आमचे भाऊ आणि फक्त आमचेच असे वाटणारे भाऊ. भाऊंना मी लहानपणापासूनच ओळखतो. भाऊ आमचे एकदम जवळचेच. म्हणूनच आज भाऊ बद्दल लेखनाचे सुचले. भाऊ म्हणजे जीव कि प्राण असे हे भाऊ.
लहानपणी अभ्यासात फार रुची नसणारे हे आमचे भाऊ. आज या देशात फार मोट्ठ्या पदावर आहेत. भाऊंचे लहान पाणीचे दिवस फार त्रास दायक. त्यांना अभ्यासात किंवा परीक्षेत फार मन लागत नव्हते. त्यांची आई सतत त्यांचा लाड करायची. आमचे भाऊ फार कोविलवाणे. कसे बसे भाऊ आज १० वर्ग पास झाले. आणि त्यांनी जुनियर कॉलेज ला पदार्पण केले. जुनियर कॉलेजात असतांना त्यांना सामाजिक सेवेचा छंद लागला. कॉलेजातील मुलीना गाजरे आणणे किंवा गुलाबाचे फुल देणे असे सामाजिक कार्य भाऊ करू लागले. कधी कधी भाऊ मार पण खाऊ लागले. भाऊ १२ कसे उत्तीर्ण होणार याची चिंता घरचांना होऊ लागली. परीक्षेचा टेन्शन म्हणावे कि काय भाऊ थोडी थोडी घ्यायला लागले. तंभाकू किंवा खर्रा यांचा फार नाही पण कधी कधी मित्रांमध्ये संपर्क येत होताच. आज भाऊंचा १२ वर्गाचा निकाल लागला भाऊ उत्तीर्ण झाले भाऊंना ४१ टक्के मार्क मिळालेत. भाऊंचा पुढील मार्ग कठीण होता. भाऊंनी बीए म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट ला शिक्षण घ्यायचे निर्णय घेतले.
कॉलेजात भाऊ फार दूरदर्शी होऊ लागले, त्यांनी परीवार नियोजनाचे कार्यक्रम हाती घेतले. त्यांनी कॉलेजाताच आपले परिवार बनवले. त्यातच इतके गर्द होऊन गेले कि त्यांचे लक्ष कुठेच लागत नव्हते. भाऊंचे अभ्यासातले मन उडाले आणि त्यांनी सामाजिक सेवेचे निर्णय घेतले. समाजाची सेवा हि नेहमीच राजकीय मुद्दा असतो. म्हणून भाऊंनी आपला झेंडा उभा करण्याचे ठरवले. मी पण भाऊंच्या मागे उभा होतोच. माझ्या सारखे बरेच नातवंड भाऊला साथ देत होतो. सुरवातीला भाऊ सायकल वर बसले. पण भाऊंची सायकल त्यांचा राजकीय करियर प्रमाणेच डगमग करीत होती. त्यांना बुलेट चा साथ हवा होता. सुरवातीच्या दिवसात भाऊ सामूहिक लग्न , हम दो हमारे दो, गप्पी मासे, पोस्टर बॉईज, निरोध, नस बंदी किंवा सॅम लैंगिक या सारख्या महत्वाच्या विषयांवर प्रकाश टाकू लागले.
पुढील काळात भाऊ हत्ती, बुलेट, सायकल, नांगर, बंडी, चप्पल, शिटी, टोपली या सारख्या नावाने काम करू लागले. असे करता करता भाऊंचे पोलिटिकल करियर एका चांगल्या दिशेने जाऊ लागले. आणि त्याच बरोबर आम्ही सुद्धा आपली कपडे बदलू लागलो. कधी कधी वाटायचे भाऊचा राजकीय पक्ष कोणता , त्यांनी रुची कोणत्या पार्टीत. भाऊंच्या सामाजीय राजकारणात आपण काय करत आहोत आणि आपल्याला काय मिळाले. पण भाऊंनी आपणास सांगितले आपण हिंदू आहोत आणि जे काही करीत आहोत ते हिंदूं करीत. त्याच जोशात मी पण हिंदू झालो आणि भाऊ शेवटी आमदार झालेच. पुढे भाऊ हरले आणि जिंकले सुद्धा. मात्र मी कशाची अपेक्षा न ठेवता भाऊच्या प्रचार साठी उभा होतो.
पुढे त्यांनी हाताला हात आणि हातात घड्याळ घालून पाचार सुरु केला. मग कुठे तरी आपणांस हे समजेनासे झाले कि भाऊ हिंदू कि मुस्लिम . एखाद्य माकड सारखे भाऊ तनसीच्या ढिगावरून उद्या मारू लागले. कधी फुल तर कधी हात तर कधी हातात घड्याळ आणि मी पण भाऊ मागे उद्या मारत होतो. हे सर्व होत असतांना कधी भाऊने ४ ते ५ बंगले बनवून टाकले, ५ ते १० कार घेऊन टाकले , २ स्वतःच्या नावाच्या शाळा उघडल्या हे मात्र कसे साले ते समजलेच नाही. मात्र मी खंबीर पाने भाऊ मागे उभा होतो. भाऊ साठी काही पण असे म्हणत भाऊ दोनदा आमदार झाले आणि दोनदा खासदार झालेत. आता भाऊ मंत्रीमंडळात मोठ्या पदावर आहेत. कधी कधी भेटतात हात मिळवतात बर वाटते. सोबतचे भाऊ मंत्री मंडळात आहेत याचाच अभिमान आहे.
कधी कधी एखादा माझा मित्र विचारतो तू कुठल्या पक्षाचा. मी स्वतःलाच विचारतो आणि म्हणतो मी भाऊंच्या पक्षाचा. असे बरेच भाऊ या देशात आहेत आणि त्यांच्या मागे उभे असणारे माझा सारखे चमचे सुद्धा. मला मी माहिती नाही पण भाऊ जो स्वतःच्या सख्खा भावाचा नाही पण मात्र मो माझा भाऊ. जेव्हा मी स्वतःला बघतो तेव्हा समजते कि मी फक्त भाऊ भाऊ करत आपले मोलाचे दिवस घालवलेत आणि तो भाऊ मात्र शुन्या पासून इतका मोठा मनानी का होईना पैशाने श्रीमंत झाला.
सांगायचे ते इतकेच कि आपण नातेवायी का होईना स्वतचे मनोगत आणि त्या धोरणावर काम करावे आणि स्वतः बद्दल अभिमान बाळगावे. शेवटी राजकारण सुद्धा एक व्यवसाय आहेत.
1 Comment. Leave new
nete lok kharre chor astat