A set of 12 powerful yoga asanas (postures) that provide a good cardiovascular workout in the form of Surya Namaskar.
आपलं शरीर हे एक मंदिर आहे. व्यायाम ही त्याची पूजा आहे. सुद्रुढ आरोग्य, उत्साही मन हा या पूजेमुळे मिळनारा महाप्रसाद आहे. स्वामी विवेकानंद जगाला व्यायाम शाळा म्हणतात. व्यायाम हा सुखी समाधानी निरोगी दीर्घ आयुष्याचा गुरुमंत्र आहे. शरीर हे धर्मसाधन असल्यामुळे शरीराच्या संरक्षणाची आवश्यकता आहे. व्यायामाशिवाय जीवन व्यर्थ आहे. व्यायाम हे अमृत आहे. व्यायाम ही जीवनशैली आहे. देही आरोग्य नांदते भाग्य नाही त्यापरते समर्थ रामदासांना अभिप्रेत असलेलं हे भाग्य बलोपासनेशिवाय लाभत नाही. शक्तीने पावती सुखे शक्ती नसता विटंबना।
शक्तीचा संस्कार हा माणसाचा खजिना आहे. हा खजिना कुठल्याही ऑफिसमध्ये किंवा बँकेत नसतो. शाळा, महाविधालये, बागा, बँका, हॉस्पिटल, हॉटेल यांच्या इमारती मोठ्या डौलाने उभ्या आहेत. सगळीकडे माणसांची जिद आहे. आरोग्याच्या बँका कुटे पण भेटतात का! आपल्या आरोग्याची गुंतवणूक त्या बँकांत करता येते का! आपलं आरोग्य ही आपली वैयतिक ठेव आहे. त्याची गुंतवणूक विशिष्ट काळासाठी नसून आयुष्यभरासाठी असते. आजकाल व्यायामशाळा, हेल्थक्लब मध्ये गर्दी असते. ती काळाची गरज आहे. पण प्रत्येकालाच व्यायामशाळेत जाता येते असे नाही. व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करण्याचे फायदे खूप आहेत हे खरे पण ज्यांना शक्य नाही. त्यांना सूर्यनमस्कार सारखा सर्वोत्तम व्यायाम घरच्या घरी करता येतो. सर्व वयाच्या स्त्री-पुरुषांनी अगदी सहज करता येण्यासारखा व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार बहुगुणी परिपूर्ण व्यायामप्रकार म्हणजे सूर्यनमस्कार, सवार्गसुंदर व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार नियमितपणे शास्त्रशुद्ध सूर्यनमस्कारांमुळे आरोग्यदेवता प्रसत्र राहते, आरोग्याचा मंत्र जपला जातो. सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व स्नायुंना व्यायाम होतो. सर्व सांध्यांची पूर्ण हालचाल झाल्यामुळे नैसर्गिक हालचाली सहजपणे व्हायला सूर्यनमस्कार उपयोगी होतात.
सूर्यनमस्कारांमुळे शरीराची ताकद वाढते. दम वाढतो, श्वसनाचे विकार बरे होतात. शरीराचे आरोग्य सुधारते. पाठीचा कणा ताणला जाऊन पाठीच्या स्नायुंना व्यायाम होतो. यामुळे मणक्याचे विकार होत नाहीत, झाले असल्यास तर बरे व्हायला मदत होते. लहान मुलांनी सूर्यनमस्कार घातल्यास उंची वाढयाला मदत होते. पोट सुटले असल्यास कमी होते. सृर्यनमस्कारामुळे श्वासावर नियंत्रण येते, ह्रदय अधिक कार्यक्षम होऊन फुप्फुसांची क्षमता वाढते. बुद्धी तेज होते. मनाची एकाग्रता वाढते. आखूड शिंगी बहुदधिड अशा सूर्यनमस्कार या व्यायाम प्रकारची सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे. चिरतरुण राहण्यासाठी सूर्यनमस्काराची सवय आवश्क आहे.
सूर्यनमस्कार अत्यंत काटेकोर, शास्त्रशुद्ध पद्धतीने घालवण्याची सवय सुरवातीपासून लावून घ्यावी. पहिल्या दिवशी एक-दोन सूर्य नमस्कार घालून थांबावे. हळूहळू सूर्यनमस्कारांची संख्या वाढवावी. शक्य असल्यास पूर्व दिशेला म्हणजे सूर्याकडे तोंड करून नमस्कार घालावे. त्याची प्रार्थना मनोभावे करून सूर्याजवळ शक्ती मागावी. रोज बारा नमस्कार घालनारा चांगला तंदुरुस्त राहतो. पत्रास ते शंभर नमस्कार रोज घालण्यास हरकत नाही. एक सूर्यनमस्कार घालण्यास सुमारे वीस ते चाळीस सेकंद इतका वेळ लागतो. दोन्ही पाय जवळ घेऊन ताठ उभे राहावे. छातीच्या समोर दोन्ही हात जोडून नमस्कार करावा. खांदे मागे ओढावेत. मान ताठ ठेवावी. संपूर्ण शरीर ताठ ठेवावे. ही सुरवातीची स्थिती झाली. नऊ, दहा, बारा किवा पंधरा आकडे मोजून सूर्यनमस्कार घालण्याची पद्धती आहेत.
सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे. सूर्यनमस्काराची सांगड अनेक योगासनांशी घातलेली आहे. सूर्यनमस्कारामुळे शरीरस्वास्थ्य लाभते. सूर्यनमस्कार ही भारताची राष्ट्रीय उपासना आहे. सूर्याची उपासना म्हणजे तेजोपासना तेजोपासनेत बलाच्या उपसणेबरोबरच बुद्धीचीही उपासना आहे. उपासना म्हणजे सेवा. पूजा अभ्यास, चितन असा आहे. सेवा पूजनात नमस्काराचा अंतर्भाव होतो. सुर्यनमस्कार हा सुर्योपासनेचा एक महत्वाचा भाग आहे सूर्य हा भगवंताचा डोळा. सूर्याच्या तेजाला मनोभावे नम स्कार केला की ते तेज, ओज, सामर्थ्य काही अंशाने तरी आपल्या प्राप्त होईल. हा भाव सूर्यनमस्काराच्या सेवेत आहे. तेजापुढे नम्र व्हावे हा सूर्यनमस्काराचा मुख्य भाव आहे. नमस्कार नेहमी श्रेष्ठ व्यक्तीला करायचा असतो. सहस्ररश्मी सूर्य नारायण ही उत्पती, स्थिती व लयकारी व्यक्तीस आहे. सूर्यनारायण स्वरूप भगवंताला नमस्कार करणं ही आपली वैभवशाली संस्कृती आहे ……….