संत्रा बर्फी




Like
Like Love Haha Wow Sad Angry
संत्रा बर्फी – Marathi Recipe

साहित्य – १. साधारण चार ते पाच मोठ्या संत्र्यांची साले , २. अडीच वाट्या साखर , ३. चार टेबलस्पून मिल्क पावडर , ४. एक वाटी काजू किंवा बदामाची पावडर , ५. एक टिस्पून लिंबाचा रस , ६. चमचाभर तूप

कृती -: १. संत्र्यांची साले सगळे दोरे काढून कूकरमध्ये उकडून घ्यावीत. कडूपणा उतरेल अशी भिती वाटत असेल तर सालांचा
जाडसर पांढरेपणा धारदार सुरीने खरवडून घ्या. सालं उकडण्यासाठी कूकरच्या दोन शिट्या पुरतात. साले थंड झाल्यावर
त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी. वर दिलेल्या प्रमाणासाठी ही पेस्ट एक वाटी व्हायला हवी. पेस्टची किंचीत
चव घेऊन बघा. कडसर चव असेल तर एकाऐवजी अर्धी किंवा पाऊण वाटी पेस्ट घ्या.
२. नॉनस्टीक पॅनमध्ये किंवा कढईत चमचाभर तूप गरम करून एक वाटी संत्र्याच्या सालींची पेस्ट आणि अडीच वाट्या साखर त्यात घालावी. ३. साखर विरघळून मिश्रण उकळले की त्यात लिंबूरस घालून नीट मिसळून घ्यावा. ४. नंतर काजू किंवा बदाम पावडर आणि मिल्क पावडर घालून मिश्रण एकजीव करावे. ५. गॅस मंद ठेवून मिश्रण परतावे. त्याचा गोळा फिरू लागला की गॅसवरून खाली काढून ताटात थापावा.
६. आवडीप्रमाणे बदामाचे काप किंवा वर्ख लावून सजावट करावी. हव्या त्या आकारात बर्फ्या कापाव्यात.
अधिक टिपा:
१. गेल्या वर्षी मानुषीने संत्र्याचे सोप्पे सरबत लिहिले होते. त्यातली संत्र्याचे साल उकडण्याची युक्ती भारीच आवडली होती.
प्रत्यक्षात ते साल उकडून त्याची पेस्ट केल्यावर त्याचा जो स्वाद आला होता तो भयंकरच आवडला होता. तीच पेस्ट इतर
गोड पदार्थात वापरता येईल असं वाटून जरा एक दोन प्रयोग केले. त्यातला केक पारच फसला. ही संत्रा बर्फी मात्र पहिल्याच
प्रयत्नात बर्‍यापैकी जमली. नंतर करून करून प्रमाण योग्य जमले.
२. ह्यात संत्र्याच्या सालीचा स्वादच इतका मस्त असतो की इतर केशर, वेलची इत्यादी स्वादांची गरज पडत नाही.
३. आता संत्र्यांचा मोसम चालू होतोय. नक्की करून पहा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu