कोण म्हणतं तुम्ही म्हातारे ….?




Like
Like Love Haha Wow Sad Angry

c  What are lifestyle changes seniors can make to lead a healthy life as they age?

grandfather प्रत्येक व्यक्तीला सद्सद्विवेकबुद्धी लाभलेली असते. सात काय  आणि असत काय याची जाणीव करून देणारी जी बुद्धी तुमच्यापाशी असते, त्या बुद्धीला तुम्ही कसे प्रशिक्षण देता आहात, तिच्यावर कसे संस्कार करता आहात यावर बुद्धीची परिपक्वता ठरत असते आणि हि प्रक्रिया जीवनभर सतत चालू राहणारी आहे. बुद्धीचा विकास घडवून तिला सुसंस्कारित करणे हि सततची क्रिया आहे. त्यासाठी तुमचा दुर्ष्टीकोन कसा आहे. तुमची समज आणि समजूत कशी आहे, तुमचा तुमच्यावर विश्वास आहे का आणि तुम्ही प्रत्येक परिस्थितीला कशी प्रतिक्रिया व्यक्त करता यावर तुमच्या बुद्धीची क्षमता वाढते किंवा कमी होत असते. तुमच्या मनात जेव्हा विनाशी किंवा विध्वंसक विचार येतात, तेव्हा तुम्ही विध्वंसक कामे करायला उघुक्त होता आणि जेव्हा विधायक विचार येतात तेव्हा तुम्ही सर्जनशील कामे तयार करायला तत्पर असता. तुम्ही तुमच्या मनाला कसे घडविता यावर ते सर्व अवलंबून असते. विधायक काय आणि विध्वंसक काय आहे याची जाणीव बुद्धीने करून देणे म्हणजे विवेक होय. हा विवेक अभ्यासाने जोपासावा व घडवावा लागतो.

       तुमच्या मनात सतत विचारांचे चक्र चालू असते. तुमच्या मनात जसे विचार येतात त्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळत असते. विचार करणे ही माणसाची शक्ती आहे आणि या विचारांची जाणीव ठेवणे म्हणजे सारासार विचार करणे ही एक प्रकारची ऊर्जा आहे. सारासार विचार म्हणजे विवेक हे काम बुद्धी करत असते. योग्य विचार करून, योग्य निर्णय घेऊन, योग्य कृती करणे ही विवेकबुद्धी होय. ही विवेकबुद्धी प्रत्येक माणसाला त्याचे आयुष्य संपेतोपर्यंत प्राप्त झालेली असते आणि ही विवेकबुद्धी सातत्याने आपण विकसित करू शकतो आणि तोवर त्याने स्वत:ला म्हातारे म्हणू नये आणि हि बुद्धी अमरत्व घेऊन आलेली असल्यामुळे तुम्ही म्हातारे होऊ शकणार नाही जे सतत बदलत असते, जे सतत वाहन असते ते जुने होत नाही.

    तुमचे मन हे सतत बदलत्या परिस्थितीशी कशी तडजोड करेल याचा तुम्ही सातत्याने विचार केला तर त्याप्रमाणे तुम्ही घडवू शकाल. आकार देऊ शकाल यासाठी तुमच्या बुद्धीचा साचा कसा आहे त्याप्रमाणे त्याला आकार प्राप्त होईल. आकार प्राप्त होण्यासाठी तुमचे मन लवचिक पाहिजे. ते जर कडक किंवा ताठ असेल तर तुम्ही लवचिक होऊ शकणार नाही. आपले वय जसेजसे वाढत जाईल तसतसे आपला विचार करण्याचा दर्जा हा वाढत गेला पाहिजे. म्हातारी माणसे नेहमी म्हणतात कि आम्ही इतके पावसाळे पहिले आहेत, पण पावसामुळे तुमच्या किती पाणी शिरले आणि त्या पाण्याचा तुम्ही किती आणि कसा उपयोग केला, यावर तुम्ही अनुभवांपासून काय काय शिकला ते ठरत असते “जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही ।”

    याबाबतीत अगदी साधे उदाहरण घायचे झाल तर जन्माला आल्यापासून आपण काही ना काही तरी आहार घेत असतो. कोणते अन्नपदार्थ खाल्यामुळे आपल्याला त्रास होतो, कोणत्या वेळी आपण खाल्ले पाहिजे, कोणत्या वेळी खाणे टाळले पाहिजे हे विविध प्रकारचे अनुभव घेतल्यावर शिकत असतो. तुमचे जीवन म्हणजे अनुभवापासून काय शिकायचे हे जर तुम्हाला म्हातारपणीही कळले नाही तर नाईलाजाने तुमचे फक्त शारीरिक वय वाढेल आहे असे म्हणावे लागेल. याचाच अर्थ तुम्ही म्हातारे होता म्हणजे तुमचे मानसिक वय वाढणे अपेक्षित आहे. मानसिक वय वाढत राहणे हि सततची क्रिया आहे मग तुम्ही स्वत:ला म्हातारे समजलाच कशाला?

   समाजात राहणारा प्रत्येक नागरिक हा म्हातारा होणारच आहे असे आपण पाहत आलेलो आहोत. समाजाने तुमच्यावर सातत्याने केलेला हा संस्कार आहे. पण ज्या व्यक्तींना आपल्या घरातून नातेवाईकांकडून, मित्रांकडून चांगले सहकार्य मिळते, त्यांना आपण म्हातारे झालो असे वाटत नाही. याचाच अर्थ प्रत्येक वृद्ध व्यक्तीला जरुरी असते ती  मानसिक आधाराची. हा मानसिक आधार जसा तुम्हाला समाजाकडून मिळू शकतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu