Joy is a state of mind and an orientation of the heart. It is a settled state of contentment, confidence and hope. It is something or someone that provides a source of happiness. Previously cursed or blessed by words, and they are true. So there is a lot of power in censorship. Believe in the Lord and accept all the good things that happen in life.
प्रत्येक प्राणी मात्रांत आनंद असतोच आणि हवा तितका आनंद मनुष्य प्राणीच प्रत्येक वेळी घेऊ शकतो. सर्व प्रथम मनुष्याने संकुचित होणे सोडायला हवे. मनात कोणत्याही प्रकारची भीती किंवा धास्ती ठेवता कामा नये. नेहमी मोकळ्या मनाने राहावे. व मनात एकच मंत्र जपावा मी भगवंतांचा आहे आणि ईशवर माझा आहे. शब्दां मध्ये फार सामर्थ्य, शक्ती असते. त्याने कुठलीही वाईट शक्ती आपल्याजवळ येत नाही व स्पर्शही करीत नाही. शब्दाला आत्मसाक्षात्कार म्हंटले आहे.
मनात कोणतीही भीती न ठेवता आपल्या जीवनात जे काही घडतं त्याचा आनंदाने स्वीकार करावा. आपण आपल्या जीवनातील काही गोष्टी चांगल्या किंवा वाईट आहेत हे समजू शकत नाही, परंतु ईशवरावर श्रद्धा भाव असेल तर आपल्याला चांगली न वाटणारी गोष्ट सुद्धा आपल्यासाठी योग्य असू शकते, हे नंतर ध्यानात येते. म्हणून प्रभू वर विश्वास ठेवून जीवनात घडणार्या सर्व चांगल्या वाईट गोष्टींचा आनंदाने स्वीकार करावा. त्यातून मोकळ्या मनाने मिळणारा आनंद वेगळाच असतो व तो अनुभव आगळा वेगळा असेल. सतत आनंदी असाल तर प्रत्येक सकाळ नव्या स्वरूपाची असेल.