देहधर्म सुटण्यासाठी सत्पुरुषयांचा सहवास मिळवावा.




Like
Like Love Haha Wow Sad Angry

gentlemen’s club, or formerly traditional gentlemen’s club, is a members-only private club originally set up by and for British upper class men in the 18th century, and popularised by English upper-middle class men and women in the late 19th century and early 20th century. Today, some clubs are more accommodating about the gender and social status of their members. Many countries outside the United Kingdom have prominent gentlemen’s clubs, mostly those associated with the British Empire, in particular, India, Pakistan, and Bangladesh have enthusiastically taken up the practice, and have a thriving club scene.

For more information read below article.

deh ani mn

सामान्य व्यक्तीने सत्पुरुषयांची धरलेली कास जर त्यांच्या मृत्यूने शेवटी सुटली तर पुढे कोणताही जन्म मिळाला तरी ते सत्पुरुष्याच्या सहवासात पुनः येतात. अगदी पशु रूपात जन्म मिळाला तरी त्यांना  त्यांचा सहवास लाभतो. काहीना  काही काळा पुरता तर काहींना दीर्घ काळाचा सहवास लाभतो. हा जीव पुनः कोणत्या रूपात येऊन सहवास मिळविलं सांगता येत नाही. देवस्थानात गायी, कुत्री, हरणी, वै. असतात , थोडा किंवा दीर्घ काळ सुद्धा त्यां आश्रमात किंवा देवस्थानात घालवितात ती त्यांची पूर्व पुण्याई असते. मनुष्य देहा ला सर्वात जास्त इच्छा असतात त्यामुळे त्याला दीर्घ आयुष्य मिळालेले आहे. त्याचा जीव वस्तू: कुठेतरी अडकलेला असतो. त्याच्या इच्छा नुसार दीर्घ काळ त्याला पृथ्वी तलावर सुख-दुःखाचे चटके सहन करावे लागते. त्यां मानाने इतर योनी भराभर संपतात. मनुष्य योनीची  चार आश्रम व्यवस्थेची रचना करून  प्रत्येक आश्रमातील जीवन पद्धती ठरवून दिलेली आहे ती केवळ मानवी हितासाठीच. मानव देह  हा त्यांच्या पात्रेतनेच प्राप्त होतो. आणि जन्माला आल्यानंतरही त्याला आपली पात्रता आणखी वाढवावी लागते. हि पात्रता प्रयत्नाने वाढते. ती वाढवून त्याला आपल्या नरजन्माचे सार्थक करून घ्यायचे असते. ते करून घेता आलेतरच उत्तमगती प्राप्त होते. आणि मोक्ष मळतो. काळाची गती फार धीमी असते  त्या गतीतच त्याला सर्व काही समजून घ्यायचे असते. मृत्यू देवतेचे वाहन जो रेडा आहे त्याची गती फार धीमी असते त्याचेच ते प्रतीक  आहे. काळाची गती धीमी असली कारणाने मनुष्य स्वतः फार बदल करून घेणे त्याला शक्य होते.

मनुष्य हा असा प्राणी आहे कि त्याच्या ठायी अज्ञान, इच्छा, वासना फार असतात त्याला त्यातून  बाहेर पडणे फार अवघड असते. यासाठीच त्याला सतसंगाची, सत्पुरुषयाचा सहवास याची गरज असते. अन्यथा तो जन्माला येतानाच भय, सुख -, दुःख: घेऊनच येतो. तेच भोगत बसतो. त्याला देहात्मा  काय ?  मनुष्य जन्माचा हेतू काय ? कळतच नाही.

भगवंताने आपल्याला एवढामोठा चमत्कारी देह दिला. आज मुंगी सारख्या देहाला सुद्धा उद्योगात  लावून ठेवलेले आहे. मनुष्याला देहधर्म सुद्धा लावून ठेवलेले आहेत, त्यासाठी तो उद्योगात तरी रहावा.

भूक, तहान, वासना, मद, मोह, मत्सर हे मानवनिर्मित नव्हे. त्यामुळे हे सुटणे फार अवघड आहे. आणि हे जो पर्यंत सुटत नाही तो पर्यंत त्याला आत्मज्ञानाचा संस्कार होत नाही. मनाला शांती मिळत नाही.

हे देहधर्म सुटण्यासाठी सत्पुरुषयांचा सहवास मिळवावा.  तन, मन , धनाने सत्पुरुषयाची सेवा करावी

तेव्हाच हे देहधर्म  सुटतील.

देहातील क्रिया जसे अन्न ग्रहण करणे, श्वास घेणे, मलमूत्र विसर्जित करणे याक्रिया आपल्याला सहज व सोप्या वाटत असल्या तरी, त्यां कोण करवून घेत आहे ? आपण कोण  आहे ? आपण कोठून आलो आहे?  कुठे जायचे  आहे ? या प्रश्नांचीउत्तरे त्याला  सापडत नाही  व कधी तो प्रयत्न सुद्धा करीत नाही. अशी जर मानवी देहाची अवस्था असेल तर आपला अहंकार,  आपल्या स्वतः बद्दलच्या अवास्तव कल्पना सोडून त्यां सर्वसाक्षी भगवंताला का बरे शरण जाऊ नये?  या देहातून मुक्त व्हायचे असेल तर त्याला शरण जाणेच योग्य आहे.

मनुष्य देहाची खाणी अशी कि तो विकाराने जन्माला येतो, विकासाने आनंदात राहतो. ईशवराची आठवण विसरतो, आणि सत्य अशा मृत्यूलाही विसरतो. परंतु जेव्हा त्यां मृत्यूची घटिका जवळ येते त्यां सत्याला तो घाबरतो. त्यावेळी त्याची दयनीय अशी अवस्था होते. त्याठिकाणी यातना पेक्षा भयच अधिक वाटते.  म्हणून म्हणतात ‘ मरणाचे भय नव्हेतर आठवण असू द्या’.

तसेच प्राणी कुठलाही असो त्याला मनुष्याच्या  सानिध्यात रहायला आवडते. याच अर्थ असा कि  त्याला मानवी जीवनाशी त्याचा कधीतरी संबंध आलेला असतो. हे हि पूर्वी सर्व योनी फिरत फिरत प्राणिमात्रांच्या जन्मास आलेले असतात. तेव्हा त्यांनाहीकढीतरी मानवी जीवन आलेले असणार ते मानवाच्या सहवासातून आलेले  असणार म्हणूनच त्यांना मानवी सानिध्य हवे असते, आणि त्यांना अन्नाची आवड असते, तसेच असे कितीतरी उदाहरणे आहेत कितीतरी प्राण्यांत मानवी कृती अंशात्मक दिसून येते. हे मानवी योनीची लक्षण नव्हे काय ?  हि सर्व गत जन्माच्या सहवास असण्यानेच होय.

प्राणी आपली योनी बदलल्यानंतरही  मनुष्याच्या सहवासाला विसरत नाही. तो मानवाला ओळखतो, त्याला घाबरत नाही, म्हणजे मनुष्याच्या स्वभावाला तो चांगला परिचित आहे . परंतु मनुष्य मनुष्याला ओळखत नाही, हि  आश्चर्याचीच बाब आहे. वास्तविक प्राण्यांना मनुष्याची ओळख राहणे व त्यांच्या सहवासात राहण्याची कृती घडणे  हि गोष्ट तितकीशी सोपी नाही. कारण त्यांच्यात बुद्धीचा व मनाचा अभाव असतो. तरीही हे असे घडणे म्हणजे हा एक ईशव्री संकेतच म्हणावा. तो संकेत मानवी सानिध्याचा संकेत असतो. पण आपण सामान्य माणसं त्यांच्या या कृतीचे इतके सूक्ष्म निरीक्षण व अध्ययन करीतच नाही एवढेच. प्राण्यांच्या देहा कडे पहिले तर त्यालाही स्वतः च्या जीवाला सुरक्षित ठेवण्याचे ज्ञान आहे. आपल्याला त्यां दृष्टिकोनातून त्यांच्या कडे पाहता आले पाहिजे. गे, मुंगी, चिमणी, कांगारू, माकड, मांजर, कुत्रा यांच्या काही कृतीत मानवाची लक्षणे आढळून येते. जसे अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षणाची भावना, प्रेम, वात्सल्य, माया या भावना प्राणी मात्रांत दिसून येतात. परंतु त्यांच्यात बुद्धीची कमी असंल्या कारणाने ते काही कालांतराने आपल्याच अपत्यांना विसरतात.  त्याग व निष्काळजीपणा हा त्यांच्यात दिसून येतो.

मनुष्यातही चांगले गुण असतात पण काही पशुत्वाचे गुण असतात. परंतु ते त्याचे त्यांनीच  ठरवायचे असते कि मानवी देहाला शोभेल अशीच कृती ठेवावी.

काही प्राण्यापासून काहीसे गुण मानवाने शिकण्यासारखेहि असतात. जसे सिंह पासून भक्ष पकड्ण्याचे असो व कुठलेही तो अगदी आपली शक्ती पणाला लावतो, बगळ्यापासून इंद्रिय संयम,  कोंबड्यापासून ब्रम्हमुहूर्तावर उठणे, तसेच रणांगणावर मागे राहणे, बंधुभाव खाद्य खाताना ते कधीही सम भाग खातात,  कावळ्यापासून- गुप्त स्थानावर मैथुन करणे, लपून चालणे, वेळोवेळी अभिष्ट संग्रह, सावधानता, कोणावरही विश्वास न ठेवणे. कुत्र्यांपासून- अधिक खाणे व पचविणे हि क्षमता ठेवतो, व कधी थोडक्यातच संतुष्ट होतो, गाढ झोपेतही सावध झोप घेतो, आपल्या मालकावर अति प्रेम करतो, आणि शौर्य दाखवितो. कधीच न थकणे हे गुण. गाढव पासून न थकणे न कुरकुरता काम करणे , ओझी वाहने  थन्डी, पाऊस, गर्मी याच विचार कधीच न करणे. इत्यादी गुण प्राण्यातून घेण्यासारखे  आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu