51
bhoopali pandhuranga :
This is a type of aarti called bhoopali.This bhoopali sung in the worship of God Pandhuranga by the devotees. Utha Pandurang ata Darshan dya Sakala.
उठा पांडूरंगा आता दर्शन द्या सकळा ||धृ||
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ||१||
संत साधू मुनी अवघे झालेती गोळा |
सोडा सेज सुखे आता बंधू द्यार मुख कमळा ||२||
रंग मंडपी महाद्वारी झालीसे दाटी |
मन उतावीळ रूप पहावया दृष्टी ||३||
राही रखुमाबाईतुम्हा येऊ द्या |
शेज हालऊणि या करा देवराया ||४||
गरुड, हनुमंत उभे पाहती वाट|
स्वर्गीचे सुरवर घेऊनि आलें भात ||५||
झाले मुक्त द्वारे लाभ झाला रोकडा |
विष्णुदास नामा उभा घेउनि काकडा ||६||
51