आध्यत्म
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Spirituality does not mean any particular practice. It is a certain way of being. To get there, there are many things to do. This is like a garden in your house. If the soil, sunlight or stem of a plant is in a certain way, it won’t yield flowers, you have to do something. You have to take care of those things. So if you cultivate your body, mind, emotions and energies to a certain level of maturity, something else blossoms within you – that is what is spirituality. When your rationale is immature, it doubts everything. When your rationale matures, it sees everything in a completely different light. For more information kindly read below article…

अध्यात्मिक उन्नती करिता समाजामध्ये चांगल्या लोकांची संख्या प्रचलित राहावी.!

चांगल्या लोकांची संख्या अधिक असल्याने अमजतील स्त्री जातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठतेवर,विश्वासूपणावर प्रामाणिकतेवर अवलंनबून आहे. मुलांमध्ये ज्याप्रमाणे वाममार्ग कडे ओढले जाण्याचा फार कल असतो त्याच प्रमाणे स्त्रियां मध्येही आधी;पटना कडे ओढले जाण्याचा फार कल असतो. म्हणून मुले आणि स्त्रिया या दोहींना कुटुंबातील वडील धाऱ्या माणसांकडून संरक्षणाची गरज असते. विविध धार्मिक व्रत,वैकल्ये करीत राहिल्याने स्त्रिया व्यभिचाऱ्याच्या मार्गाकडे ओढल्या जाणार नाही.’ चाण्यक्य पंडित’ म्हणतात,सर्व सामान्य; स्त्रिया फार बुद्धिवान नसतात.आणि म्हणून त्या विश्वासार्ह नसतात. म्हणून धार्मिक व्रताचरणाच्या ज्या विविध कौटुंबिक परंपरा आहेत. त्यांनी त्यांना नेहमी कार्यरत ठेवले पाहिजे. असे असले तर त्यांचे पावित्र्य आणि त्यांची एकनिष्ठा कायम  राहील व त्यामळे ‘वर्णाश्रम’ पद्धतीत भाग घेण्याकरिता पात्र अश्या चांगल्या संततीला त्या जन्म देतील.

adhyatma-tv

अश्या ‘वर्णाश्रम’ धर्माच्या अभावी स्त्रिया  साहजिकपणे स्वातंत्र्य रीतीने वागणार्या होऊन मग पुरुश्यां मध्ये मिसळतात. यामुळे व्यभिचाराला मोकळीक मिळते. व नको असलेल्या प्रज्योतप्तीचे संकट ओढवते. बेजबाबदार पुरुष सुद्धा समाजात व्यभिचाराला उत्तेजन देतात. व याच प्रमाणे मानव समाजात नको असलेल्या  मुलांची इतकी भरती होते  कि त्यामुळे  युद्ध व धातुकी साथी अशा आपत्ती येतात.

सकाम कर्मांच्या नियमांना अनुसरून कुटुंबातील पूर्वजांना ठराविक वेळी अन्न आणि पाणी अर्पण करण्याची आवश्यकता असते.  महा विष्णूची पूजा केल्यानें ही अर्पण क्रिया सिद्ध होते. कारण विष्णूला अर्पण केलेल्या अन्नाचा शेष खाल्याने मनुष्य सर्व पापमय कृत्यातून  मुक्त होतो. कधी कधी उर्वजांना निरनिराळया प्रकारच्या पापकृत्यांच्या प्रतिक्रियांमुळे फार दुःख भोगावी लागतात. आणि कधी कधी पूर्वजांना स्थूल भौतिक शरीरहि प्राप्त करता येत नाही. आणि  त्यांना भूत -पिशाच्चं योनीत सूक्ष्म  शरीर धारण करून राहणे  भाग पडते.  म्हणून ‘प्रसाद रूपाने’ अन्न शेष जेव्हा पूर्वजांना त्यांच्या

वंशजांकडून  दिले जातात तेव्हा पूर्वजांची भूत-योनीतुन किंवा इतरकाही दुखी जीवनातून मुक्तता होते.

पूर्वजांना असे सहायय करणे हि कुल-परंपरा आहे.आणि ज्यांनी भक्तिमय जीवनाचा अवलंब केला आहे. त्यांना अशी कृत्ये करावी लागत नाही.  केवळ भक्तिमय सेवा करून आपल्या शेकडो आणि सहस्रो  पूर्वजांना त्यांच्या सर्व प्रकारच्या दुःखातून  मनुष्य मुक्त करू शकतो………….भगवतगीतेतून..

…………………………………………………………………………………………………….

करुणा — करुणेचा उपयोग कुठे करावा हे समजून घायला हवे!

एखादा मनुष्य बुडत आहे. त्याच्या पोषाखाबद्दल ची करुणा व्यर्थ आहे. त्याच प्रमाणे, पाच भौतिक शरीर हा मनुष्याचा बाह्य पोषाक आहे, जो मनुष्य अज्ञानाच्या महा सागरात पडलेला आहे. त्याच्या केवळ बाह्य पोषाखाचे रक्षण केल्यानें त्या मनुष्याचे रक्षण होत नाही.  ज्या मनुष्याला  याचे ज्ञान नाही. बाह्य वेशाबद्दल  जो शोक करतो  त्याला शूद्र किंवा निष्कारण शोक करणारा असे म्हणतात.

म्हणून भयावह कृत्य करणारा किंवा नीचकर्म प्रवृत्तीच्या मनुष्याच्या मृत्य नन्तर शोक करणे हे सुद्धा निष्कारण शोक होय.

………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..

वैदिक आज्ञातून — आक्रमक आततायी  कोण !

१. दुसर्यास विष देणारा ( पाजणारा )
२. घराला आग लावणारा.
३. तीक्ष्ण शस्त्रांनी हल्ला करणारा.
४. संपत्ती चोरून किंवा लुटून नेणारा,
५. दुसऱ्यांची जमीन बळकावणारा.
६. पर- स्त्री चोरून किंवा पळवून नेणारा.
अश्या आततायी आक्रमकांना ठार मारल्याने कोणतेही पाप लागत नाही.

………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..

अध्यात्मिक गुरु कां करावा ?

प्रकृतीच्या स्वत; च्या नियम नुसार भौतिक क्रियांची संम्पुर्ण योजना हि प्रत्यकाला  गोंधळात टाकणारी आहे. आणि पदोपदी गोंधळाची स्थिती असते म्हणून  जीवनाच्या हेतू सिद्धी साठी विस्वसनीय  अश्या अध्यात्मिक गुरूला शरण जाने मनुष्याला आवश्यक असते,  आपली इच्छा नसताना जीवनात ज्या घालमेली आपल्याला सोसाव्या लागतात  त्यातून मुक्त होण्याकरिता अध्यात्मिक गुरूला शरण जाण्याचा उपदेश वैदिक वाड्मयाने आपल्याला केलेला आहे. कधी कधी अरण्यात कोणीही आग न लावता अरण्य पेट घेतो त्याच प्रमाणे आपल्या जीवनात घालमेल, गुंतागुंती व जीवनातील अडचणी आपोआपच निर्माण होतात. आणि आपली त्या वेळी आपली तारांबळ उडते. म्हणून जीवनाची गुंतागुंत सोडविण्या करिता व त्या कश्या प्रकारे सोडवाव्या  या संबंधीचे ज्ञान समजून घेण्या करिता, शिष्य परंपरेने चालत आलेला जो विश्व्सनीय आध्यत्मिक गुरु असतो. त्याचे कडे जाण्याचे उपदेश वेदात केले आहे. दुसऱ्या बाजूने जाऊ नये त्याने जीवन नष्ट होईल. जीवनाच्या समस्यां सोडवून घेणे फार गरजेचे आहे.

नाहीतर आपण गोंधळात पडून अमावतेच्या  अवस्थेला प्राप्त होऊ शकतो.

………………………………………………………………………………………………………………..

मानवी जीवनाची समस्यां…

मानवी जीवनाची समस्यां न सोडवून घेता व आत्मानुभवाचे विज्ञान समजून न घेता जो कुत्र्या मांजराप्रमाणे  हे जग सोडून जातो, तो कृपण मनुष्य होय.

जो मनुष्य प्राणी जीवनाचा उपयोग जीवनातल्या समस्यां  सोडविण्या करिता करू शकतो, त्या मनुष्याच्या दृष्टीने हे मानव जीवन म्हणजे एक अत्यन्त मोउलुवान वस्तू आहे आणि जो मनुष्य

या संधीचा योग्य रीतीने उपयोग करून घेत  नाही तो कृपण होय. या उलट जीवनाच्या सर्व समस्या  सोडविण्या करिता या शरीराचा उपयोग करण्याची पुरेशी बुद्धिमत्ता ज्याच्या ठिकाणी आहे असा तो मनुष्य होय.

जन्म, म्हातारपण, व्याधी आणि मृत्यू या ज्या भौतिक जीवनाच्या समस्या आहेत. त्यांचा प्रतिबंध संपत्तीच्या संचयाने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही. जगात असे कित्येक देश जीवनाच्या सर्व सुख सोयीने समृद्ध आहेत.  संपत्तीने परिपूर्ण आहेत. आर्थिक दृष्ट्या विकसित आहेत.  तरीही त्यांच्यातही भौतिक जीवनाच्या समस्यां अजूनही उपस्थित आहे. तरी तिथली जण संख्या विविध मार्गाने शांततेचा शोध करीत आहेत. परंतु त्यांनी आपल्या या भगवत- गीता ग्रन्थाचा सार लक्षात घेतल्यास यांत श्रीकृष्ण-विज्ञान सामावलेले आहे. तर त्यांना सुखाची प्राप्ती होऊ शकते. अलीकडे पर प्रांतीय लोक सुद्धा आपल्या या संस्कृतीचा आग्रह धरायला लागलेले पाहण्यात येत आहे, बरेच पर प्रांतीय जण समुदाय शांतीच्या मार्गासाठी भारतात येण्याच्या प्रयत्नात आहेत.भारतीय संस्कृतीची  त्यांना आवड निर्माण होत असल्याचे जाणवत आहे. तेव्हा भारतीयांनी याचा सारांश समजून घेतला पाहिजे आपली संस्कृती आपण जपायला हवी.

आर्थिक विकास आणि भौतिक सुख सोयी  यामुळे जर एखाद्याचा कौटुंबिक शोक, तसेच सामाजिक, राष्ट्रीय, आणि आंतर राष्ट्रीय मदांधता  या सर्व गोष्टी नष्ट करता आल्या असत्या तर पृथ्वी वरील निष्कंटक  राज्यप्राप्ती किंवा ग्रहांवरील  स्वामित्व या मुळे सुद्धा शोक दूर होऊ शकत  नाही. या उलट जगावरील स्वामित्व  भौतिक स्वरूपाच्या उलथा पालथी मुळे मनुष्याने  कितीही उन्नती किंवा प्रगती केली असली तरी  कोणत्याही क्षणी तडाख्या सरशी ती प्रगतीहि लयाला  जाऊ शकेल,जेव्हा पुण्य कर्माच्या  फळाचा शेवट होतो , तेव्हाही म्हणुष्य सौख्याच्या शिखरावरून पुन्हा जीवनाच्या अत्यन्त खालच्या पायरीवर येऊन पडतो.हाही अध;पात शेवटी अधिक  शोकालाच कारणीभूत आहे. असे कित्येक घातपात – आघात होत राहतात, हे आपल्या लक्षात येत नाही.

……………………………………………………………………………………………………….. ……

जो खरा पंडित आहे – म्हणजे ज्याला देह म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय याचे ज्ञान आहे. तो मनुष्य शरीराच्या जीवनात आणि मेलेल्या  कोणत्याही अवस्थेचा शोक करीत नाही.

जे ज्ञानी आहेत ते जिवंत किंवा मेलेल्यां बद्दल कधीच शोक करीत नाही.

धर्मविषयक सिद्धांतसंग्रह पेक्षा जड, जीव आणि परमेशवर यांचे ज्ञान अधिक महत्वाचे आहे

शरीराला जन्म असतो आणि म्हणून ते आज  ना उदया नाश पावणार हे आधीच ठरलेले असते.

मोक्षा नंतर  जीवात्मा मायेच्या उपाधीतून मुक्त झाला असल्याने  तो अव्यक्त ब्रम्हात विलीन होतो.

परिवर्तनीय शरीराला टिकाऊपणा नसतो.   मात्र आत्मा हा शाश्व्त आहे.

शरीरात व चित्तात सर्व बदल झाले  तरी आत्म्याचे अस्तित्व  तसेच नित्य राहते.

स्वामी आणि सेवक, गुरु आणि शिष्य  यांच्यातील संबंधाप्रमाणे जीव हे नेहमी भगवतांहून गौण

असतात.

आत्म्याचे क्षेत्रफळ — केसाच्या वरच्या टोकाचे  जर शँभर भाग केले आणि पुन्हा त्या प्रत्येक भागाचे शँभर भाग केले तर असे जेव्हा करता येईल ,
तेव्हा त्या प्रत्येक भागाचे परिणाम जिवाच्या आकाराचे होईल.    म्हणजेच ” चित्कण संख्यातीत आहेत, प्रत्येक कणांचे परिणाम  केसांच्या वरच्या
टोकांच्या एका दशसहस्त्रांशा इतके आहे.”  हा जीवरूपी चित्कण भौतिक अनुपेक्षाहि सूक्ष्म आहे.

……………………………………………………………………………………………………………………………………………………………………..

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1
,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu