डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर करण्यासाठी घरगुती उपाय
बदलती जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनात स्वत:ला फिट ठेवणं, आपल्या त्वचेची, चेहऱ्याची, आरोग्याची काळजी घेणं कठीण होतं. बाजारात चेहऱ्याची, डोळ्यांची सुंदरता वाढवण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. मेकअपने डोळ्यांच्या खालील काळी वर्तुळं काही वेळासाठी झाकली जाऊ शकतात. परंतु काळी वर्तुळे घालवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरु शकतात.
डोळ्यांखाली का होतात काळी वर्तुळं
– प्रमाणापेक्षा अधिक तणावात राहणं
– तणावामुळे झोप पूर्ण न होणं
– कंम्प्युटर, मोबाईलवर अधिक वेळ घालवणं
– संतुलित आहार न घेणं
– शरीरात आर्यनची कमतरता
– आनुवंशिकता
– शरीरात हार्मोनचं असंतुलन
– मद्यपान, धुम्रपान सेवन
– कमी पाणी पिणं
1.अलोवेरा
अलोवेरा जेल तसे त्वचेसाठी एक प्रकारे संजीवनीच आहे आणि डोळ्याखालील काळी वर्तुळ दुर करण्यासाठी अलोवेरा जेल फायद्याचे काम करते। अलोवेरा त्वचेला हायड्रेट करण्याचं काम करते आणि त्वचेला आराम देते। यामध्ये असलेले पोष्टिक तत्व त्वचेसाठी एंटीसेप्टिकच काम करते। याचबरोबर सुर्याच्या हानिकारक किरांपासून बचाव करते.
• रात्री झोपण्यापूर्वी अलोवेरा जेल डोळ्या खाली लावा आणि ५-६ मिनिट मसाज करा आणि सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा.
२.टॉमेटो
टॉमेटोमध्ये असलेले ब्लिचिंग त्वचेचा रंग नीखरण्याठी चांगल काम करतात। यामध्ये असलेले विटामिन A,B आणि C मृत त्वचेला बाजुला करण्याचं काम करते। टॉमेटोमध्ये अँटीऑक्सीडेन्ट असतात जे डार्क स्किनच्या समस्येला दुर करतात। याचा उपयोग तुम्ही रोज केलात तर काही दिवसांत तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळ जाण्यासाठी सुरू होतील.
3.गुलाबजल
जेव्हां त्वचा उजळण्याची वेळ येते तेव्हा गुलाबजल महत्वाची भुमिका बजावतो। त्वचेचा साफ करण्याबरोबरच डोळ्या खालील काळी वर्तुळसाठीही उपयोग करू शकतो। जरासा रुई घ्या आणि त्याला गुलाबजलमध्ये भिजवा आणि काळया वर्तुळावर ठेवा।१५ मिनिट डोळ्यांवर राहुद्या आणि नंतर थंड पाण्याने धुऊन टाकावा। काही दिवस हि प्रक्रिया केल्याने फरक जाणवेल.
4.डोळ्या खालील काळी वर्तुळ दुर करण्यासाठी झोप महत्वाची
हे एक प्रमुख कारण आहे डोळ्या खालील काळी वर्तुळ येण्याची। अनेक जण रात्री उशिरा पर्यंत जागे राहणे पसंत करतात। तासंतास मोबाईल, लॅपटॉपवर असतात। ज्याने तुमची झोप अपुरीच राहते आणि डोळ्या खाली काळी वर्तुळ येण्यास सुरुवात होते। त्यामुळे रात्री लवकर झोपण्याची सवई लावणे। रोज ८ तासाची झोप घेणे गरजेचे आहे.
5.डोळ्या खालील काळी वर्तुळ दुर करण्यासाठी तणावा पासुन रहा दुर
तणावामुळे डोळ्या खालील काळी वर्तुळ येण्याची शक्यता अधिक असते। त्यामुळे तणावाला दुर करा ज्याने काळी वर्तुळ देखील दुर होतील।त्यासाठीच तुम्ही योगा करू शकता ज्याने तुमचा ताण कमी होईल.
6.बटाटा
डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळे लवकरात लवकर घालवायची असतील तर बटाट्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. कच्च्या बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्याने डोळ्यांवर लावावा. यातही कापूस या रसात भिजवून तो डोळ्यांवर ठेवावा. १० मिनिटांसाठी हा कापूस असाच डोळ्यांवर ठेवा आणि नंतर डोळे धुवून टाका.