मनाची स्थिती भारावलेली असल्याशिवाय भावना प्रगट होत नाही, परमेश्व्रावर प्रेम वाटण्यासाठी मनाला भावना येणे आवश्यक आहे. ज्या प्रकारे एखाद्यावर ओरडायचे म्हणजे प्रथम राग यावा लागतो. राग हा मनात मुळाशी असला कि तरच मोठ्याने ओरडण्याची क्रिया आपोआपच होऊन राग अनावर होत जाऊन तसतसा आवाज वाढतो. हे सूत्र भारावलेल्या मन:स्थितीचे असते.
गर्भावस्थेत स्त्रीच्या मनाला जास्त जपावे लागते, तिच्या आहाराचा, विचारांचा, मन:स्थितीचा, गर्भावर परिणाम होत असतो. ती मनाने जास्तीत जास्त आनंदी, प्रसन्न कशी राहील या सर्वांचा विचार करूनच निरनिराळे विधी सुचविले आहे. या अवस्थेत गर्भाला काही इच्छा होतात व त्या इच्छा व वासनांची उत्पत्ती मनुष्य देहाला गर्भावस्तेपासूनच असते. हेच सिद्ध होते. या अवस्थेत दुष्ट शक्तीपासून फार भीती असते. ती वायुरूप असल्याने गर्भात सहज प्रवेश करू शकते. त्यामुळे विकृत भीतीदायक मुले जन्माला येतात. वास्तविक मातेला मातृत्वाचा आनंद असतो. ती सुखावत असते. परंतु कधी कधी स्वतः जन्म दिलेल्या त्या भीतीदायक अपत्याला पाहून ती भयभीत होते. तिचे मन फार दुखावते याचे कारण म्हणजे ती अदृश्य दुष्ट शक्ती होय. या करीता गर्भावर चांगले संस्कार होण्यासाठी मनाला आनंद, उत्साह, शांतता कशी मिळेल याचाच विचार या वेळी करावा. याप्ल्याकडे सण, उत्सव करण्याची प्रथा याचे महत्व त्यामुळेच आहे. गर्भवती स्त्रीच्या मनाचा विचार करूनच या काही धार्मिक विधी करणे शास्त्राने सुचविल्या आहेत त्या करणे आवश्यक असते. तसेच सामान्य मनुष्याचा मनाचा विचार करूनच सण योजिले आहे. मनुष्याला बुद्धी असल्यामुळे तो सतत काळजी व चिंता करतो. त्या मुले थकतो त्याच्या या थकलेल्या मनाला आनंद मिळावा, नवा उत्साह मिळावा,त्याच्या रोजच्या कार्यात बदल व्हावा त्याच्या रोजच्या काळजी ने थोडा सुखावला जावा त्याची काळजी,चिंता खसनभर तरी दूर व्हावी याच उद्देशाने सणावाराला अतिशय महत्व आहे. त्यामुळे थोडे सुख थोडे दुःख अशी वाटचाल सुरु राहते. व तो आनंदाने जगू शकतो. मनुष्याला नवा आनंद, उत्साह मिळाला नाही तर तो दुःखाने वेडा होईल. सणावाराच्या निमित्ताने त्याच्यात नवा विचार, नवे देणे घेणे, संबंधितांशी बोलणेचालने, नवी खरेदी वै या प्रकारे रोजच्यात बदल होतो, त्यामुळे त्याचे धैर्य वाढते. ते न मिळाल्यास तो खचेल मनोधैर्याचा अभाव हाच नाशास कारणीभूत ठरतो. धैर्य हे दुःखाने संपते व सुखाने ते पुन्हा प्राप्त होते. मनुष्य देहाला सतत सुख दुःखाच्या भावना येतच असतात. परंतु वेळे परत्वे त्या जातातही तशीच योजना देहात असते. त्या पाण्याच्या लाटे प्रमाणे असतात. त्या लहरींप्रमाणे मनावर आदळतात व पुन्हा निघून जातात. यासाठी मनाचे धैर्य हे समुद्राच्या किनारी सारखे असावे सतत आदळणार्या
लाटांबरोबर किनारा कधीच वाहून जात नाही. तो त्या लाटांचा खेळ स्थितप्रज्ञासारखा बघत असतो. पण आपली मर्यादा सोडत नाही. एवढेच धैर्य मनाच्या ठायी असलेच पाहिजे.
देह हा अन्नाचा गोळा आहे.त्याला अन्नाची गरज असते. त्यातून प्रकृती उत्पन्न होते. परंतु कलीचा प्रभाव या मनावर असा आहे कि आचरण, अन्न याबाबत विचारच केला जात नाही. या अन्ना मुळे दोष उत्पन्न होतात. त्यासाठी अन्न खाताना शरीराला पोषक अन्न कसे मिळेल याच विचार होणे आवश्यक आहे. मनाला मृदुता यावी,उत्तम मन तयार व्हावे असेच अन्न खावे. अन्न हे केवळ शरीराचेच पोषण करीत नाही तर मनाचे व बुद्धीचे पोषण करतात. जेवढे हलके भोजन तेवढीच बुद्धी ची व कामाची गती तीव्र असते. अन्न ग्रहण करते वेळी मन शांत, प्रसन्न, व पवित्र असावे.स्वच्छ, ताजे, शुद्ध, व पवित्र असे सात्विक अन्न घावे. कारण अन्नाप्रमाणेच आचार, विचार, मैत्री, सहवास या सर्वांचाच मनावर परिणाम होत असतो. विचारांची बैठक उत्तम असावी. मैत्रीत का असेना मन दुखावले जात असेल तर तेथील मैत्री कमी करता करता संपुष्टात आणावी. विनाकारण मैत्रीत मनाचे स्वास्थ्य बिघडते. वाईट संगतीत मानसिक दौर्बल्य येऊ शकते. याकरिता संगत सांभाळून करावी. मनाला आवर्जून शिकवावे लागते. मनात श्रद्धेची भावना असावी.
मनाला उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी संस्कारयुक्त अन्न ग्रहण करावे. ईशव्री शक्तीचा संचय, चिंता, मनन करावे म्हणजे देहात एक शक्ती निर्माण होते. व ती मनाचे रक्षण करते. मनुष्य कितिहि कठोर असला तरी त्याच्या मनात कुठेतरी भय असतेच. त्याच्या विश्वासाला कुठेतरी मर्यादा असते. ती मर्यादा संपली कि मन विकलांग होते मग ते विकलांग मन विचित्र दिशेने धाव घेते, त्यासाठी मनाला नेहमी तपासत असावे की आपले मन भटकत तर नाहीना? आपल्या मनात वाईट विचार तर येत नाहीना? असे होत असेल तर आपली ईशव्री शक्ती कमी होत आहे हे लगेच लक्षात घ्यावे. आपली शक्ती व्यर्थ जात आहे, तेव्हा मनाला विश्रांतीची व ईशव्री चिंतनाची गरज आहे हे लक्षात येणे फार गरजेचे आहे. चिंता, व मनन हे मनाला नक्कीच विश्रांती देऊन शांत करते, मनाला सांभाळायचे म्हणजे त्याच्या वर विचारांचा अवास्तव ताण द्यायचा असे नाही. ताणाने शरीरावर परिणाम होऊन स्वादुपिंडाचे कार्य बिघडते कारण मनुष्याला बुद्धी असल्याकारणाने मन जास्तच ताण उत्पन्न करतो तेव्हा मनाला हि ताणा पासून सांभाळणे गरजेचे आहे. त्या विचारांना बंधने घालावी.
मनाला भक्तीच्या मार्गाने रमवावे किंवा वळवावे. एकदा मन तेथे आले कि अविचारी होऊन विवेक येऊ शकतो. विवेक आला की मनाला स्वच्छ करतो. तेथे भक्तीचा आधार मिळतो, आत्मविश्वास जागृत व टिकून असतो. मन कुठेही डगमगत नाही.
भक्ती असली कि तेथे श्रद्धा असतेच मन स्थिर असते. तेव्हा मनाचा विकास करून घेण्याची संधी असते. मनाचा विकास हि अत्यन्त महत्वाची बाब आहे. मनाचा विकासा करून घ्यायचा असेल तर जे ज्ञान आपल्या कडे ते इतरांना प्रदान करता आले पाहिजे ज्ञान हे असेच हस्तांतर करीत पुढे पुढे न्यायचे असते. ज्ञान हे स्वतः जवळ साठवून ठेवायचे नसते. असे असेल तर त्याचा काही उपयोग नाही. मनाची शक्ती अगाध असली तरी आपण उडू शकत नाही, मनाचे काय ते कुठेही केव्हाही पोहचू शकते. कारण त्याचा स्वभाव भ्रमंतीचा आहे. पण यातून ज्ञान काहीच नाही.जोपर्यंत मनाच्या कल्पनेतून प्रत्यक्ष काहीच अनुभवाला येत नाही तो पर्यंत मनाची शक्ती अगाध म्हणता येणार नाही? मनाला शांती पाहिजे. ते बाहेर कुठेही नाही ती याच देही वास करीत असते. परंतु ती मिळ्वावी लागते. मनाला शांती मिळविण्याचे अनेक मार्ग आहेत परंतु ते कोणत्याही वस्तूतून मिळत नाही. पण व्यक्तीतून मिळू शकते. संत पुरुष्यांच्या सहवासातून त्यांच्या दर्शनाने मन शांत होते. अध्यात्म हा मनःशांतीचा सर्वात उत्तम मार्ग आहे.
मनुष्याच्या मनाला ईशव्रीभक्तीचा भाव येतो पण तो टिकवता येत नाही. तो टिकवता आला पाहिजे. टिकल्यास तो उंचावेल. भावना हा धर्म नाही. डोळ्यात,अंतकरणात इश्व्राचे रूप साठवावे लागतात. पुन्हा पुन्हा ते डोळ्यासमोर आणावे लागतात. तेव्हाच भाव उमटतो. भाव वाढला कि भक्ती वाढते, भक्ती वाढली कि शक्ती अनुभवास येऊन आंनद मिळतो. मनुष्य देह हा आनंद मिळवून घेण्याचे साधन आहे. हि भक्ती श्रद्धा कुणाच्या सांगण्याने निर्माण होत नाही. ती अनुभवाने निर्माण होत असते.
श्रद्धा हि भगवंतांवर असावी.श्रद्धा हि आंधळीच असावी. तेव्हाच अपेक्षेपेक्षा जास्त मिळते. श्रद्धा या आपणच भावनेतून मनात निर्माण केलेल्या असतात. श्रद्धा या मोजक्याच वाढवाव्यात पण त्या टिकवाव्यात मनात भक्ती हा जो भाव असतो तो स्थिर करावा. भगवंतांविषयी ‘ माझे हृदयी तुझाच वास’ अशी भावना असावी, म्हणजेच हृदयात मृदुता येते, हे सर्व आपल्याच अंतकरणात असते. पण आपल्याला त्याचे ज्ञान होत नाही.
हृदयाला मृदुता, कोमलता, ओलावा असावा तेव्हाच मनाला ईशवराचा स्पर्श होतो, तेव्हा मनलाईशव्री
अस्तित्वाची जाण असते. तेव्हाच बुद्धी जागृत होते. बुद्धी जागृत झाली कि मनुष्य कर्म करू लागतो. ईशवराच्या मूर्तीला स्पर्श करणे म्हणजे इश्व्राचे दर्शन करणे नव्हे. आपल्या मनात किती वेळ इश्व्राचे स्मरन होते ते तपासून बघावे, भगवंतांची स्तुती करणे, पूजा करणे, त्याची सतत आठवण ठेवणे, त्याची ओढ लागणे हेच त्याच्या स्पर्शाचे सूत्र आहे.
आपले मन वैज्ञानिकांसारखे ठेवावे. वैज्ञानिक हे आपल्या सामान्या सारखेच जीवन जगतात पण मनात सतत आपल्या संशोधनाबद्दलचा विषय ठेवतात. त्याचाच विचार करतात. त्याचाच पाठलाग करतात. म्हणूनच ते नवनवीन शोध लावू शकतात. तसेच आपणही व्यवहारात राहावे परंतु मनात ईशवराविषयी विचार सतत ठेवावा. तेव्हाच त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होईल. व मन शांती मिळेल.
व श्रेष्ठत्व वाढेल. हे केवळ मनुष्याला शक्य आहे कारण त्याच्याजवळ मन बुद्धी आहे.मनशांती हा मनाचा विकार नाही. किंवा जीवनाची निष्क्रियता नाही. तो म्हणजेशक्तीचा एक पुरवठा आहे.
जशी अक्षरांची उत्पत्ती हि मूर्त रूपात लेखनाद्वारे प्रगट होते, ती आपण फलकावर,कागदावर प्रगट करतो, तसेच मानवी गुणाचेही आहे. त्याचा आपण अविष्कार करून घ्यायला हवा. या नरदेहाला ईशव्रीसानिध्या शिवाय पूर्णत्व येत नाही. चित्ताला एकाग्रता येत नाही. मनाची अस्वस्थता थांबविण्यासाठी हेच योग्य आहे. ईशवराविषयी भाव उत्पन्न होऊ द्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू द्या.
जीवनात दुःख शिवाय जीवनाचे सार्थक होत नाही. जीवन सार्थकी लावण्यास दुःख हेही महत्वाचे आहे.