Ganga is the largest river in India. Ganga is considered as a holy rever in India. Ganga is called as ‘Mata’ and treated as goddess. Thus to worship Gangamata, following aarti is sung .
माते दर्शन मात्रे प्राणी उद्धरसी हरसि पातक अवघें जग पावन करिसी |
दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी हरहर आतां स्मरतो गती होईल कैसी ||
जय देवी जयदेवी जय गंगा माई पावन करिं मज सत्वर विश्वाचे आई ||धृ||
पडलें प्रसंग तैसी कर्मे आचरलो विषयांच्या मोहाने त्यां तची रत झालो |
त्यांचे योगें दुष्कृतसिंधुत बुडालो त्यां तुनि मजला तारिसी या हेतूनें आलों ||१||
निर्दय यमदूत नेती त्या समयी राखीं क्षाळी यम धर्माच्या खात्यांतील बांकी |
मत्संगती जन एवढे तारियले त्वां कीं उरलों पाहें एकची मी पतितां पैकी ||२||
अधहरणे जय करुणे विनवतसे भावें नोपेक्षी मज आतां त्वत्पात्री घ्यावें|
केला पदर पुढें मी मज इतुके द्यावें जीवें त्या विष्णूच्या परमात्मनी व्हावें ||३||