Crowd of Thoughts In Your Brain: Your Brain is full of thoughts and Ideas. Every sec news Ideas comes and Brain Never stops Working. Brain activity carried out at 5 Hrtz to 50 Hrtz…Read Full Story in Marathi.
मेंदूतील विचारांची गर्दी …. ( असामान्य ज्ञान )
आपल्या मेंदूत बरेच काही चाललेले असतात, खरे तर मेंदू म्हणजे निसर्गाचा संगणक आहे. किती सार्या गोष्टी एवढ्याशा मेंदूत अगदी व्यवस्थित साठवून तेव्ल्या असतात. तरी परंतु ताण वाढला कि विचारांची गर्दी तेथेही वाढते, तरीही त्यावर नियंत्रण मिळवून मेंदू विशिष्ट वेळी विशिष्ट गोष्टी आपल्याला सुचवीत असतो. असा दावा संशोधक करतात. वॉशिंग्टन विद्या पिठातील संशोधकाच्या एका पथकाने जर्मनीतील युनिव्हर्सिटीसेंटरच्या सहयोगाने केलेल्या अध्ययनात हि बाब स्पष्ट झाली आहे. मेंदूतील काही संदेश यंत्रणा ५ हर्टझवर काम करतात तर काही ३२ आणि ४५ हर्टझवर करतात. घडाळाचे तिन्ही काटे ज्याप्रमाणे वेगवेगळ्या गतीने चालतात, त्याच प्रमाणे मेंदूची कार्य पद्धती आहे. चुंबकीय माध्यमातून केवळ पेशींच्या हालचालीन्चा अंदाज घेता येतो, पण अति सूक्ष्म हालचाली मात्र नोंदविता येत नाही. मेंदूतील काही संकेत एका सेकंदात ५०० वेळा घडत असतात, असे या संशोधनात आढळून आले. या साठी त्यांनी एकंदरीत ४३ जणांच्या मेंदूतील घडा मोडीन्चा तंत्रा द्वारे अभ्यास करण्यात आला.
Article By Marathi Unlimited.