मानवास सुख हवे !!!




Like
Like Love Haha Wow Sad Angry

“Happiness depends on ourselves.” More than anybody else, Aristotle enshrines happiness as a central purpose of human life and a goal in itself. Happiness is not something that is out there, something that you have to find or earn. Feeling happiness is up to you only, is not directly connected to the material things that you have, your health or if you have accomplish all your goals.

eternal happiness

परमेश्वराने आपल्याला हे शरीर परोपकार करण्यासाठी दिलेले आहे, मन हे ईश्वरचिंतनासाठी, बुद्धी विवेकासाठी, मानवी जीवन ब्रम्हज्ञानप्राप्तीसाठी; तेव्हा मानवजन्म कशासाठी? याचा विचार करणे हेही आवश्यक आहे. मन अशांत, बेचैन, असुरक्षित असेल तरी सत्कर्म हाच एक सुखाचा मार्ग आहे. विचारांवर थोडा जोर देवून बघा, सुख येणारच. दु:ख येणार, बसणार, टिकणार, घात करणार, दुखी करणार  आणि जाणारसुद्धा, पण मनुष्य त्यातूनच बरंच काही शिकून जातो. त्यानंतर चांगले दिवस येणार; मग त्या दुखांचा मार सहन करायलाच हवा, आणि मुळ म्हणजे सुख-दुख हे आपल्या मानण्यावरही आहे, हे तितकेच सत्य आहे. दुसऱ्याच्या सुखाकडे बघून आपण  दु:खी  होतो पण दुसऱ्याचं दु:ख आपल्याला कळतं का? आपल्याला आपलं तेवढं माहित असतं. म्हणूनच दुसऱ्याच्या सुखाकडे बघून कधीच दुखी होऊ नये. शेवटी ” जगी सर्व सुखी असा कोण आहे ”,  हेच सत्य आहे.

प्रतिकुलतेला कधीच घाबरू नये, तिचे धैर्याने स्वागत करा. जीवनात जितके कठीण प्रसंग येत राहतील, त्यानंतर तितकेच सुख येणार हे त्रिवार सत्य आहे. दु:ख हे एक दर्पण आहे. कृत्रिम जगण्याने आपला खरा चेहरा लपल्या जातो , त्यामुळे मनुष्य दुखी होतो.

कधी कधी कुटुंबातील आपल्या प्रिय व्यक्तीच्या अकाली मृत्यूमुळे  केवढा तरी आघात पोचतो, पण कालांतराने का होईना, दु:ख कमी होत जातं. देवाकडून ते दु:ख पचविण्याची शक्ती प्राप्त होते.  मृत्यू हे सत्य आहे; ते स्वीकारावेच लागते. अनावर झालेल्या भावना आवराव्या लागतात. हे सर्व ईश्वराच्या इच्छेने होत असते. दु:ख पूर्णपणे मिटणारे नसले तरी जे सत्य आहे ते स्वीकारून घ्यावे लागते. प्राप्त परिस्थिती बदलणारी नसली तरी आपल्याला स्वतःमध्ये बदल करून घ्यावा लागतो. मनाला कणखर बनवावे लागते. स्वत:च्या मनाला आत्मसाक्षात्कार घडवा. दु:ख हे विचारातच असतं. आत्मसंशोधन, सद्विचार, अनुभव यांची कास धरली कि सुख प्राप्ती होते.

सर्वांवर प्रेम करा, स्वभावात नैसर्गिक खरेपणा व वागणे प्रामाणिक असू द्या, वर्तमानात सदा आनंदाचा विचार असावा.

खोटे व्यवहार किंवा खोटे बोलणे यामुळे  आपले हृद्य फार नाजूक व अशक्त होत जाते. हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही, पण एक दिवस याचा परिणाम फार विपरीत होतो.

उदा – रावण, दुर्योधन.

सत्य बोलणे, सद्विचार आणि प्रामाणिक व्यवहार यामुळे मनुष्य धैर्यवान बनतो व नेहमी उत्साही, निर्भय राहतो. शरीराला सात्विक ,शुद्ध अन्नाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे मनाला सत्संग, जप, ध्यान याची आवश्यकता असते. त्याने  सुख-शांती आणि आरोग्य  प्राप्ती होत असते. सुखप्राप्तीसाठी अयोग्य गोष्टींचा त्याग करणे आवश्यक आहे. त्यामुळे सुख शोधणे सोपे होते.

ज्या  गोष्टी आपल्या हातात नाही, त्याच दु:ख उगाचचं उगाळीत बसू नये, हे कायम लक्षात  ठेवावे.

आपण फक्त स्वत:च्याच सुखाचा विचार न करता दुसऱ्याच्या सुखाचा विचार केला तर त्यापासूनसुद्धा आपल्याला सुख मिळत असते. तसेच दुसऱ्याच्या दु:खाचा विचार करून, त्यांच्या मदतीला पुढे गेल्यास, त्यांच्या आनंदातून आपल्याला मिळणारे अप्रतिम असे सुखाचे झरे आपल्या मनात वाहतात.

कधी कधी आपल्या नेहमीच्या कामातून वेळ काढून काही वेळ वनस्पती, सेवा यातही आपले चित्त घालावे, बागेत रममाण व्हावे, निसर्गाच्या सहवासात रहावे, त्यामुळे मनाला काही काळ का होईना, शांती मिळेल.

Like
Like Love Haha Wow Sad Angry







  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा