लगेच आनंद मिळविण्याचे काही सुटसुटीत मुद्दे




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Life is not rest on one stable point many ups and down we face in life. But we need live happy all the time. here we are telling you some easy tricks to live happily. Instant tricks to get happiness. keeping fear inside will spoil the happiness of your life.

Instant tricks to get happinessजीवनात आनंद मिळविण्यास प्रथम संकुचित जगणे सोडावे लागते. बर्याच वेळा मनुष्य संकुचितपणे जगत असतो. भीत भीत जगण्यामुळे जीवनातील आनंद कायम स्वरूपी नष्ट होतो. या करीता मनुष्याने सर्व प्रथम खुल्लम जगले पाहिजे. आपण कधी मोकळेपणान जगलो नाही कि मोकळेपणान चाललो नाही. हा मोकळेपणा म्हणजे काय, हे समजने फार महत्वाचे आहे. तेव्हाच खरा आनंद प्राप्त होईल. यासाठी प्रथम संकोच, आकस नष्ट करायला हवा.

* अधून मधून आपण कसे बसतो, कसे चालतो, कसे बोलतो, कसे वागतो याकडे विशेष लक्ष असू द्यावे.

स्वत:ला खुल्लेपणाने जगायची सवय असायला हवी. आणि जो या प्रमाणे जगतो तोच खरा आनंद भोगतो. आनंद झाला कि आपल्याला मोकळ खुलं व छान वाटते. त्या उलट दु:खात आपण मिटून व आकसून जातो. आपल्याला आकसा पासून प्रसरणापर्यंत पोचण्या करीता संकुचित जगणे सोडावे लागेल.

आयुष्यात काही घटनांमध्ये आपल्याला दु:ख होत अशा वेळी अगदी किरकोळ, बारीकसारीक प्रसंग सुद्धा आपल्याला दुख देतात यां दु:खांतून बाहेर पडण्यासाठी प्रथम त्या दुखांचा स्वीकार करावा लागतो. ते दुख जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत ते दुख दूर करण्याचा मार्ग सुचणारच नाही. आनंद असो वा दु:ख या सर्व गोष्ठीचा प्रथम स्वीकार करावा लागतो, तेव्हाच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. आनंद असेल तरी तो जाण्यासाठी येतो व दु:ख असेल तेही जाण्यासाठीच असते. तेव्हा सर्व स्वीकार करणे हेच महत्वाचे.

* व्यवहार ज्ञान हेच सांगत म्हणून कोणत्याही परिस्थितीतून सुधारणा हि नक्कीच करावी लागणार. 

उदा. मुलगा अभ्यास करीत नसेल या करीता त्याला अभ्यासाची वळण लावायची असेल तर प्रथम तो अभ्यास करीत नाही या गोष्टीचा स्वीकार करावाच लागणार तेव्हा त्यातूनच त्याच्या पुढच्या स्थितीचा मार्ग सुचेल. पहिलच पाउल जर योग्य उचललं नाही तर, पुढची सर्व पाउले चुकीच्या मार्गाने पडतील, म्हणून प्रथम वाईट परिस्थिती स्वीकारण्याची कला आत्मसात करा नंतरच ती सुधारण्याच काम करा.

* उदा: एखाद्याच्या घरचा व्यक्ती दारू पीत असेल तर तो दारू पितो हे स्वीकारावे लागेल व त्यानंतर त्या व्यसनाला दूर करण्याचा मार्ग सुचेल नाही तर त्या कडे दुर्लक्ष करून व्यसन लपविल्याने ते वाढत जावून पुढे अतिशयोक्ती होवून त्याचे परिणाम भोगावे लागतील. व्यसन हे लपविल्याने कधीच सुटत नाही.

आयुष्याच्या नदीला दोन किनारे असतात, म्हणून दु:खाची नदी निर्माण होते. हे किनारेच जर काढून टाकले  तर पाणी पसरेल, म्हणजेच दु:ख सुद्धा विलीन होईल, आपलं अंतरंग ईतक मोठ आहे कि सगळं दु:ख त्यात सामावू शकतं, संपूर्ण जगातली दु;ख विलीन होवू शकतात. ती रोखली कि त्या घटनांना, दु:खांना, विचारांना किनारा मिळतो. आपण आक्रसून जाता तेव्हा हे आक्रसनं कमी होत गेलें कि नवीन आयुष्याची सुरवात होईल. नव्या आयुष्यात नव पाउल उचललं जाईल. आनंदाचे गुपित लक्षात आल्याने आनंद प्राप्त करण्याच खरं रहस्य उलगडल जाईल तुम्हाला जेव्हा कोणत्याही विचार, घटना, प्रसंग, गर्दीत बाहेर किंवा आत संतप्त करेल तेव्हां  ‘स्वीकार करण्याची अवस्था’ या मार्गातून बाहेर काढण्या साठी मदत करेल आणि तुम्ही लगेच शांत, मुक्त व हलके व्हाल समस्यांचे निराकरण करण्यासाठी सज्ज राहाल.

मनुष्यात स्वीकार भाव हे अति आवश्यक आहे. त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलण्यास मदत होते. आपल्या स्वत:ला काय हवे आहे हे निश्चित करून घेणे महत्वाचे, तेव्हाच त्या गोष्टीचा स्वीकार आपण करू शकाल. — स्वीकार भावा मुळे आपली मनोदशा त्वरित बदलते, आपल्या जीवनात एखादी समस्या निर्माण झाली असता मनात नकारात्मक विचार निर्माण होतात,पण ती लवकरात लवकर निघून जावी या प्रयत्नात आपण असायला हवे. नाहीतर या नकारात्मक भावनेने परिस्थिती सुधारण्या एवजी जास्त बिघडत जाते. त्यासाठी आपण कुणा दुसर्याला दोषी ठरवतो, असेच काही विपरीत आपल्या कडून घडत असते. त्याचे फलरूप विक्राळ रुप धारण करून जिवाचा मनस्ताप होतो. म्हणून समस्या कोणतीही असो आपण तिचा सहज स्वीकार करून त्यावर विचार पूर्वक निर्णय घ्यावा. त्यातून योग्य मार्ग सुचतो. मनात निर्माण झालेल्या नकारात्मक भावनांचा आधार गळून पडतो आणि त्याच बरोबर आपल्या विचारात स्पष्टता येऊ लागते. एखाद्या समस्ये चा किंवा परिस्थितीचा आपण स्वीकार करतो. तेव्हा काही काळांनी तीच परिस्थिती वा समस्या आपल्याला मदत करीत आहे, आणि त्यातूनच तुम्ही विकासाच्या मार्गाने पाउल टाकले हे सुद्धा लक्षात येईल.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu