आपण भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश करतो, समोरच अनेक छोटी दालने असलेली एक कमानींची इमारत दिसते. पुढे गडाच्या सपाटीवर उंच भिंतीचे सभागृह लागते. त्याच्यापुढे थोड्या उंचीवर एक बुरुज दिसतो. बुरुजाला असलेल्या पायर्यांनी वर गेल्यावर कडी,कोयंडे किंवा बिजाग्रींची गरज नसलेला वैशिष्ट्यपूर्ण दरवाजा लागतो. बुरुजाच्या माथ्यापर्यंत असलेल्या खाचांमधून हा दरवाजा वर खाली सरकवून उघड बंद करता येत असे. ह्या बुरुजाच्या माथ्यावरुन उल्हासखाडी व आजूबाजूचा दूरवरचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.आम्ही घाटकोपर वरून बाइकने निघालो आणि घोडबंदर मार्गे एन एच ३सूरत हाइवे मार्गाने घोडबंदर गावात गेलो आणि गावात किल्लाविषयी माहिती विचारली त्यांनी सांगितले की किल्ला आहे व आत जनावरे असण्याची शक्यता आहे उल्हास नदीच्या खाड़ी वर हां किल्ला आहे खाड़ी जवळच्या भागात घणदाट झाडी आहे गावातील लोकांनी आम्हाला सांगितले की येथे बिबट्या येत असतो त्याची दहशत फार आहे.किल्ल्यात प्रवेश केल्यावर इंग्रज कालीन दरवाजा सुस्थितित आहे. आत चरही बाजूने तटबंदी ४ ते ५फुट एवढी नव्याने बांधली आहे.दरवाजे बऱ्यापैकी आहेत उत्तरेस एक बुरुज आहे आणि त्याच बूजाचा खालच्या बाजूस चौकोनी लहान दरवाजा आहे कदाचित तोच वर खली करणारा दरवाजा असावा.पुढे ५खोल्या सीमेंटच्या बांधकामाने बांधलेले१३ बाय १५ची लांबी रुंदी आहे.तेहि भग्न अवस्थेत आहेत.किल्ल्यात एक सीमेंटचि चौकोनि टाकी २० बाय २५ लांब रुंद आणि १२फूट खोल बांधलेलि आहे त्यांचे कारण समजले नाही कारण त्यात एकहि जूना दगड नव्हता कदाचित तेथील लोकांना उन्हाळ्यात पाणी साठवायचे असेल