वेळेची गरज




Like
Like Love Haha Wow Sad Angry

During the phases of human lives, life keep on changing all the time. Sometimes, the events occur to us are difficult to be accepeted. We try to oppose them, but after some time we realize that , that was necessary for the sake of well-being. There are always somethings happen that are the need of that time. All we should do is to realize and accept it.

need of time

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कधीही काहीही घडू शकते, हे तर मान्य करावेच लागेल कारण जीवनात कोणत्या क्षणी काय घडेल याचा काही नियमच राहिला नाही; परंतु हा प्रत्येकाच्या जीवनाचा नियम आहे. कोणत्याही क्षणी आपल्या जीवनात जे काही घडत आहे ते त्यावेळेची गरज आहे, हे एक रहस्य आहे. हेच जीवनाचे सूत्र आहे.

हे सूत्र नेहमीच लक्षात असू द्यावे कि माझ्या जीवनात ही जी अचानक घडलेली घटना ही या क्षणाची गरज आहे. हा विचार आपल्या मनात असला कि आपला जीवन जगण्याचा दृष्टीकोनच बदलतो. परंतु आपले चांगले जगण्याचे प्रयत्न किंवा सत्कर्म हे सुरूच ठेवावे. आपल्या जीवनातील परिवर्तन, हे काळाची गरज समजून स्वीकारले पाहिजे. हे काही छोटे तर काही मोठे संकेत, भविष्यात फार महत्वाचे ठरतात. हे संकेत आपल्याला सजग करू इच्छितात. त्यांचा विरोध करू नका. हा विरोध आपल्यात केवळ निराशेला जन्म देईल.

जीवनाच्या या नियमाला समजून घ्या. जीवनात येणाऱ्या काही घटना या आपल्याला आयुष्यात काही महत्त्वाचे धडे शिकविण्यास येतात.

उदा : तुमच्या सोबत कुणी वाद करेल किंवा तुम्हाला त्यावेळी शिवी घालेल तर ती त्यावेळेची त्याची गरज होती असे लक्षात घ्या. हे तेच आहे कि मला याची गरज होती. त्यातूनच जीवनात महत्त्वपूर्ण परिवर्तन घडू शकते. जीवन परिवर्तन हे जीवनात अतिशय महत्वपूर्ण ठरते.

कितीतरी वेळी अचानक मनाला मान्य नसतात, त्या गोष्टी घडतात. पण त्याचा बाऊ करू नका, चिडचिड करू नका, त्यांचा स्वीकार करा. त्या स्वीकारात चमत्कार असतात. कधी कधी लहान वाटणारे शब्द देखील मोठे परिणाम घडवून आणतात. स्वीकार हे सर्वोच्च सत्य आहे.

या स्वीकारभावाचे सर्वेक्षण आपण करून बघत नाही व आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचां आपण स्वीकार करू इच्छित नाही; म्हणून आपल्या आयुष्यात आपण नेहमीच दु:खी-कष्टी जीवन जगतो. त्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी समजेद्वारे आणि ज्ञानाद्वारे प्राप्त होणाऱ्या साहसाची गरज आहे. सत्याच्या मार्गावर चालण्याचे साहस व ज्ञान मनुष्यास हवे, कारण सत्य हे मनाला अतार्किक वाटत असते. घडणाऱ्या घटनेची मला गरज आहे हे मान्य करायला मन तयार नसते कारण त्याचे ज्ञान नसते. याकरीता स्वीकारभावाची जीवनात अत्यंत गरज आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry







  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu