देह आणि मन
Like
Like Love Haha Wow Sad Angry
3

Body Dualism or separation of Body and its Soul. In my view, this Theory has no merit and has no validity. Samkhya Theory of Soul has no practical application in real World. Science does not speak about Soul or Spirit. It does not mean that Science endorses Soul – Body Dualism. Science provides information that disproves separation of Man into Body, Mind, and Soul.

For more details kindly read following article.

brahman-and-atma-e1362914641533

देह तो क्षण भन्गुर | नाही राहिले कोणी स्थिर ||

तो जोवर असे दृढ असे शरीर |  पुण्य मार्गे रहाटावे ||

मनाला सुरवाती पासूनच प्रभू स्मरणाचे  वळण लावावे लागते तरच ते देहाला जाणीव पूर्वक लागते. व त्याचे सहज प्रवृत्तीत रूपांतर होते. अन्यथा हे फार अवघड आहे. वृद्धवस्थेत देह विकलांग झालेला असतो.

आधीव्याधींनीं ग्रस्त होतो. व सर्व चित्त त्यातच गुंतून पडते.  शरीर कुणाचे हि असो त्याला व्याधी हि आहेच, संत पुरुष्यांनाही रोग होतातच. परंतु  त्यांचे मन देहात अडकत नाही.  त्यांची बुद्धी सदैव योग्य निर्णय घेते. त्यांचे मन सदैव प्रसन्न असते. मात्र हे सामान्यांच्या बाबतीत घडत नाही. देहाला एखादा  रोग झाला कि मन शांत व आनंदी राहू शकत नाही. कारण ते मन अध्यात्म्याने  स्वच्छ केलेले नसते.   बाह्य शरीर ज्याप्रमाणे आपण स्वच्छ करून घेतो.  त्याच प्रमाणे नामस्मरन करून  सम्पूर्ण देह आणि मन  शुद्ध करावे लागते.  केवळ बाह्य शुद्धी  करून उपयोग नाही,  अंतर शुद्धीहि महत्वाची आहे.  अंतर शुद्धीने मन प्रभू चरणाशी स्थिर होते, शरीर कितिहिरोग ग्रस्त असेल तरी मन खचत नाही.  ते प्रसन्न असते. हि अवस्था सतपुरुष्यांचीं असते .

या मानवी देहाला अनेक सुखदुःख भोगुनच संपावावे लागते.  त्यातही यातना आणि दुःखाचे प्रमाण इतके असते कि तो कंटाळून जातो. ‘ सुख पाहता जवापाडे  | दुःख पर्वतां एवढे || ‘ हे तर खरे आहेच.  मात्र सत्पुरुष हे भोग भोगुनच  संपवितात. सत पुरुष  इच्छामरणी असतात तरी ते दीर्घकाळ जगण्याच्या फ़ंदात पडत नाही  काही विविक्षित कार्यासाठी त्यांचा जन्म झालेला असतो तेवढे कार्य करून ते जीवन संपवितात .  ते देह कधीच विसर्जित करीत नाही.  ते फक्त अव्यक्त होतात. ते गेले असा भास होतो,

सत पुरुष्यांना देहा ची आसक्ती नसते, ते देहा कडे ‘आपला देह जन्म हेतू साध्य करण्याचे साधन आहे ‘ याच दृष्टीने पाहतात. व त्याला आवश्यक तेवढेच महत्व देतात.  आणि सांगतात कि या देहाने जेवढे चांगले करता येईल तेवढे करावे. हा देह इतरांच्या जितका उपयोगी पडेल तितका उपयोगात आणावा.

नुसती भूक,तुष्णा वासना हि पशूंची लक्षणे होत. मनुष्याची  नाही.  आपल्या ठिकाणी असलेल्या चैतन्याची ओळख करून घेणे, त्याला विकसित करून घेणे हेच  मानवी जीवनाचे वैशिष्ट्य आहे. हे साध्य करण्यासाठी भगवन्ताने  मन, बुद्धी मानवाला अधिक  दिलेली आहे.तेव्हा देहाच्या ठायी असलेल्या चैतन्याचा विकास करावा लागतो.म्हणजे ते चैतन्य प्रकाशमान होते.

भगवंताने देह निर्माण करताना  त्यावर केस व रंध्रे निर्माण केलीत ती देह शुद्धी साठीच केलेली आहेत.

मन आणि देहाला चांगले वळण लागावे  त्यासाठी त्यात सात्विक विचार व्हावेत, त्या विचारांनी  मानवी देहातील दोष कमी होतात. हे जीवन फार मौल्यवान आहे . कारण याच जीवनात मनुष्याला आनंद, दुःख व्यक्त करता येत. नराचा नारायण बनण्याची संधी याच जीवनात मिळते.  वस्तूत; मनुष्य दुःख कशाचे करतो हेच त्याला कळत नाही. त्यातून त्याला काही प्राप्त होत नाही. दुःख वाटून जर काही प्राप्त होत असेल तर दुःख अवश्य वाटून घ्या.

भगवंताने  मानवी जीवन इतर प्राण्यांपेक्षा समृद्ध ठेवलेले आहे.  परंतु त्याच  बरोबर काळज्या, चिंता  त्याला लावून दिल्या आहेत यामुळे तो गलितगात्र होतो वास्तविक  तो कशाचा कर्ता करविता नाही. तरी तो दुःख उगाळत बसतो. परंतु मनुष्य सत्पुरुष्याच्या सानिध्यात आल्यास ती त्यांना ईशव्री मार्गावर आणून , या देहाच्या माध्यमातून ते मानवाला सर्व दुःख विसरवून ईशव्रीय मार्ग दाखवितात. ज्याला  त्याला त्याच्या पात्रतेनुसार हा अनुभव घेता येतो. मानवी देहाला जास्त ताणायचे नसते

परंतु जीवनात सतसंगतीचा आधार असणे जरुरीचे आहे. कारण आधारहीन जीवनाचे स्थर्य लवकर संपते. जीवनाला ताणायचे नसते तसेच देहाला जास्त सुखही दिल्याने हानी होते. अति सुखात देहाला व्याधी व उपाधी निर्माण होतात. त्या सुखातूनच दुःख निर्माण होत असते.

त्यासाठी ईश्व्र्रभक्ती करावी तिचे नऊ प्रकार आहेत.  श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, वदंन, दास्य, सख्य, आणि आत्मनिवेदन. मात्र सामन्यासाठी भक्ती हाच माध्यम सर्वात सोपा  व नरदेहाला तरुण नेणारा आहे.  सार्थक करणारा आहे. यात नाही तपश्चर्या करावी लागत  नाही घरदार सोडावी लागत. नामस्मरन केव्हाही , कोठेही कर्ता येते. हि सहज प्रवृत्ती होय.

 

 देह आणि मन   २

या देहाला वासना, इच्छा, लवकर सोडत नाही. अंतिम क्षणापर्यंत मनुष्याचे मन इच्छा,वाना या कशात तरी अडकलेल्या असतात.  आणि त्या पूर्ण न होताच देह संपला तर पुन्हा जन्म आहेच जर पुन्हा जन्म झाला नाही तर अशा लोकांना पिशाच्चं योनी प्राप्त होते. ती कारण देह मुळे  त्यासाठी मृत देहावर अंतिम संस्कार व्यवस्थित करून घ्यावा लागतो. त्यामुळे  देहाची नीट व्यवस्था लागेल.  ज्या पंच महा भूतांपासून हा स्थूल देह निर्माण होतो.  त्यावर अग्नी संस्कार करून  जे ते तत्व  ज्या त्या तत्वात विलीन केले जाते. मातेच्या  गर्भात संस्कारांना सुरवात होते ती अंत पर्यंत चालूच असते. अंत्य संस्कार हा सोळावा संस्कार आहे.

सूक्ष्म देह हा कधीच नष्ट होत नाही. याला आत्मा म्हणतात. आत्मा हा अमर आहे. यावर कशाचाही परिणाम होत नाही. हा अमर आत्मा वासना व इच्छा यांच्या मुळे अस्तित्वात असलेल्या कारण देहात प्रवेश करीत राहतो.  व म्हणूनच मानव पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात सापडतो.  जन्माला आलेला जीव नवा वाटत असला तरी तरी त्या स्थूल देहाने जुने आवरण सोडून नवीन आवरण धारण केलेले असते.  म्हणून तो नवा वाटतो.  जे जे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसते ते ते सत्यच असते असे नाही. ते सत्य असल्याचा भास मनाला होतो एवढेच. प्रत्यक्ष अवस्था हि भगवन्त जाणतात.

ते. मातेच्या  गर्भात संस्कारांना सुरवात होते ती अंत पर्यंत चालूच असते. अंत्य संस्कार हा सोळावा संस्कार आहे.

सूक्ष्म देह हा कधीच नष्ट होत नाही. याला आत्मा म्हणतात. आत्मा हा अमर आहे. यावर कशाचाही परिणाम होत नाही. हा अमर आत्मा वासना व इच्छा यांच्या मुळे अस्तित्वात असलेल्या कारण देहात प्रवेश करीत राहतो.  व म्हणूनच मानव पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात सापडतो.  जन्माला आलेला जीव नवा वाटत असला तरी तरी त्या स्थूल देहाने जुने आवरण सोडून नवीन आवरण धारण केलेले असते.  म्हणून तो नवा वाटतो.  जे जे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसते ते ते सत्यच असते असे नाही. ते सत्य असल्याचा भास मनाला होतो एवढेच. प्रत्यक्ष अवस्था हि भगवन्त जाणतात.   ते. मातेच्या  गर्भात संस्कारांना सुरवात होते ती अंत पर्यंत चालूच असते. अंत्य संस्कार हा सोळावा संस्कार आहे.

सूक्ष्म देह हा कधीच नष्ट होत नाही. याला आत्मा म्हणतात. आत्मा हा अमर आहे. यावर कशाचाही परिणाम होत नाही. हा अमर आत्मा वासना व इच्छा यांच्या मुळे अस्तित्वात असलेल्या कारण देहात प्रवेश करीत राहतो.  व म्हणूनच मानव पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात सापडतो.  जन्माला आलेला जीव नवा वाटत असला तरी तरी त्या स्थूल देहाने जुने आवरण सोडून नवीन आवरण धारण केलेले असते.  म्हणून तो नवा वाटतो.  जे जे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसते ते ते सत्यच असते असे नाही. ते सत्य असल्याचा भास मनाला होतो एवढेच. प्रत्यक्ष अवस्था हि भगवन्त जाणतात.   वराचे अधिष्ठान नसेल तर तो कुठल्याही कार्यात सफल होत नाही. ईशव्रीय सहाय्यानेच यश प्राप्त होत असते. म्हणून त्याचे सतत स्मरन ठेवलेच पाहिजे. त्याला शोधायला कुठेही जाण्याची गरज नाही आपल्या देशातच त्याचे अधिष्ठान आहे.  म्हणून त्याला शुद्ध व स्वच्छ कसे ठेवायचे याचा विचार मनात असू दयावा. त्याला कष्टी पोचनार नाही  त्याची दक्षता घ्या. कुणाची निंदा, चहाडी,करू नका, मद्यपान,मांसाहार, वाईट व्यसने करू नका, देहरूपी मंदिराला मलीन करू नका. अति उपवास करून देहाला विनाकारण झिजवू नका, शक्य असल्यास गरजूंना दान करा,धर्म करा, स्वतः विषयीच्या अवास्तव कल्पना  सोडून द्या. व स्मरणात तल्लीन रहा. तेव्हाच आनंद काय आहे हे लक्षात येते. यात काही काळा नंतर इंद्रियांच्या वासना दूर होऊन नर देह शुद्ध होईल, शरीराची खरी अवस्था लक्षात येईल. त्यातच परमार्थ साधना होत असते.  आपल्यातील दोष कमी करणे म्हणजे एक प्रकारे फार मोठी कामगिरीचं आहे.

नरदेह जेव्हा शुद्ध होतो, तेव्हा परमार्थ काय याची कल्पना येते. व त्यातील आनंद समजायला लागतो.  इंद्रिय दमन करणे म्हणजेच ‘परमार्थ’ होय.हे ज्याने साधले त्याने परमार्थ साधला, शरीराची अवस्था जाणली असे म्हणता येईल.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3
,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu