keep Senility away with This Food: Wondering how you would look as an old man? No longer need to do it! Now it is possible to keep you age away from your look. with age wrinkles comes on body and face, here are few its with you can maintain your body and face wrinkle free. so be ready for Old age. Read Heath Tips on Keeping old age away from your age.
वृद्दपणी शाकाहार घेऊन निसर्गाच्या अधिकजवळ जाणे कधीही चांगले.मानवी जीवनाचे चारभाग कल्पिले आहे.बालपण,तरुणपण,वानप्रस्थाश्रम व सन्याश्रम त्यापैकी वानप्रस्थाश्रम हा वृद्धाश्रमात येतो. वृद्धाश्रमात बर्याचवेळा मानसिक संतुलन बिघडते. वृद्धाश्रमाचा काळं आजच्या युगात स्वीकार करणे जरा कठीणच आहे परंतु जास्तीत जास्त निसर्गाची जवळीक साधून त्यायोगे आपण त्यास थोडे दूर करू शकतो.
कारले —
वृद्धपनात वजन कमी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बरेच त्रास दूर करू शकतो. त्या करीता उत्तम आहार Caloris कमी असलेले रसाहार घेणे फार फायदेशीर आहे. रसाहार पचायला ह्ल्काव ताबडतोब परिणाम कारक ठरतो, रसाहारने अशक्तपणा कमी होवून वजन समतोल राहते. वृद्धपनात पातळ पदार्थांचा वापर जास्त करावा परंतु चहा व कॉफी चे प्रमाण कमी असावे. तसेच दुध हे वृद्ध्कालात उत्तम होय पण ते सर्वांनाच आवडणे किंवा घेणे शक्य नाही तेव्हा नाचणीच्या किंवा गव्हाच्या सत्वाची खीर घेणे ताकतवार असते. हे एक प्रकारे औषध होय.वृद्धापकाळात आहारच उत्तम होय. अती जड भोजन विकारी असते. कारल्याचा रस किंवा कारल्याच्या पाल्याचा रस याने मधुमेहा सारखे विकार दूर करतो तो रक्त शोधक असून त्याच्या सेवनाने भूक लागते. तसेच मलावरोध दूर होतो. आतड्यांतील निरुपयोगी जंतूचा नाश होतो. मुळव्याध,मूत्रपिंडाची जळजळ कमी करतो. तसेच त्याने मुतखडा विरतो, आणि संधिवात व कावीळ या रोगात रिकाम्या पोटी घेल्याने हे विकार दूर करतो. तापात कारल्याची भाजी अवश्य खावी. कारल्याच्या पानाचा रस कृमी नाशक आहे. कारल्याच्या रसात हिंग घालून घेतल्यास मुत्रघात हा विकार दूर होतो. कोवळ्या कारल्याचे तुकडे करून सावलीत वाळवून त्याची पावडर करावी व सकाळ-संध्याकाळ एक तोळाघेल्याने लघवीतून साखर जाण्याचे कमी होतो. काही वृद्धांना पायांना दाह त्यांनी कारल्याचा पाल्यांचा रस पायावर चोळावा त्याने पायाची जळजळ कमी होते.
कांदा —
वृद्धानच्या अनेक तक्रारींवर कांदयाचा चांगला उपयोग होतो. निद्रा नाशावर रात्री दही घालून कांदयाची कोशिंबीर खाल्ल्याने झोप चांगली येते. म्हातारपणी स्मरणशक्ती कमी होते. ती वाढण्यासाठी तसेच दुर्बल स्नायू मजबूत होण्यासाठी,कांद्याची कोशिंबीर खावी. म्हातारपणी वारंवार कफ होतो जीरे व सैंधव घालून कांद्याची कोशिंबीर खाल्याने कफ कमी होतो, म्हातारपणातील अपचनासाठी कांद्याच्या २ तोळे रसात आल्याचा १/२ तोळा रस घालून त्यात किंचित हिंग,मीठ,पाणी घालून प्याल्यास अपचन दूर होते. तसेच अपचनाच्या उलट्या व जुलाब कमी होतो. उन्हाची झळ लागून त्रास झाल्यास कांद्याच्या रसात जिरे पावडर व साखर घालून घेतल्यास थोड्या वेळातच चांगले वाटते. कांद्याचा रस अंगावर चोळल्याने अंगावरील सुरकुत्या कमी होतात.