Cauliflower or we just call it flower ,cooked or raw, is a great addition to your Healthiest Way of Eating.cauliflower is also rich in nutrients and, like its cousins, cabbage, kale, and broccoli, provides health-promoting compounds not found in many other vegetables. Here is the easy to cook recipe of this beloved vegetable.
साहित्य -: फ्लॉवर पाव किलो, टोमॅटो एक मोठा , बटाटा एक मोठा, मटार दाणे अर्धी वाटी, हिरव्या मिर्च्या पाच ते सहा, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, लसणाच्या पाच पाकळ्या, एक चमचा किसलेले आलं, काळा मसाला एक चमचा, दाणे कुट दोन चमचे, दोन चमचे खोबरे कीस, फोडणीचे साहित्य – तिखट अर्धा चमचा, सुपारीएवढा गुळ, धने पावडर एक चमचा, तेल पाव वाटी, मीठ.
कृती – फोडणी घालून त्यात कढीपत्ता, मिरचीचे तुकडे आणि ठेचलेल्या लसून पाकळ्या घाला, लसून लालसर होवू द्या. नंतर हळद व टोमॅटोच्या फोडी , बटाट्याच्या फोडी, मटार आणि फ्लॉवरचे तुकडे टाकून परतून घ्या. मीठ, तिखट, दाण्याचा कुट, किसलेले खोबरे, किसलेले आलं, गुळ, धने पावडर, काळा मसाला हे सर्व साहित्य घालून, भाजी नीट हलवून घ्यावी. नंतर किंचित पाणी घालून, झाकण ठेवून चांगली शिजवून घ्यावी. शिजत आल्यानंतर त्यात कोथिंबीर घालावी.